पालिकेने ३ जानेवारी २०१८ रोजी आपल्या वेबसाईटवर घोषित केलेल्या हॉकिंग झोनच्या यादीमध्ये पवईतील हिरानंदानीतून हॉकिंग झोन हटवल्याचे दाखवत असतानाच आयआयटी भागात मात्र बनणाऱ्या हॉकिंग झोन्समध्ये वाढ केली आहे. या निर्णयामुळे येथील नागरिक सुद्धा निराश झाले असून, त्यांनी याला आपला कडक विरोध दर्शवला आहे. सोशल माध्यमातून याची जनजागृती करत लोकांनी पालिकेच्या समोर आपला विरोध ठेवला आहे. […]
Tag Archives | objections
हिरानंदानी हॉकिंग झोन मुक्त?
हिरानंदानी रहिवाशांसाठी आनंदाची बातमी असून, गेल्या दोन महिन्यांपासून हिरानंदानी परिसरात येणाऱ्या हॉकिंग झोनला घेवून असणारी टांगती तलवार पालिकेने जाहीर केलेल्या नव्या यादीनुसार आता त्यांच्यावरून हटली आहे. पालिकेने ३ जानेवारी २०१८ रोजी आपल्या वेबसाईटवर घोषित केलेल्या हॉकिंग झोनच्या यादीमध्ये पवईतील हिरानंदानीत इस्ट अव्हेन्यू रोड वगळता कोणत्याच रस्त्यावर हॉकिंग झोन दाखवण्यात आलेले नाही. यावरून २०१४ साली झालेल्या […]
फेरीवाला क्षेत्राच्या विरोधात नागरिकांचा मोर्चा
@प्रमोद चव्हाण पालिका ‘एस’ वार्ड अंतर्गत येणाऱ्या पवईतील हिरानंदानी परिसरातील सर्व रस्त्यांना हॉकिंग झोन घोषित करण्यात आले आहे. फेरीवाले येण्याने होणाऱ्या त्रासाला रोखण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता हिरानंदानी गार्डन रहिवाशी फेडरेशनतर्फे हिरानंदानी येथे शांततापूर्वक विरोध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध समाजसेवी संस्थांसह, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. अधिकृत […]
पवई फेरीवाला क्षेत्राच्या घेऱ्यात; नागरिकांचा हॉकिंग झोनला विरोध
@प्रमोद चव्हाण पालिका ‘एस’ वार्ड अंतर्गत येणाऱ्या पवईतील हिरानंदानी, आयआयटी आणि फिल्टरपाडा भागात मिळून २१२६ ओट्यांना मान्यता देण्यात आली आहे. हिरानांदानीतील सर्व रस्त्यांना हॉकिंग झोन घोषित केल्याने नागरिकांचा तीव्र विरोध. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हॉकिंग झोन अंतर्गत मुंबईतील २४ विभागांमध्ये २२०९७ ओट्यांना मान्यता देण्यात आली आहे. फेरीवाल्यांनी व्यवसाय कुठे बसून करावा म्हणजेच फेरीवाला क्षेत्र (हॉकिंग […]