Tag Archives | lockdown

‘Project Ulhas’ Students' helping hand to spread smile on poor people’s faces

‘प्रोजेक्ट उल्हास’ गोरगरिबांच्या मदतीसाठी एकवटले विद्यार्थ्यांचे हात

  कोरोनाच्या या दुर्दैवी काळात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आपल्या बांधवांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणण्यासाठी पवईतील ४ विद्यार्थ्यांचे हात एकवटले आहेत. या कठीण प्रसंगी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी ६४,००० हजार रुपये जमा केले असून, त्यातून त्यांनी २०० कुटुंबाना रेशन पुरवले आहे. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला शिकणारे अनुषा गुहा, कॅथरीन मॅथ्यूज, जोशुआ डिसोझा आणि […]

Continue Reading 0
main1

पवईत उच्चभ्रू इमारतीत चोराने मारला मोठा डल्ला

पवईतील लेक फ्रंट सॉलीटेअर इमारतीत एका चोरट्याने घरफोडी करत मोठा डल्ला मारल्याची घटना सोमवार, २० जुलै रोजी घडली आहे. इमारतीच्या ५व्या मजल्यावर असणाऱ्या ५०२ फ्लॅटमधून चोरट्याने ९ लाख २५ हजाराचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आणि रोकडीवर हात साफ केला आहे. चोरीला गेलेल्या मालमत्तेची नोंद घेणे सुरु असून, हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष […]

Continue Reading 0
panchkutir

गणेशनगर ८ दिवस लॉकडाऊन; कोरोना प्रसार रोखण्यासाठी स्थानिकांचा निर्णय

परिसरात वाढणारा कोरोना प्रसार रोखण्यासाठी सामान्यतः पालिकेतर्फे परिसर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, पवईतील गणेशनगर (पंचकुटीर) येथील वाढत्या कोरोना बाधितांचा आकडा पाहता येथील स्थानिक नागरिकांनीच आपला परिसर सिल म्हणजेच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार १७ जुलै ते शुक्रवार २४ जुलै या कालावधीत हा लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या कालावधीत मेडिकल आणि दूध विक्री […]

Continue Reading 0
WhatsApp Image 2020-07-03 at 4.55.40 PM

विज बिल माफ करण्याकरता सी.आय.टी.यूच्यावतीने पवई विभागात आंदोलन

लाॅकडाऊनच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात येणारे विज बिल माफ करण्याकरता तसेच केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना दरमहा दहा हजार रुपये प्रति व्यक्ती खात्यात जमा करण्यासाठी सी.आय.टी.यूच्यावतीने पवई विभागातील चैतन्यनगर भागात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.

Continue Reading 0
DCP Thakur Vishal copy

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई; परिमंडळ १० मध्ये १७५८ गाड्या जप्त

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलीस आता पुढे सरसावली असून, विनाकारण घराबाहेर पडून नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. मुंबई पोलिसांतर्फे केल्या गेलेल्या कारवाईत परिमंडळ १० च्या हद्दीत येणाऱ्या पवई, साकीनाका, एमआयडीसी, अंधेरी आणि मेघवाडी पोलीस ठाणे परिसरात दोन दिवसात १७५८ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबई परिसरात या परिमंडळात सर्वाधिक […]

Continue Reading 0
Leopard IIT Bombay_90

आयआयटी बॉम्बे परिसरात दिसला बिबट्या

संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असताना वन्यजीव, पक्षी हे मात्र मुक्त संचार करत आहेत. असाच संचारासाठी बाहेर पडलेला एक बिबट्या (Leopard) नुकताच आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) परिसरातील लायब्ररी जवळील झाडीत दिसून आला (spotted) आहे. याबाबत आयआयटी बॉम्बेकडून पुष्टी सुद्धा करण्यात आली आहे. हा बिबट्या येथील काही कर्मचाऱ्यांना झाडीत बसलेला दिसल्यानंतर त्यांनी फोन आणि कॅमेऱ्याने त्याचे फोटो […]

Continue Reading 0
leopard trap raheja vihar

रहेजा विहारमध्ये दिसला बिबट्या? नागरिकांकडून सावधानता

पवईतील रहेजा विहार (Raheja Vihar) परिसरातील एका इमारतीच्या सुरक्षा भिंतीजवळ बिबट्या (Leopard) दिसल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांनी ट्वीटद्वारे दिली आहे. याबाबत वन विभागाकडून अजून पुष्टी करण्यात आली नाही. वन विभागातर्फे बिबट्याची उपस्थिती पडताळण्यासाठी कॅमेरा सापळा लावण्यात आला आहे. मात्र हे जर सत्य असेल तर लॉकडाऊनमध्ये वन्य प्राणी सिमेंटच्या जंगलात फेरफटका मारत असल्याचे नाकारता येणार नाही. […]

Continue Reading 0
lockdown police action2

विनाकारण फिरणे पवईकरांना पडले महागात; मोठ्या प्रमाणात दुचाकी जप्त

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या अनेकांना पोलिसांनी आपल्या दांड्याने प्रसाद दिला आहे. मात्र त्यानंतरही अनेक तरुण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत असल्याने याबाबत पवई पोलिसांनी ठोस पाऊले उचलत विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहन धारकांवर १८८ नुसार गुन्हे नोंद करून वाहने जप्त करण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त […]

Continue Reading 0
powai blood donation1

पवई पोलिसांनी केलं असंही संरक्षण; पोलीस कर्मचाऱ्यांचे रक्तदान

@प्रमोद चव्हाण | कोविड – १९ रुग्णांचा महाराष्ट्रातील वाढता आकडा पाहता आणि पुढील काळात रक्ताचा तुटवडा भासू शकतो याला पाहता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. दिवसरात्र खाकीच्या माध्यमातून मुंबईला सुरक्षा पुरवणाऱ्या आणि कायदा – सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पवई पोलीस ठाण्यात कार्यरत विजय घागरे, अंबादास काळेल, शिवराज कोळी यांनी […]

Continue Reading 0
powai blood donation2

पवईत हायजेनिक रक्तदान शिबीर

@रविराज शिंदे, रमेश कांबळे: देशात कहर माजवणाऱ्या कोरोना वायरसशी लढा लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. देशात लॉकडाऊन असून, या काळात रक्ताची कमतरता जाणवण्याची शक्यता असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी छोट्या छोट्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आव्हान केले होते. या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर पवई बीजेपी वॉर्ड १२२ तर्फे आयआयटी पवई येथील जैन मंदिर हॉलमध्ये […]

Continue Reading 0
bazaar4

संचारबंदी कालावधीत पवईत दामदुप्पट किमतीने भाजीपाला विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पोलीस, समाजसेवकांची तंबी

कोविड – १९ आजाराने जगभराला आपल्या विळख्यात घेतलेले असताना, नोविड कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पसरत जाणारया या आजाराला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने देशभर संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. २५ मार्च पासून लागू झालेले संचारबंदी आदेश २१ दिवसांकरिता असणार आहेत. या कालावधीत फक्त जीवनाश्यक वस्तू, मेडीकल, दूध, भाजीपाला, फळे विक्री सारखी दुकाने सुरू ठेवण्याकरिता […]

Continue Reading 0
magar (crocodile) bhandup paws mumbai

सात फुट लांब मगरीला पॉज मुंबईचे जीवनदान

संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असून, आवश्यकता नसताना कोणालाही घरातून बाहेर निघण्याची अनुमती नसताना शिकारीच्या शोधात बाहेर पडलेल्या ७ फुट लांब ७२ किलो वजनाच्या मगरीला पॉज मुंबई च्या प्राणीमित्रांनी तिला पकडून जीवनदान दिले आहे. नंतर तिला नैसर्गिक वास्तव्यात सोडून देण्यात आले आहे. भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जलवाहिनीखाली ही मगर आढळून आली होती. पूर्ण मुंबई शहर लॉकडाऊनमध्ये असताना […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!