देश लॉकडाऊन असताना पवई परिसरात गांजा विक्री करणाऱ्या टोळीतील २ आरोपींना पवई पोलिसांनी अटक केली आहे. इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीकडून पवई पोलिसांनी ४०,५०० रुपये किमतीचा १ किलो ७०० ग्राम वजनाचा गांजा आणि रोकड हस्तगत केली आहे. पवई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन काळात पवई परिसरात कायदा सुव्यवस्था सुस्थितीत राहावी म्हणून परिसरात नियमित […]
Tag Archives | filterpada
डोक्यात हातोडी घालून पत्नीचा खून; आरोपी पतीला अटक
पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून खून करुन पळून गेलेल्या आरोपी पतीला पवई पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या आहेत. अजित नारायण लाड (६७) असे या आरोपी पतीचे नाव आहे. त्यांच्यावर त्याची पत्नी शिला अजित लाड (६५) हिची हत्या केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता १९ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली […]
पवईत महिलेचा राहत्या घरात खून; पती बेपत्ता
पवईतील शिवशक्तीनगर येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय महिला शीला अजित लाड यांचा अज्ञात व्यक्तीने तिच्या राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना पवईत घडली आहे. खून झालेल्या ठिकाणी पोलिसांना तिच्या नवऱ्याने लिहलेली सुइसाईड नोट मिळून आली असून, तो बेपत्ता आहे. या संदर्भात पवई पोलीस भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. गारमेंट कामगार […]
भरधाव एसयुव्हीने चिमुरड्याला उडवले; जागीच मृत्यू
भरधाव वेगात धावणाऱ्या एका एसयुव्ही कारने फिल्टरपाडा येथे ४ वर्षाच्या एका लहान मुलाला उडवल्याची घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. अरहान रमजान खान (०४) असे मुलाचे नाव असून, रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, फिल्टरपाडा बेस्टनगर येथे राहणाऱ्या अरहानचे घर हे रस्त्यापासून काहीच अंतरावर आहे. दुपारी तो घराबाहेरील […]
पवईत गांजा विक्रेतीला अटक; २ किलो गांजासह २.३५ लाखाची रोकड जप्त
पवईतील मोरारजी नगर परिसरात राहणारी महिला तिच्या घरासमोर प्लास्टिक पिशवीतून संशयास्पद काहीतरी विक्री करत असताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तिच्या पिशवीची झडती घेतली असता तिच्याकडे एकूण २ किलो गांजा आढळून आला. तसेच तिच्याकडून २,३५,८३०/- रुपये रोख रक्कमही पोलिसांनी हस्तगत केली आहे. अजगरी बेगम सैयद अली (६५) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, तिच्या विरोधात […]
संपत्तीच्या वादातून पुतण्याने केला काकीचा खून
पवईतील फिल्टरपाडा येथे राहणाऱ्या एका तरुणाने संपत्तीच्या वादातून आपल्याच काकीचा खून केल्याची घटना पवईत मंगळवारी घडली. यानंतर तरुणाने स्वतःवर घाव करून घेत पवई पोलीस ठाणेत हजर झाला. रईसा शेख (४५) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव असून, तिचा पुतण्या तौसीफ शेख (२६) याला पवई पोलिसांनी उपचारानंतर अटक केली आहे. “मंगळवारी सकाळी रईसा आणि तौसीफ यांच्यात संपत्तीच्या […]
फिल्टरपाडा येथे जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया
@अविनाश हजारे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी विहार तलावाची मुख्य जलवाहिनी पवई, फिल्टरपाडा येथे फुटून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे. गेल्या १५ दिवसांपासून वाहिनी फुटल्याची तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेला देवून सुद्धा पालिकेने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या मुंबईकरांना सतावण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी जवळपास सात तलावांतून मुंबईला […]
हॉकिंग झोनला आयआयटीकरांचाही विरोध
पालिकेने ३ जानेवारी २०१८ रोजी आपल्या वेबसाईटवर घोषित केलेल्या हॉकिंग झोनच्या यादीमध्ये पवईतील हिरानंदानीतून हॉकिंग झोन हटवल्याचे दाखवत असतानाच आयआयटी भागात मात्र बनणाऱ्या हॉकिंग झोन्समध्ये वाढ केली आहे. या निर्णयामुळे येथील नागरिक सुद्धा निराश झाले असून, त्यांनी याला आपला कडक विरोध दर्शवला आहे. सोशल माध्यमातून याची जनजागृती करत लोकांनी पालिकेच्या समोर आपला विरोध ठेवला आहे. […]
हिरानंदानी हॉकिंग झोन मुक्त?
हिरानंदानी रहिवाशांसाठी आनंदाची बातमी असून, गेल्या दोन महिन्यांपासून हिरानंदानी परिसरात येणाऱ्या हॉकिंग झोनला घेवून असणारी टांगती तलवार पालिकेने जाहीर केलेल्या नव्या यादीनुसार आता त्यांच्यावरून हटली आहे. पालिकेने ३ जानेवारी २०१८ रोजी आपल्या वेबसाईटवर घोषित केलेल्या हॉकिंग झोनच्या यादीमध्ये पवईतील हिरानंदानीत इस्ट अव्हेन्यू रोड वगळता कोणत्याच रस्त्यावर हॉकिंग झोन दाखवण्यात आलेले नाही. यावरून २०१४ साली झालेल्या […]
फेरीवाला क्षेत्राच्या विरोधात नागरिकांचा मोर्चा
@प्रमोद चव्हाण पालिका ‘एस’ वार्ड अंतर्गत येणाऱ्या पवईतील हिरानंदानी परिसरातील सर्व रस्त्यांना हॉकिंग झोन घोषित करण्यात आले आहे. फेरीवाले येण्याने होणाऱ्या त्रासाला रोखण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता हिरानंदानी गार्डन रहिवाशी फेडरेशनतर्फे हिरानंदानी येथे शांततापूर्वक विरोध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध समाजसेवी संस्थांसह, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. अधिकृत […]
पवई फेरीवाला क्षेत्राच्या घेऱ्यात; नागरिकांचा हॉकिंग झोनला विरोध
@प्रमोद चव्हाण पालिका ‘एस’ वार्ड अंतर्गत येणाऱ्या पवईतील हिरानंदानी, आयआयटी आणि फिल्टरपाडा भागात मिळून २१२६ ओट्यांना मान्यता देण्यात आली आहे. हिरानांदानीतील सर्व रस्त्यांना हॉकिंग झोन घोषित केल्याने नागरिकांचा तीव्र विरोध. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हॉकिंग झोन अंतर्गत मुंबईतील २४ विभागांमध्ये २२०९७ ओट्यांना मान्यता देण्यात आली आहे. फेरीवाल्यांनी व्यवसाय कुठे बसून करावा म्हणजेच फेरीवाला क्षेत्र (हॉकिंग […]
पवईकर तरुणाची इस्रो झेप
पवईच्या फिल्टरपाडा परिसरात राहणाऱ्या प्रथमेश सोमा हिरवे या २५ वर्षीय तरुणाची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. पालिकेच्या शाळेत शिक्षक असलेले वडील सोमा आणि आई इंदू यांच्या समवेत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या प्रथमेशने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर गरुड झेप घेत मुंबईतून पहिल्या तरुणाच्या निवडीचा मान पवईला मिळवून दिला आहे. […]
खंडणी खोराच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
फिल्टरपाडा येथील दुकानदारांने खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याला जबर मारहाण करून त्याच्या दुकानाचे नुकसान करणाऱ्या खंडणी खोराच्या पवई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शोयब अमीर खान (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार शकील शेख यांचे फिल्टरपाडा येथे सना इंटरप्रायजेस नामक दुकान आहे. आरोपी […]