७ डिसेंबर रोजी पवई तलावावरील सायकल ट्रॅक प्रकल्पाचा मुद्दा भाजप खासदार मनोज कोटक यांनी लोकसभेत उपस्थित केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या सायकल ट्रॅकमुळे पवई तलावातील जैवविविधतेला धोका असल्याने हा प्रकल्प लवकरात लवकर थांबवावा अशी मागणी कोटक यांनी केली. पर्यावरण तज्ज्ञांच्या समितीने यापूर्वी सायकल ट्रॅकच्या बांधकामाचे सर्वेक्षण करून हे काम तातडीने थांबविण्याची मागणी केली होती. […]
Tag Archives | powai news
महागाईच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस ब्लॉक १२२ तर्फे पदयात्रेचे आयोजन
देशात वाढत्या महागाईच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसने सुरू केलेल्या जन जागरण अभियानाअंतर्गत ब्लॉक क्रमांक १२२च्यावतीने २८ नोव्हेंबर रोजी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई काँग्रेस सचिव डॉ. त्रिलोकीनाथ मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत कपिल देव सिंग, जिल्हा उपाध्यक्ष विजय तिवारी, महेश लिप्चा, गणेश शिंदे, ब्लॉक अध्यक्ष प्रदीप वर्मा, सुनील सिंग, भरत सिंग, अजमत अली […]
मुंबईतील रिक्षा चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; ४ जणांना अटक
मुंबईतील विविध भागात रिक्षा चोरी करणाऱ्या टोळीच्या ४ सदस्यांना आरे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षा चोरून संबंधित रिक्षाची नंबर प्लेट बदलून काही रिक्षा चालकांना तीनशे रुपये प्रमाणे भाड्याने चालवायला देत तर काही रिक्षा नाममात्र किंमतीला विकत. पोलिसांनी नालासोपारा, अंधेरी, गोरेगाव परिसरातून ६ […]
पवईत सर्विस सेंटरला भीषण आग; जीवित हानी नाही
पवईतील साकीविहार रोडवर लार्सन एंड टूब्रो कंपनीसमोर असणाऱ्या साई ऑटो हुंडाई सर्व्हिस सेंटरला आग लागल्याची घटना आज, गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने वेळीच कर्मचाऱ्यांना बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीची घटना एवढी भयानक होती कि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या १० बंब आणि फायर इंजिन कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळपास २ तासानंतर […]
ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; जम्मू काश्मीरहून मुंबईत आणलेला १४ कोटींचा चरस जप्त, ४ जणांना अटक
मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात मोठी कारवाई करत ड्रग्स तस्कर महिलेला अटक करत तिच्याकडून तब्बल ७ किलो हिरोइन जप्त केले असतानाच आता जम्मू काश्मीरशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत पवई आणि अंधेरी स्थित २ जोडप्यांकडून २४ किलो चरस जप्त केले आहे. पकडलेल्या २४ किलो चरसची […]
ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये पवईच्या अपेक्षा फर्नांडिसचा विक्रम
पवईकर जलतरणपटू अपेक्षा फर्नांडिस हिने ज्युनियर नॅशनल अॅक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत आणि सर्व ४ जलतरण शर्यतींमध्ये पदके जिंकत अजून एक विक्रम नोंदवला आहे. २०० मीटर वैयक्तिक मेडलीमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण; ५० एमटी ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण; २०० मीटर बटरफ्लाय स्ट्रोकमध्ये सुवर्णपदक तर १०० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य पदक मिळवत सिनियर नॅशनलच्या विद्यमान भारताच्या […]
मोटारसायकल चोरट्याने अर्ध्या तासात उलगडली गाडी; तासाभरात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई पोलीस ठाणे हद्दीपासून काहीच अंतरावर पार्क केलेली मोटारसायकल पळवून नेऊन अर्ध्या तासात त्याचे पार्ट काढून विकण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या तासाभरात बेड्या ठोकल्या आहेत. इब्राहीम अकबर शेख उर्फ झिपी (२०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी मोहमद गणी शेख हे कुर्ला कोर्टाजवळ राहतात. १८ तारखेला त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्याने ते […]
अट्टल रिक्षा चोराला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवईसह मुंबई परिसरात रिक्षा चोरी करणाऱ्या अट्टल चोराला पवई पोलिसांनी रविवारी बेड्या ठोकल्या आहेत. शांताराम अशोक धोत्रे (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. धोत्रे याच्या विरोधात मुंबईत अशाच प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असून, १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आला होता. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरज पंडित हे भाडेतत्वावर रिक्षा चालवतात. त्यांच्या ताब्यातील चालवण्यासाठी […]
जबरी चोरीच्या गुन्ह्यात तडीपार आरोपीसह २ जणांना अटक
अंगावर गाडी घातल्याचा खोटा बहाणा करून एका कारचालकाला संगनमत करून जबरी लुटणाऱ्या ३ जणांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक तिन्ही आरोपी पवई परिसरातील रहिवाशी आहेत. यातील एक आरोपी अभिलेखावरील सराईत आरोपी असून, त्याला एक वर्षा करीता मुबंई, पालघर, ठाणे परिसरातून हद्दपार केले असताना त्याने हा गुन्हा केला आहे. फिर्यादी हे हिरानंदानी, पवई येथील ‘जनरल […]
पवई पोलिसांनी मोटार सायकल चोराला ठोकल्या बेड्या
पवई परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका तरुणाला पवई पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. संकेत रामचंद्र गोरे (वय २० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरु असून, मुंबईत अजून कोठे अशा प्रकारचे गुन्हे नोंद आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत. फिर्यादी नामे अतिन […]
विमानाने प्रवास करून २८० पेक्षा अधिक घरफोड्या करणाऱ्या तिकडीला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
सुमारे तीन आठवड्यांपूर्वी पवईतील हिरानंदानी भागातील सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याच्या घरातून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू असा २४.७१ लाखांचा डल्ला मारल्याच्या आरोपाखाली पवई पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. जलवायू विहार येथे राहणारे माजी नौदल अधिकारी पत्नीसह आगरतळा येथे गेले होते. आपल्या घराची चावी त्यांनी घरकाम करणारी बाई शैला शिर्के यांच्याकडे सोपवल्या होत्या. “शिर्के फक्त घर […]
पवई तलावातील सायकल ट्रॅक प्रकल्पाविरोधात पवईकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पवई तलाव वाचवा मोहिमेला आता चांगलीच गती मिळाली असून, पवई तलावातून आणि सभोवतालच्या परिसरातून जाणाऱ्या सायकल ट्रॅकच्या विरोधात पवईकरांच्या एका गटाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तलावाच्या आतील भागातून सायकल ट्रॅकच्या बांधकामावर त्यांनी धक्का व्यक्त करताना हा प्रकल्प किती हानिकारक आहे याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. पवईकर […]
पवई तलावावर बाप्पांना भावपूर्ण निरोप
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर ! या अशा गर्जनेत, ढोल-ताशांच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उस्फुर्त उत्साहात अनेक घरगुती व सार्वजनिक गणपतीचे बुधवारी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देवून भावपूर्ण आणि जड अंतकरणाने विसर्जन पवई तलावाच्या दोन्ही घाटांवर करण्यात आले. शुक्रवारी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी भक्तांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर रविवारी दीड दिवसाच्या आणि बुधवारी […]
माझा बाप्पा भाग २
माझा बाप्पा
पवईकरांनो सावधान ! हिरानंदानीच्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांच्या सीसीटीव्हीची नजर, २५०० लोकांना ई चलन
पवईतील हिरानंदानी परिसरात स्थानिक भागात फिरत आहात आणि वाहतूक पोलीस नसतात म्हणून वाहतुकीचे नियम मोडत वाहन चालवत असाल तर सावधान! हिरानंदानीतील सेन्ट्रल एव्हेन्यू रोडवर असणाऱ्या वन वे रस्त्यांवर वाहतूक पोलिसांतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, वाहतूक पोलिसांतर्फे ई चलन द्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे. चार वर्षापूर्वी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल करण्यासाठी […]
डंपर चोरी करणाऱ्या आरोपीस पवई पोलिसांनी अवघ्या पाच तासात ठोकल्या बेड्या
पवई, साकीनाका भागातून डंपर चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी अवघ्या ५ तासात माग काढत अटक केली आहे. पप्पु उर्फ बहादुर राममनी आदिवाशी (वय ३० वर्षे) राहणार उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३० लाख किंमतीचा डंपर हस्तगत केला आहे. फिर्यादी मोहम्मद बिलाल छांगुर चौधरी यांनी दिनांक ७ सप्टेंबर रोजी […]
पवईत स्वातंत्र्य दिनानिमित्त १५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान
@प्रतिक कांबळे कोरोना विषाणुचा झपाट्याने होणारा प्रसार आणि त्यात भासणारा रक्ताचा अपुरा साठा लक्षात घेता पवईतील आयुष्य फांऊंडेशन संघटनेच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माता रमाबाई आंबेडकर नगर २ येथील विश्वशांती बुद्ध विहारात आयोजित या शिबिरात १५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात सायन रुग्णालयाची रक्तपेढी लाभली होती. पेढ्यामध्ये असणारा अपुरा […]
सैन्यात अधिकारी असल्याचे भासवत माजी सैनिकाला ३.५ लाखाचा गंडा
सैन्यात अधिकारी असल्याचे सांगत एका माजी सैनिकाला ३.५ लाखाचा गंडा घातल्याची घटना सोमवारी पवईत घडली आहे. या संदर्भात पवई पोलीस माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत. पवईतील हिरानंदानी भागात राहणारे मुकेश भार्गवा यांना आपले घर भाड्याने द्यावयाचे असल्याने त्यांनी याबाबत असे व्यवहार करणाऱ्या एका वेबसाईटवर आपली जाहिरात दिली होती. “जाहिरात […]
पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये साजरा झाला मन आणि शरीराच्या आरोग्याचा उत्सव
पवईतील सर्वात जुन्या असणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या पवई इंग्लिश हायस्कूलमध्ये सोमवार, २१ जून रोजी ७वा ‘जागतिक योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मोठ्या संख्येत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभाग नोंदवत योगाचे धडे गिरवले. शिक्षक आणि योगा इन्स्ट्रक्टर कोमलम सुनील आणि आर्ट ऑफ लिविंगच्या योगा इन्स्ट्रक्टर निवेदिता घोशाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन […]