एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या विधवा महिलेला वारंवार फोन करून आणि तिचा पाठलाग करून जेरीस आणणाऱ्या एका माथेफिरूला पवई पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सतीश शिंदे (२४) असे या तरुणाचे नाव असून पवई येथील तुंगागाव परिसरात हा तरुण आपल्या आईसोबत रहावयास आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या एका खाजगी कंपनीत काम […]
Tag Archives | Powai Lake
पवई आरे मार्गाचे १८.३० मीटरपर्यंत रुंदीकरण
पवई-आरे मार्गाचे रुंदीकरणात पवई उद्यानाचा भाग जाण्याची शक्यता. पवईकडून आरेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. १२ मीटर रुंदीच्या या रस्त्याला १८.३० मीटरपर्यंत वाढविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. मात्र, यासाठी पवई उद्यानाचा जवळपास १,६१२ चौरस मीटरचा भाग जाणार असल्याची माहिती समोर येत असल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता […]
पवई तलाव स्वच्छतेची आमदारांकडून पाहणी
पवई तलावाची (Powai Lake) दुर्दशा होत चाललेली असतानाच स्थानिक आमदार (MLA) आणि नगरसेविका (Corporator) यांच्या पाठपुराव्याने पवई तलावाने पुन्हा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेतर्फे (BMC) पवई तलावातील जलपर्णी (water hyacinth) काढण्याच्या कामाला आमदार दिलीप मामा लांडे (MLA Dilip Mama Lande) यांच्या हस्ते सोमवारपासून सुरुवात झाली असून, आमदार लांडे यांनी आठवड्याभरानंतर आज, २३ जानेवारीला या […]
जेवीएलआरवर पुन्हा अपघात; एकाचा मृत्यू
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेवीएलआर) पवई प्लाझा येथे झालेल्या अपघातात कचऱ्याच्या ट्रकने एका महिलेला चिरडल्याच्या घटनेला २ दिवस झाले नसतील की सोमवार, १७ जानेवारीला याच मार्गावर झालेल्या अजून एक अपघातात ५५ वर्षीय पुरुषाला आपला जीव गमवावा लागला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करत हलगर्जीपणाने गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल खाजगी बस चालक रामबाबू दास (३६) […]
पवई तलावातील जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात
पर्यटकांचे खास आकर्षण असणाऱ्या पवई तलावाची पाठीमागील काही वर्षात दुर्दशा होत चालली आहे. पवई तलावात सोडले जाणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणी दूषित होवून तलावात जलपर्णी निर्माण झाल्या आहेत. तलावाच्या किनाऱ्यावरील सुशोभिकरण दुर्लक्षित झाल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पालिका आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे पवई तलावाला हे दिवस भोगावे लागले आहेत. मात्र आता या संकटापासून तलावाला मुक्ती मिळणार असून, […]
पवई तलावाजवळ कारला आग
पवई तलाव मुख्य गणेशघाटाजवळ एका कारला आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, घटनेत गाडीचे जळून मोठे नुकसान झाले आहे. टूअर्स अंड ट्राव्हल कंपनीसाठी काम करणारे राजेंद्रकुमार मेहतो हे नेहमी प्रमाणे आपल्या वेगेनॉर गाडीतून (क्रमांक एमएच ०४ जिडी ५१६७) प्रवासी घेवून जेवीएलआर मार्गे कांजूरच्या दिशेने जात होते. […]
चीनमधील कंपनीचे बनावट ईमेल खाते तयार करून व्यावसायिकाची ३.३ लाख रुपयांची फसवणूक
पवईस्थित एका ५५ वर्षीय व्यावसायिकाची चीनस्थित कंपनीकडून व्यवसायासाठी सुटे भाग मागवण्याच्या बहाण्याने ३.३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदाराने खात्यात पैसे पाठवल्यानंतरही जेव्हा त्याला शिपमेंट प्राप्त झाले नाही तेव्हा त्याने कंपनी आणि बँकेकडे तपासणी केली असता त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पवई पोलिस ठाण्यात फसवणूक आणि तोतयागिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला […]
पवई सायकल ट्रॅकच्या ‘सार्वजनिक सभेबाबत नागरिकांची पालिका आयुक्तांना तक्रार; सार्वजनिक सभा झाल्याचे पालिकेने नाकारले
वादग्रस्त पवई सायकल ट्रॅक प्रकल्पाबाबत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांच्या गटांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे “सार्वजनिक सभे”बाबत तक्रार केली आहे. चहल यांना लिहिलेल्या पत्रात, रहिवाशांनी तक्रार केली आहे की ‘पवई तलावाचे पुनरुज्जीवन” या विषयावर २७ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु केवळ काही रहिवासी आणि कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आणि अधिकारी त्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे […]
पवईत भाजीच्या टेम्पोने शिक्षिकेला उडवले
जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर एका भाजीच्या टेम्पोने शिक्षिकेला उडवल्याची घटना आयआयटी मेनगेटजवळ घडली आहे. या संदर्भात पोलिसांनी भादवि कलम २७९, ३३८ नुसार गुन्हा नोंद करत टेम्पो चालक विजय यादव याला अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा येथून भाजी भरून टेम्पो क्रमांक एमएच ४७ एएस ५०५१ हा पहाटे गोरेगाव येथे भाजी पोहचविण्यासाठी जात […]
मासातर्फे पवईत मासेमारी स्पर्धा
महाराष्ट्र स्टेट अँग्लिंग असोसिएशन म्हणजेच मासा संस्थेतफे पवईत मासेमारी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या दरम्यान पवई तलाव येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मेंटोर आली हुसेन यांच्या स्मरणार्थ आयोजित या फिशिंग चम्पिअनशिप २०२१ स्पर्धेत पहिले बक्षीस रोख रक्कम १०००१, दुसरे बक्षीस ५००१ तर तिसरे बक्षीस […]
लोकसभेत सायकल ट्रॅकचा मुद्दा उपस्थित; प्रकल्प बंद करण्याची खासदार मनोज कोटक यांची मागणी
७ डिसेंबर रोजी पवई तलावावरील सायकल ट्रॅक प्रकल्पाचा मुद्दा भाजप खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत उपस्थित केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅकमुळे पवई तलावातील जैवविविधतेला धोका असल्याने हा प्रकल्प लवकरात लवकर थांबवावा अशी मागणी कोटक यांनी केली. पर्यावरण तज्ज्ञांच्या समितीने यापूर्वी सायकल ट्रॅकच्या बांधकामाचे सर्वेक्षण करून हे काम तातडीने थांबविण्याची मागणी केली होती. […]
महागाईच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस ब्लॉक १२२ तर्फे पदयात्रेचे आयोजन
देशात वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने सुरू केलेल्या जन जागरण अभियानाअंतर्गत ब्लॉक क्रमांक १२२च्यावतीने २८ नोव्हेंबर रोजी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई काँग्रेस सचिव डॉ. त्रिलोकीनाथ मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत कपिल देव सिंग, जिल्हा उपाध्यक्ष विजय तिवारी, महेश लिप्चा, गणेश शिंदे, ब्लॉक अध्यक्ष प्रदीप वर्मा, सुनील सिंग, भरत सिंग, अजमत अली […]
पवई तलाव वाचवण्यासाठी पवईकर-चांदिवलीकरांचा कँडल मार्च
पवई तलावाच्या स्वरुपात मुंबईकरांना मिळालेली नैसर्गिक देणगी हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पवई तलावासोबतच येथील सुंदर जैवविविधतेचे संवर्धन होणे आवश्यक असल्याने या तलावाला वाचवण्यासाठी शनिवारी १३ नोव्हेंबरला पवई चांदिवली स्वच्छता, सुधार समिती, हेल्पिंग हँड्स अँड ह्युमॅनिटी आणि गणेश युवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पवई तलावावर कँडल मार्च रॅली काढण्यात आली. पवईची शान असलेल्या सुंदर […]
पवई तलावाजवळील सायकल ट्रॅकला ३१ जानेवारीपर्यंत हायकोर्टाची स्थगिती
मुंबई महापालिकेचा पूर्व उपनगरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या पवई तलावाजवळ बनवण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅक प्रकल्पाच्या कामाला दिलेली स्थगिती हायकोर्टाने ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता बारगळल्याची चर्चा आहे. या प्रकल्पाविरोधात आयआयटी पवईतील दोन विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ज्यावर मंगळवारी सुनावणी झाली. मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी आणखीन वेळ […]
पवई तलावातील सायकल ट्रॅक प्रकल्पाविरोधात पवईकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पवई तलाव वाचवा मोहिमेला आता चांगलीच गती मिळाली असून, पवई तलावातून आणि सभोवतालच्या परिसरातून जाणाऱ्या सायकल ट्रॅकच्या विरोधात पवईकरांच्या एका गटाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तलावाच्या आतील भागातून सायकल ट्रॅकच्या बांधकामावर त्यांनी धक्का व्यक्त करताना हा प्रकल्प किती हानिकारक आहे याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. पवईकर […]
शाब्बास रे वाघा ! पाठलाग करून एकट्याने पकडले दोन मोबाईल चोर
मुंबई पोलिसांच्या कार्यामुळेच मुंबई पोलिसांनी स्कॉटलंड यार्ड नंतर द्वितीय स्थान कमावले आहे. ते तेवढेच खरे सुद्धा असल्याची प्रचिती नुकतीच पवई परिसरात आली. आपले कर्तव्य संपवून परतत असताना दोन मोबाईल चोर चोरी करून पळत असल्याचे दिसताच पवई पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पठारे यांनी कसलाच विचार न करता त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या […]
पवई तलावावर बाप्पांना भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर ! या अशा गर्जनेत, ढोल-ताशांच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे बुधवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. शुक्रवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर रविवारी दीड दिवसाच्या आणि बुधवारी […]
पवई तलावात विसर्जनासाठी जाताय सावधान; तलावात मगरीचा वावर
पवई तलावात विसर्जनासाठी जाणाऱ्या नागरिकांना पालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे पाण्यात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. मंगळवारी पवई तलाव भागात मगरीचा वावर आढळून आला. पवई तलावामध्ये असलेल्या मगरींचा वावर पाहतात पवई तलावात थेट गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पाण्यामध्ये उतरण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे. गणेश विसर्जनासाठी पवई तलाव परिसरामध्ये पालिका प्रशासनाकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली […]
पवई तलाव डॅमवर भिजायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
पवई तलाव डॅम भागात शुक्रवारी एक १३ वर्षीय मुलाचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. २ दिवसांपासून बेपत्ता असणारा हा मुलगा आपल्या काही मित्रांसोबत येथे फिरण्यासाठी आला होता. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीमरी येथे राहणारा वैष रईस खान हा आपल्या काही मित्रांसोबत पवई तलाव भागात फिरण्यासाठी आला होता. डॅमवर आल्यावर त्यांना भिजण्याचा मोह आवरला नाही […]
पवई तलावात सापडला ५५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह
शुक्रवार, १८ जून रोजी पवई तलावात एका पंच्चावन वर्षीय पुरुषाचा मृतदेह पवई पोलिसांना मिळून आला आहे. शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेले असता बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी आलेल्या लोकांना एक मध्यम वयाच्या पुरुषाचे शरीर पाण्यावर निश्चल पडलेले आढळून आले. याबाबत माहिती मिळताच […]