Powai police have arrested two members of a gang involved in stealing Zoomcar company cars. The arrested- accused were identified as Jagdish Sohanram Bishnoi (23) and Mahendra Ratiram Godara (19). Powai police also have seized six stolen vehicles from Rajasthan. The arrest of the duo has exposed a gang involved in car thefts across the country, including Mumbai […]
Tag Archives | Powai Lake
झुम कार कंपनीच्या कार चोरी करणाऱ्या टोळीच्या दोन सदस्यांना अटक; सहा गाड्या हस्तगत
@प्रमोद चव्हाण झुम कार कंपनीची हुंडाई क्रेटा मोटार कार पवई येथून भाड्याने बुक करून, तिचे जिपीएस. सिस्टम काढून चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जगदिश सोहनराम बिष्णोई (२३) आणि महेंद्र रतीराम गोदारा (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पवई पोलिसांनी चोरी केलेल्या ६ गाड्या राजस्थान येथून ताब्यात घेतल्या आहेत. […]
पवई तलावाची दुरुस्ती; पालिका गळती रोखून सुरक्षित करणार तलाव
मुंबईची शान मानल्या जाणाऱ्या पवई तलावाची सगळ्याच बाजूने दुर्दशा होण्याच्या मार्गावर असतानाच महानगरपालिका प्रशासनाने आता याच्या दुरुस्तीसह गळती रोखण्याच्या निर्णय घेतला आहे. पश्चिम उपनगरातील महत्वाच्या काही पर्यटन स्थळांपैकी एक असणाऱ्या पवई तलाव भागास लाखोंच्या संख्येने पर्यटक भेटी देत असतात. मात्र, गेल्या काही वर्षात तलाव भागात आणि तलावाच्या झालेल्या दुर्दशेमुळे पर्यटक याकडे पाठ फिरवू लागले आहेत. […]
UNDP India’s Plastic Waste Management team conducted a Christmas Clean-up Drive to educate the community on waste management
Press Release Young Environmentalists Programme Trust Mumbai in partnership with UNDP India’s Plastic Waste Management team conducted a Christmas Clean-up Drive at the Powai Lake on Wednesday, 23rd December to educate the community on waste management. Keeping social distancing and PPE in place participants came together and collected plastics from the Powai Lake source areas […]
पवई तलाव परिसराला नशेखोरांचा विळखा; तरुणांचे जनजागृती अभियान
@अविनाश हजारे – मुंबईतील पवई तलाव हे मुंबईकरांसाठी आकर्षणाचे ठिकाण राहिलेले आहे. या निसर्गरम्य पवई तलावाला असंख्य पर्यटक भेटी देत असतात. परंतु, पोलीस व पालिकेचा वचक नसल्याने या भागात नशेखोरांनी विळखा घातला आहे. पवई तलाव ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंतच्या परिसरात कायमच काळोखाचे साम्राज्य असल्याने नशेखोरांचे फावत असून, येथील विविध ठिकाणी गर्दुल्ले आणि दारुडे गट […]
हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने पवई तलाव भागात ‘क्लीन अप मोहीम’
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या निमित्ताने हॅपी टू हेल्प फाउंडेशनच्यावतीने पवई तलाव भागात ‘क्लीन अप मोहीम’ आयोजित केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात तरुण, शालेय विद्यार्थी आणि पवईकरांनी यात सहभाग नोंदवला. आपल्या सर्वांना जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच ताजी हवा, हिरवेगार सभोवतालचे वातावरण आणि स्वच्छ पाण्याची गरज आहे. अर्थातच पर्यावरण रक्षण ही सध्या मोठी गरज होवून बसली आहे. […]
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात पवईमध्ये आंदोलन, मानवी साखळी
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्ली येथे गेल्या १६ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान सहा ते सात चर्चांनंतरही सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्यात तोडगा निघू शकलेला नाही. याच पार्श्वभूमीवर पवईमध्ये सुद्धा विविध पक्ष, संघटना आणि नागरिकांच्यावतीने आंदोलने करण्यात आली. पवईतील […]
व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या सराईत भामट्याला अटक
मुंबईतील विविध व्यापाऱ्यांची फसवणूक करून लाखो रुपयांसह त्यांचा मालाचीही लूट करणाऱ्या सराईत भामट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप अगरवाल उर्फ प्रेमप्रकाश उर्फ राजू जगदीश मखिजा (३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईतील धोबी तलाव भागात राहणारे नरेंद्र तारी यांची सावंतवाडी येथे काजूची बाग आहे. सदर बागेत येणाऱ्या काजूची विक्री करण्यासाठी त्यांचा मुलगा […]
दुकान फोडून दीड लाख किंमतीचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई येथील तुंगागाव भागातील राम मोबाईल शॉप फोडून त्यातील मोबाईल, ब्ल्यूटूथ, चार्जर, युएसबी केबल असे १.४२ लाख रुपये किंमतीचे साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. शादाब मोमीन अन्सारी (२६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राम प्रसाद नारायण यांचे तुंगागाव येथे राम मोबाईल शॉप नामक मोबाईल रिपेअरिंगचे दुकान आहे. १४ […]
बलात्कारच्या गुन्ह्यात एकाला अटक
आपल्या सहकारी मैत्रिणीसोबत बलात्कार करणाऱ्या एका इसमाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इसाकी हरिश्चंद्र पांडीधर (३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आपल्यासोबत काम करणाऱ्या महिलेशी मैत्री करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी इसाकी आणि तक्रारदार महिला हे दोघेही एकाच लॅबमध्ये काम करतात. लॅबमध्येच त्यांची ओळख […]
पवईत पुलाचा भाग कोसळला; आरेकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद
पूल धोकादायक असल्याने आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली असून, प्रवाशांनी जेवीएलआर मार्गे प्रवास करण्याचे आवाहन पालिका आणि वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. पवईतील आरे कॉलोनीकडे जाणारया मार्गावर असणारा मिठी नदीवरील पुलाचा भाग कोसळल्याची घटना शनिवारी घडली. विशेष म्हणजे २ वर्षापूर्वी हा पूल धोकादायक घोषित करण्यात आला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव […]
लष्करात अधिकारी असल्याचे सांगून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला पवई पोलिसांनी केली अटक
पवई पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि तोतयागिरीच्या आरोपाखाली एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. करण शेट्टी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका २९ वर्षीय महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीनंतर पवई पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने भारतीय सैन्य दलातील अधिकारी असल्याचा दावा करत तिला लग्नाची बनावट आश्वासने देवून लैंगिक अत्याचार केल्याचे तिने या तक्रारीत म्हटले […]
१८ वर्षीय तरुणाचा खून केल्याप्रकरणी तिघांना अटक
पवई तलावावर एका अठरा वर्षीय तरुणाचा खून केल्याच्या आरोपावरून मुंबई गुन्हे शाखा युनिट १० अधिका-यांनी मंगळवारी तीन जणांना अटक केली आहे. विनोद नंदलाल ठाकूर, शशांक रामचंद्र जाधव आणि निकेश गंगाराम जाधव अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, मृतक तनवीर नदाफ पवई तलाव भागात फिरत असताना आरोपी आणि नदाफ दोघांच्यात शाब्दिक वाद […]
तृतीयपंथीयांच्या सन्मानार्थ पवई धावली
@अविनाश हजारे – सर्वच समाजघटकांचा सामाजिक स्तर उंचावत असताना या प्रक्रियेत कायमच दुर्लक्षित राहिलेल्या नव्हे; ठेवल्या गेलेल्या तृतीयपंथी घटकाला समाजात सन्मानाचे जीवन जगण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. त्यांची समाजातील ओळख नव्याने करून देण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ पवई येथे शनिवारी ‘वर्ल्ड वॉकिंग डे’चे आयोजन करण्यात आले. ‘ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोर्ट्स अँड फिटनेस फॉर ऑल’ या […]
खून करून पसार झालेल्या दोन्ही आरोपींच्या पवई पोलिसांनी आवळल्या मुसक्या
चांदिवली येथे खानावळ चालवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाचा चाकूने भोकसून खून करून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पवई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. उधारीवर जेवण देण्यास नकार दिला म्हणून हा खून करण्यात आला होता. विपुल सोळंकी (२२) आणि प्रकाश सोळंकी (२५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि अॅक्टिव्हा मोटारसायकल सुद्धा हस्तगत […]
छातीत धारदार शस्त्राने भोकसून खून; बेवारस व्यक्तीची पटली ओळख
शनिवारी पवईतील फुलेनगर भागातील डोंगराळ भागात मिळालेल्या अनोळखी पुरुषाच्या शवाची ओळख पटली आहे. भांडूप पश्चिम येथील रमाबाई नगर येथे राहणाऱ्या प्रशांत राणे नामक व्यक्तीचे ते असल्याचे उघड झाले आहे. अज्ञात व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पवई पोलीस त्याच्या खुनामागील कारण आणि आरोपी यांचा शोध घेत आहेत. फुलेनगर येथील डोंगरभागात तलावाजवळ झुडूपातून वास येत असून, एक […]
चैतन्यनगर घरफोड्यांच्या मास्टरमाइंडला अटक
पवई, चैतन्यनगर भागात घडणाऱ्या घरफोड्या आणि चोऱ्यांच्या मास्टरमाइंडला पवई पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अनिल उर्फ बंटी सुरेश वर्मा (२८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचे दागिने, लॅपटॉप हस्तगत केले आहेत. अजूनही काही चोऱ्यांची उकल त्याच्याकडून होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पाठीमागील काही दिवसात पवई परिसरात आणि विशेषतः चैतन्यनगर आणि आसपासच्या […]
टीव्ही पळवणाऱ्या चोराला दुसऱ्या चोरीच्या तयारीत असताना अटक
चैतन्यनगर भागातील एका घरातून टीव्ही चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी १२ तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. सुनुज गुलाब सरोज (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. घरात आयपीएलसह इतर कार्यक्रम पाहण्यासाठी त्याने ही टीव्ही चोरी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी पवई परिसरात घडलेल्या एका घटनेत चोरट्यांने घरात प्रवेश करत घरातील टीव्ही पळवल्याचे समोर आले होते. […]
हिरानंदानीजवळ ‘पोलिस के आदमी’ असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाचे सोन्याचे दागिने पळवले
हम पोलिस के आदमी है | तुम्ही सोन्याचे दागिने घालून फिरू नका. दागिने काढून बॅगेत ठेवा असे सांगत एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे हातचलाखीने ९० हजार किंमतीचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना मंगळवारी पवई, एसएम शेट्टी शाळा बस थांब्याजवळ घडली. या संदर्भात पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु आहे. पवईतील आयआयटी स्टाफ […]
आता तर हद्दच झाली राव; चोरट्यांनी चक्क टीव्हीच पळवली
पाठीमागील काही दिवसात पवई परिसरात आणि विशेषतः चैतन्यनगर आणि आसपासच्या भागात चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. जवळपास दर दोन तीन दिवसांनी चोरीच्या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रविवारी पवई परिसरात घडलेल्या एका घटनेत तर चोरट्यांनी घरात काहीच मौल्यवान वस्तू न मिळाल्याने चक्क घरातील एक टीव्ही आणि बूट पळवल्याचे समोर येत आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात […]