पालिकेने ३ जानेवारी २०१८ रोजी आपल्या वेबसाईटवर घोषित केलेल्या हॉकिंग झोनच्या यादीमध्ये पवईतील हिरानंदानीतून हॉकिंग झोन हटवल्याचे दाखवत असतानाच आयआयटी भागात मात्र बनणाऱ्या हॉकिंग झोन्समध्ये वाढ केली आहे. या निर्णयामुळे येथील नागरिक सुद्धा निराश झाले असून, त्यांनी याला आपला कडक विरोध दर्शवला आहे. सोशल माध्यमातून याची जनजागृती करत लोकांनी पालिकेच्या समोर आपला विरोध ठेवला आहे. […]
