Tag Archives | Indian Institute of Technology Bombay

Canteen-employee-arrested-for-pepping-after-iit-bombay-student-complained-against-him

आयआयटी – पवईमध्ये १८ वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पवई परिसरात असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेच्या (IIT-Bombay) कॅम्पसमध्ये असलेल्या वसतिगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दर्शन रमेशभाई सोळंखी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मृत विद्यार्थी हा मूळचा गुजरातमधील अहमदाबादचा असून, केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेकला प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे. आत्महत्येचे कारण अजूनही अस्पष्ट […]

Continue Reading 0
iit powai

आयआयटी मुंबई देशात पुन्हा नंबर वन

जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी ‘क्यूएस युनिव्हर्सिटी रँकिंग’ नुकतीच जाहीर झाली आहे. या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत पुन्हा बाजी मारत देशातील विद्यापीठांमध्ये आयआयटी मुंबई नंबर एकवर कायम राहिले आहे. आयआयटी मुंबईने जागतिक क्रमवारीत १७२ वा क्रमांक मिळवला आहे. शैक्षणिक प्रतिष्ठा, संस्थेची प्रतिष्ठा, शिक्षक विद्यार्थी सरासरी, शिक्षकांची कामगिरी, परदेशी शिक्षकांची सरासरी, परदेशी विद्यार्थ्यांची सरासरी असे निकष लक्षात घेत […]

Continue Reading 0
cattles in IIT, main building

आयआयटी कॅम्पसमध्ये उभा राहणार भटक्या गायी-बैलांसाठी निवारा

आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याला झुंज करणाऱ्या बैलाने धडक देवून जखमी केल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेची आयआयटी प्रशासनाने गंभीर दखल घेत कॅम्पस परिसरात फिरणाऱ्या गाई-बैलांसाठी शेल्टर उभारण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी आयआयटी व्यवस्थापन मंडळाने कॅम्पस परिसरात योग्य अशी जागा पाहण्यास देखील सुरुवात केली आहे. पवईतील आयआयटी मुंबईमध्ये इंटर्नशिप करत असणाऱ्या अक्षय […]

Continue Reading 0
bull attack iit powai

आयआयटी पवईतील विद्यार्थी बैलाच्या धडकेत जखमी

दोन बैलांच्या झुंजीत विद्यार्थ्याला उडवल्याची घटना पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये घडली. या घटनेमध्ये तरुण जखमी झाला आहे. पवईतील आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याला झुंज करणाऱ्या बैलानी धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. जखमी विद्यार्थ्याचे नाव अक्षय लथा असर असे आहे. त्याच्यावर विक्रोळी येथील शुश्रूषा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक छायाचित्र

विद्यार्थीनीला अश्लील मॅसेज पाठवणाऱ्या प्रोफेसरला अटक

मुंबईतील एका नामांकित अभियांत्रिकी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थीनीला सोशल मीडिया आणि इमेलच्या माध्यमातून मानसिक त्रास देणाऱ्या माजी प्रोफेसरला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने या पीडितेसह अन्य मुलींनादेखील असेच छळले असल्याचे समोर आले आहे. पवईतील एका नामांकित विश्वविद्यालयाच्या विद्यार्थीनीला सोशल मीडियाच्या माध्यमातून छेडणाऱ्या, तिला अश्लील मॅसेज आणि व्हिडीओ पाठवून तिला मानसिक त्रास देणाऱ्या विश्वविद्यालयाच्या माजी प्रोफेसरला पवई […]

Continue Reading 0
iit powai

आयआयटीमध्ये प्रयोग करताना हायड्रोजन बलूनचा स्फोट, तिन जखमी

मुंबई, पवई येथील आयआयटीमधील एरोस्पेस डिपार्टमेंटमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास प्रयोग करताना झालेल्या स्फोटात ३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. प्रशांत सिंग, तुषार जाधव आणि रजत जैस्वाल अशी जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. आयआयटी मुंबईमध्ये पार्ट-टाइम काम करणारे तुषार जाधव आणि इतर दोन प्रशिक्षणार्थी प्रयोग करत असताना ही घटना घडली. येथील एरोस्पेस विभागात हा प्रयोग केला जात […]

Continue Reading 0
iit powai

मुंबई आयआयटीतील विद्यार्थीनीना विषबाधा

मुंबई आयआयटीमधील मुलींच्या हॉस्टेल क्रमांक १० मधील विद्यार्थीनीना गोड खाण्यातून विषबाधा झाल्याचे सोमवारी समोर आले आहे. ही विषबाधा शनिवारी झाल्याचे समोर येत असून, सुरुवातीला नाकारणाऱ्या आयआयटी प्रशासनाने सोमवारी सायंकाळी उशिरा मान्य केले. विषबाधेमुळे २५ विद्यार्थीनीना आयआयटीच्या अंतर्गत रुग्णालयात दाखल करून, उपचारानंतर सर्वांना सोडून देण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र शेवटची बातमी हाती आली तोपर्यंत काही […]

Continue Reading 0
प्रातिनिधीक

टम – टम गेल्या, इलेक्ट्रीक बग्गीज आल्या

आयआयटी मुंबई विद्यार्थ्यांच्या कॅम्पस भ्रमंतीसाठी १० इलेक्ट्रीक बग्गीज जानेवारी अखेर पासून होणार दाखल. व्यवस्थापनाने १७ मिनी बस सेवा ज्यांना टम-टम म्हणून ओळखले जात होते त्यांना बंद केल्याच्या काही महिन्यांनंतरच ई-बग्गीज सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन कॅम्पस पुढाकाराचे पुढील एक पाऊल म्हणून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी-बी) कॅम्पस परिसरात प्रवासी वाहतुकीसाठी जानेवारीच्या अखेरीस १४-सीटर […]

Continue Reading 0
56th Convocation of IIT Bombay 1 (2)

स्टार्टअपची क्रांती देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्टार्टअपची क्रांती ज्या वेगाने देशात झाली त्याचा स्त्रोत आयआयटी आहेत. आज जग आयआयटींना युनिकॉर्न स्टार्टअप्सची नर्सरी म्हणून ओळखत आहे. तंत्रज्ञानाचा आरसा असलेल्या या संस्थांमधून जगाचे भविष्य आपल्याला दिसत आहे, असे गौरव उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. शनिवारी आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये कॉन्वोकेशन हॉलमध्ये पार पडलेल्या आयआयटी मुंबईच्या ५६ व्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते […]

Continue Reading 0
andolan - Sexual harassment charges IIT-Bombay

आयआयटीत विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ; राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंगेसचे ठिय्या आंदोलन

जगभरातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या आयआयटी बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक छळ होत असल्याचा आरोप होत आहे. फेसबुकवर आयआयटी बॉम्बेच्या कन्फेशन पेजवरुन विद्यार्थ्यांनी शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने केलेल्या छळाला वाचा फोडली आहे. विशेष म्हणजे यात काही तरुणांनीही आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले आहे. आरोप करण्यात आलेला विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतो. त्याला कॅम्पस फेस्टिवल ‘मूड इंडिगो’ […]

Continue Reading 0
markant-lila-final

आयआयटी कॅम्पसमध्ये ‘माकड’ चेष्टा

भारतीय प्राध्योगिकी संस्थान (आयआयटी) पवईच्या कॅम्पसमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांनी उच्छाद मांडला आहे. वसतिगृहात घुसून, परिसरात कचरा टाकून घाण करणे, सुकण्यासाठी टाकलेली कपडे फेकून देणे, विद्यार्थ्यांच्या वस्तू चोरी करणे अशा कुरापती ही माकडे करत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. साईन – थिटा सारखी अवघड अभियांत्रिकी गणिते सोडवणाऱ्या येथील इंजिनिअर्सना आता या माकडांना पीटा म्हणावे लागत आहे. […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!