Tag Archives | Nahar Amrit Shakti

firing nahar amrit shakti chandivali

कौटुंबिक वादातून नहारमध्ये ५५ वर्षीय इसमाची गोळ्या घालून हत्या

चांदिवली, नहार अम्रित शक्ती येथे राहणारे ५५ वर्षीय इसम इबनी हसन यांची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना आज दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास नहार कॉम्प्लेक्स, गेट क्रमांक ७ जवळ घडली. कौटुंबिक वादातून त्यांच्या जवळच्या नातेवाईकाने ही हत्या केल्याची प्रथमदर्शनी समोर येत आहे. हत्येनंतर आरोपी नातेवाईकाने साकीनाका पोलीस ठाण्यात हजर होत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. इमाम उद्दीन […]

Continue Reading 0
transplant-deceased-building with decease

केसांच्या प्रत्यारोपणानंतर ५० तासांनी व्यावसायिकाचा मृत्यू

चांदिवली येथील ४३ वर्षीय व्यावसायिकाने चिंचपोकळी येथील खाजगी रुग्णालयात केलेल्या केसांच्या प्रत्यारोपणानंतर ५० तासांनी शनिवारी त्यांचे निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील लॉजिस्टीक व्यवसायाचे मालक श्रवण कुमार चौधरी यांना शुक्रवारी चेहऱ्यावर सूज येवून, गंभीर श्वासोच्छवासाची तक्रार जाणवू लागल्यानंतर हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेथे उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी सकाळी ६.४५ वाजता मृत्यू झाला. साकीनाका […]

Continue Reading 0
chandivali mini fire station main

चांदिवलीत मिनी अग्निशमन केंद्र सज्ज

चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार या परिसरात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना रोखण्यासाठी चांदिवली येथे नुकतेच मिनी अग्निशमन केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे. चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार परिसरात गेल्या काही वर्षात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणत वाढल्या असतानाच यासाठी अग्निशमन दल मरोळ किंवा विक्रोळी भागातून पाचारण करण्यात येते. लेकहोमच्या घटनेमुळे तर संपूर्ण मुंबईला हादरवून सोडले होते. अग्निशमन […]

Continue Reading 0

चांदिवलीत लवकरच बनणार विस्तारित अग्निशमन केंद्र

@अविनाश हजारे, @सुषमा चव्हाण चांदिवली, पवई, हिरानंदानी, रहेजा विहार या परिसराचा होणारा विस्तार आणि घडणाऱ्या दुर्दैवी घटनांना रोखण्यासाठी लवकरच चांदिवली येथे मरोळ अग्निशमन केंद्राचे विस्तारीत अग्निशमन केंद्र उभे करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात आमदार नसीम खान यांच्यासह मुंबई अग्निशमन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी एस. के. बांगर, एच. आर. शेट्टी तसेच महानगरपालिका ‘एल’ ईमारत विभागाचे श्री. पगारे […]

Continue Reading 0

तुमची मते, तुमचे विचार आणि परिसरातील समस्या, अडी-अडचणी, चांगल्या वाईट गोष्टी तुमच्याच भाषेत मांडणारे आपले माध्यम म्हणजेच ‘आवर्तन पवई’.

मला इंग्रजी उत्तम येते परंतू मी विचार मराठीत करतो. मला इंग्रजी येत नाही परंतू मला भरपूर काही बोलायचे आहे. मला माझ्या शब्दात माझ्या भाषेत बोलायला देणार माध्यमच नाहीये. अश्या सर्वांसाठी त्यांचे सर्वांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे ‘आवर्तन पवई’. तुमची मते, तुमचे विचार आणि परिसरातील समस्या, अडी-अडचणी, चांगल्या वाईट गोष्टी तुमच्याच भाषेत मांडणारे आपले माध्यम म्हणजेच ‘आवर्तन […]

Continue Reading 3

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!