Tag Archives | HIRANANDANI GARDENS

traffic police action

पवईत शालेय वेळेत शाळेजवळ वाहने पार्क करताय? सावधान ! भरावा लागू शकतो ५००० रुपयांचा दंड

साकीनाका वाहतूक विभागाकडून गुरुवारी शाळेजवळ आणि मुख्य रस्त्यांवर पार्क गाड्यांवर करण्यात आली कारवाई. दुपारी १२ ते १ वेळेत शाळेजवळ आणि त्याच्या मुख्य रस्त्यांवर नो पार्किंग’. पवई भागात सध्या वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात शालेय वेळेत पालक, शालेय विद्यार्थ्यांना घेवून येणारी खाजगी वाहने रस्त्यांवर पार्क केल्याने वाहतूक कोंडी जास्तच वाढत असते. या समस्येवर […]

Continue Reading 1
british-nagrik powai police

पवई पोलिसांनी वाचवले ब्रिटिश नागरिकाचे प्राण, ब्रिटिश हाय कमिशनकडून कौतुक

नैराश्यात असणारा एक ब्रिटिश नागरिक आत्महत्येच्या प्रयत्नात असताना, दीड तास दरवाजातील पत्र टाकण्यासाठी असणाऱ्या जागेतून त्याची मनधरणी करत, पवई पोलिसांनी दाखवलेल्या संयम आणि प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. सॅम कॉलर्ड (६०) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ब्रिटीश नागरिकाचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले होते असे समोर आले आहे. याबाबत ब्रिटिश हाय […]

Continue Reading 0
all in one

अस्मानी संकट; पवई, चांदिवली भागात दिवसभरात काय घडले?

उशिराने एन्ट्री घेतलेल्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून मुंबईकरांची चांगलीच धुलाई केली आहे. पावसाने रौद्ररुप धारण केल्याने मुंबईवर अस्मानी संकट कोसळले असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. मुसळधार पावसामुळे साकीनाका, चांदीवली, आयआयटी पवई परिसरातील अनेक घरात पाणी भरल्याने स्थानिकांच्या घरातील किंमती वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले  आहे. मुंबईत गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने जून महिन्यातील […]

Continue Reading 0
gopal sharma circle1

बेजबाबदारपणे उभ्या शालेय बस, खाजगी वाहने आणि पालकांच्या गाड्यांमुळे हिरानंदानी जाम

एस एम शेट्टी शाळा, पोद्दार स्कूल आणि हिरानंदानी प्री-पायमारी स्कूल यांच्या वाहनांमुळे हिरानंदानी आणि जलवायू विहार भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही यात काहीच फरक पडला नसून, शाळेच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने दिवसेंदिवस उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. याबाबत आता वाहतूक विभाग सुद्धा हतबल झालेला दिसत असून, नक्की करायचे काय? हा […]

Continue Reading 0
fire at haiko mall

हिरानंदानीत हायको मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग

हिरानंदानी येथील एव्हीटा इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर लागलेल्या आगीला आठवडा उलटला नसेल की, येथील हायको मॉलच्या पहिल्या मजल्यावर डक्टजवळ, कॅफेच्या भागाला आग लागल्याची घटना आज सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई अग्निशमन दल आणि हिरानंदानी एसटीएफ यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, येथील बोट कॅफेच्या एसीतील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे अग्निशमन दलाकडून […]

Continue Reading 0
fire at evita

हिरानंदानी, इवीटा इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आग, बेडरूम जळून खाक

पवई हिरानंदानी गार्डन परिसरातील इविटा इमारतीच्या १५व्या मजल्यावरील १५०२ या फ्लॅटमध्ये सायंकाळी ४.१० वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना आज घडली. घरमालक शेनॉय यांचा परिवार यावेळी घरातच होता, आगीची माहिती मिळताच त्यांनी घराबाहेर धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. घटनास्थळी पोहचलेल्या हिरानंदानी स्पेशल टास्क फोर्स आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. यासंदर्भात […]

Continue Reading 0
Kids masti

तापमान कमाल, बच्चेकंपनीची धमाल ..!

मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला असून, मुंबईकर आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर जाणे टाळत आहेत. जावेच लागले तर पुरेशी काळजी घेताना दिसतात. उन्हाच्या कडाक्यात स्वतःला वाचवण्यासाठी जिकडे तरुण मंडळी विविध कॉस्मेटीक प्रोडक्ट्सचा वापर करताना आढळून येत असतानाच, पवईतील बच्चेकंपनीने मात्र या उन्हाच्या तडाख्याला न-जुमानता धमाल-मस्ती करण्यासाठी एक नवीनच शक्कल लढवली आहे. पवई, हिरानंदानी येथील चंद्रभान शर्मा चौकात […]

Continue Reading 0
cheating in name of police

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने पळवले; हिरानंदानीतील घटना

आपले काम संपवून घरी परतत असणाऱ्या ७६ वर्षीय वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने भामट्यांनी पळवल्याची घटना मंगळवारी पवईतील हिरानंदानी भागात घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सिसिटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील विजयविहार इमारतीत राहणारे विलास बांदेकर (७६) मंगळवारी सकाळी हिरानंदानी येथील आपल्या बँकेच्या शाखेत […]

Continue Reading 0
accident hiranandani main samar chouhan

हिरानंदानीत मोटारसायकल चालकांचा ‘वन वे’ ‘नो एन्ट्री’त धुमाकूळ; एकाला उडवले

हिरानंदानी येथे सेन्ट्रल एव्हेन्यूवर पायी चालणाऱ्या मुलाला भरधाव धावणाऱ्या एका मोटारसायकल चालकाने ‘वन वे’मध्ये घुसत उडवल्याची घटना शुक्रवारी घडली. अपघातानंतर मोटारसायकल चालकाने तेथून पलायन केले असून, अपघातानंतर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या मुलाला प्रत्यक्षदर्शिने त्वरित रुग्णालयात दाखल केल्याने मोठा धोका टळला. याबाबत पवई पोलिस “हिट अंड रन”चा गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत. हिरानंदानीच्या रस्त्यांवर […]

Continue Reading 0
mach enginer arrested 14012017

वृद्धेला पोलीस असल्याचे सांगून २ लाखाचे सोन्याचे दागिने लांबवणारया भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात आपल्या मुलीच्या उपचारासाठी आलेल्या एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून, २ लाखाचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला अडीच महिन्यानंतर अखेर पोलिसांनी मालवणी येथून अटक केली आहे. गुलझार अली (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मालवणी येथे इस्टेट एजंटचे काम करतो. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधा गौंडर (६२) […]

Continue Reading 0
Mohmmad-Rashid

दोन वर्षापूर्वी जापानी नागरिकाला लुटणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

मुंबईत कामानिमित्त आलेल्या एका जापानी नागरिकाला पवई येथे परतत असताना लुटण्याच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षाचालक राशीद फारूक मुजावर शेख उर्फ पापड याला गुन्हा घडल्याच्या दोन वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या एक चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले असताना त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय जापानी नागरिक […]

Continue Reading 0
fire avalon b wing 14th floor

हिरानंदानी, एवेलॉन इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर आग

हिरानंदानी येथील एवेलॉन इमारतीच्या १४ व्या मजल्यावर असणाऱ्या १४०२ फ्लॅटमध्ये शोर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना आज संध्याकाळी ७.४५ वाजता घडली. घटनास्थळी पोहचलेल्या हिरानंदानी स्पेशल टास्क फोर्स आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी घडलेली नाही. यासंदर्भात घटनास्थळी पोहचलेल्या पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानंदानी येथील एवेलॉन इमारत, ‘बी’ विंगच्या चौदाव्या […]

Continue Reading 0

घरफोडीच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगाराला अटक

पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार रोड भागात घरात घुसून घरातील मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने नुकतीच अटक केली आहे. दिपक उर्फ लीचू जगबीर सारसर (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पवई पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या ३ गुन्ह्यांची उकल त्याच्या अटकेतून झाली आहे. पवईतील तुंगागाव, केबीएम कंपाऊंड साकीविहार […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!