साकीनाका येथील एका व्यापाऱ्यास पालिकेत तक्रार करून कारवाईची धमकी देवून दीड लाखाची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांच्या टोळीला साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धमकी देवून खंडणी उकळणाऱ्या दोन जणांना साकीनाका पोलिसांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. सुदाम साहिल आणि अनिल शुक्ला असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी यांचा साकीनाका […]
Tag Archives | extortion
कपडे व्यापाऱ्याला दुबईवरून खंडणीचा फोन; २३.७ लाखाची मागणी
एका व्यावसायिकाला २३.७ लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. ६१ वर्षीय कपडे व्यापाऱ्याला ३१ ऑक्टोबर रोजी एका खासगी क्रमांकावरून फोन करून खंडणी मागण्यात आली. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला (+९७१) दुबईचा कोड दर्शविणाऱ्या नंबरवरून पहिला कॉल आला आणि दुसरा कॉल न्यू जर्सी, अमेरिका (+२०१) वरून आला आहे. […]
विकासकाला २० कोटीची खंडणी मागणाऱ्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
पवईतील एका नामांकित विकासकाला २० करोडची खंडणी मागणाऱ्या पुणे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे (४५) आणि त्याचा गाडी चालक विठ्ठल फालके (४२) याला न्यायालयाने आज (गुरुवार) दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बुधवारी पवई पोलिसांनी त्यांना मुलूंड येथील हॉटेलमधून खंडणीचा १ करोड रुपयाचा हप्ता स्विकारताना रंगेहाथ पकडले होते. विकासक यांच्याकडे २७ वर्ष नोकरी करणारा पाखरे २०१६ […]
विकासकाला २० करोडची खंडणी मागणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवईमध्ये कार्यालय असणाऱ्या एका नामांकित विकासकाला २० करोड रुपयाच्या खंडणीची मागणी करून, २ करोड रुपयाची रक्कम स्विकारताना एका खंडणीखोराला आज (बुधवारी) पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुलाब पारखे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो जुन्नर, पुणे येथे जिल्हा परिषद सदस्य असल्याचेही समोर येत आहे. पवई पोलिसांनी भादवि कलम ३८४ नुसार गुन्हा नोंद करून पारखे […]