Tag Archives | powai news

Screenshot

रोहित वैमुला आत्महत्येच्या निषेधार्थ पवईकरांचा रास्ता रोको

ठिकठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते व जनतेचा मूक मोर्चा, रास्ता रोको आणि कॅन्डेल मार्च हैद्राबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वैमुला याच्या आत्महत्येचे पडसाद देशभर उमटत असताना, शनिवारी सकाळी आयआयटी पवई येथील नागरिकांनी आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून व काही काळ रास्ता रोको करून आपला निषेध नोंदवला. युथ पॉवर सह धम्मदीप सोशल कल्चरल असोसिएशन, साय्यमो व्हुमन संस्था, स्वराज्य युथ […]

Continue Reading 0
छायाचित्र: माय पवई (My Powai)

हिरानंदानीत सुरक्षा रक्षक दिशाहिन बंदुकीच्या गोळीचा शिकार

घाटकोपर पोलीस प्रशिक्षण केंद्रातून दिशाहिन झालेल्या बंदुकीच्या गोळीने मंगळवारी हिरानंदानी येथील टोरिनो इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रकाश दास (२८) यास आपले टार्गेट बनवले. सुरक्षा रक्षकाच्या मानेत घुसलेली गोळी पवई हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून काढण्यात आली असून, तो आता पूर्णपणे बरा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पवई पोलिसांनी गोळी चाचणीसाठी पाठवून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला […]

Continue Reading 0
Nishedh copy

पार्कसाईटमधील उद्यान वाचविण्यासाठी जनता एकवटणार, काळे झेंडे दाखवून करणार विरोध

​​रविराज शिंदे पार्कसाईट येथील ४० वर्ष जुन्या सुभेदार रामजी मालोजी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकी पाठीमागे स्थानिक नगरसेवकाचा हे उद्यान हडपण्याचा डाव आहे, असा आरोप करीत स्थानिक व आंबेडकरी जनता उद्यान वाचवण्यासाठी या विरोधात एकवटली आहे. रविवारी १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटन प्रसंगी काळे झेंडे दाखवून जनता याला विरोध दर्शवणार आहे. पार्कसाईट येथे महानगरपालिकेचे ४० […]

Continue Reading 0
VK

खोट्या नावाने नोकरी मिळवून, ४ लाखाची चोरी करणाऱ्या मोलकरणीला पवईमध्ये अटक

सावधान इंडिया मालिकेतून प्रेरित होऊन अनेक महाविद्यालीन मुलींना चित्रपट क्षेत्रात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवल्याचे तपासात उघड काम मिळवून देणाऱ्या संस्थेत खोटी कागदपत्रे सादर करून, पवईमधील रहेजा विहार येथे एका व्यावसायिकाच्या घरात २४ तास मोलकरणीचे काम मिळवून, त्यांचा विश्वास संपादन करून ३.५ लाखाचे दागिने आणि ५० हजाराच्या रकमेवर हात साफ करणाऱ्या वैजयंती मोरेश्वर कामत […]

Continue Reading 0
fire

शॉर्ट सर्किटमुळे इंदिरानगरमध्ये आग, जीवितहानी नाही

  रविवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान इंदिरानगर येथील चाळीत असलेल्या इलेक्ट्रिक मिटर बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अर्ध झोपेत असणाऱ्या लोकांना आगीची माहिती मिळताच स्थानिकांची धावपळ उडाली, मात्र दक्ष नागरिक व पोलीस यांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेत पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा धोका टळला. पवई आयआयटी येथे मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळीचे जाळे आहे. यापैकी इंदिरानगर येथील […]

Continue Reading 0
poster

पवईकरांच्या समस्या आता कार्टून बॅनरच्या माध्यमातून

अनेक वर्ष समस्यांशी लढणाऱ्या पवईकरांनी पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेट, आंदोलन, लोकप्रतिनिधींसाठी बनवलेली माध्यमे अशा अनेक प्रकारे आपल्या समस्या लोकप्रतिनिधीं समोर मांडल्या आहेत, परंतु त्याचे निवारण सोडा, साधे उत्तर सुद्धा लोकप्रतिनिधींकडून मिळत नाही आहे. म्हणूनच लोकप्रतिनिधींना आपल्या समस्या समजावून देण्यासाठी स्थानिक जनतेने आता लोकप्रतिनिधी वापरात असलेल्या बॅनरबाजी या माध्यमाचाच वापर केला आहे. मात्र या बॅनरवर अक्षरातून नव्हे तर […]

Continue Reading 0
crime

फुलेनगरमध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीस अटक

एक रुपया देण्याचे आमिष दाखवून, पवईमधील फुलेनगर भागात राहणाऱ्या एका ५४ वर्षीय क्रूरकर्म्याने, आपल्या शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना सोमवारी घडली आहे. या प्रकरणी क्रूरकर्म करणारा अशोक चाळके यास पवई पोलिसांनी अटक केली असून, वैद्यकीय तपासणी करून उद्या न्यायालयात सादर केले जाणार आहे. पिडीत मुलगी ही आपल्या आई वडिलांसह आयआयटी येथील […]

Continue Reading 0
prashn1

पवई प्रेसवर पवईकरांच्या वतीने नगरसेवकांना दहा प्रश्न

  महानगरपालिका निवडणूका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. अशात सध्याचे नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर काय काम केले? कोणत्या समस्यांचे निवारण केले? याचा लेखाजोखा समोर यावा म्हणून, पवईकरांचे प्रतिनिधित्व करत रिपब्लिकन पक्षाचे वार्ड क्रमांक ११५ चे अध्यक्ष विनोद लिपचा यांनी ‘पवई प्रेस’च्या माध्यमातून स्थानिक नगरसेवक चंदन शर्मा यांना दहा प्रश्न विचारले आहेत. ज्याची उत्तरे त्यांनी स्वतः किंवा आपल्या […]

Continue Reading 0
road

संघर्षनगरकरांना मिळाला पर्यायी रोड

संघर्षनगरकरांची पर्यायी मार्गाची फरपट आता संपली असून, बिल्डिंग क्रमांक ३२ पासून महाराष्ट्र काटा, खैराणी रोड पर्यंतच्या पर्यायी रस्त्याचे काम नगरसेवक निधीतून केले गेले आहे. या रस्त्यामुळे गेल्या ७ वर्षापासून पर्यायी मार्गासाठी संघर्षनगरकरांची चाललेली फरपट थांबली असून, घाटकोपर, साकिनाका या भागातून येणाऱ्या छोट्या गाड्यांना आता फिरून येण्याची गरज उरलेली नाही. या रस्त्याच्या मार्गे सरळ संघर्षनगरमध्ये प्रवेश […]

Continue Reading 0
prashn

आयआयटीच्या मुलाचा घात कि अपघात?

दिड महिन्यांपासून गायब असणारा व कर्जतच्या जंगलात भ्रमंतीसाठी गेलेला आयआयटी मुंबईचा (पवई) विद्यार्थी श्रीनिवास चंद्रशेखरचा मृतदेह कर्जत तालुक्यातील सांडशी जंगलात डोंगरकपारीत आढळून आला. २५ ऑक्टोबर रोजी कर्जतच्या जंगलात भ्रमंतीसाठी गेलेला श्रीनिवास अचानक गायब झाला होता. याची माहिती हॉस्टेल सहकार्यांनी त्याच्या पालकांना दिल्यानंतर, आईवडिलांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दिली होती. शेवटी शोधपथकाला शुक्रवारी संध्याकाळी ७ […]

Continue Reading 1
asd

हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुरडी जखमी, मृत्यूशी देतेय झुंज

पवईतील एका नामांकित हॉटेलमध्ये साडेसहा वर्षाची चिमुरडी शुक्रवारी स्विमिंग पूलमध्ये पडून गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सध्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार चालू असून, ती अत्यावस्थेत असल्याबद्दल बोलले जात आहे. याबाबत नातेवाईकांनी हॉटेल प्रशासन विरोधात कोणत्याही प्रकरचा गुन्हा दाखल केला नसून, आम्ही अधिक तपास करत असल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. मध्यप्रदेशची असणारी आस्था रमानी ही एका नातेवाईकाच्या लग्नासाठी […]

Continue Reading 0
ashish

लोकलमधून पडून पवईतील तरुणाचा मृत्यू

मुंबईच्या जीवनवाहिनीचा तिसरा बळी, कोपर-डोंबिवली दरम्यान घडली घटना आयआयटी l  रविराज शिंदे मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या लोकलच्या गर्दीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून निष्पाप मुंबईकरांना यामुळे निष्कारण बळी पडावं लागत आहे. भावेश नकाते, नितीन चव्हाण या दोन तरूणांचा लोकलच्या गर्दीमुळे लटकत जाताना पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आपल्या मित्रांसोबत कल्याण येथे  फिरायला गेलेल्या पवईतील […]

Continue Reading 0

आंदोलन झाले, अटक झाली, कोर्ट कचेरी सुद्धा झाली, पण मुतारी मात्र अजून नाही झाली

लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना न भूलता पवईकर व सर्वपक्षीय कार्यकर्ते लवकरच पूर्वीपेक्षाही  मोठ्या आंदोलनाच्या तयारीत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील पवई उद्यान ते गांधीनगर या पट्यात सार्वजनिक मुतारी बनवण्यासाठी स्थानिक भागातील नागरिक व सर्वपक्षित कार्यकर्त्यांनी मिळून १६ मार्च २०१५ रोजी आयआयटी मेनगेट येथील फुटपाथावर पत्र्याचे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारून शांततेत मुतारी बनाव आंदोलन केले होते. मात्र त्याकाळात जमावबंदीचे आदेश असल्याने, […]

Continue Reading 0
aai mulgi

‘परिसर आशा’ संस्था सरसावली पालकांच्या मदतीला

मुलांच्या समस्येसाठी पालकांना व मुलांना हेल्पलाईनच्या माध्यमातून करणार समुपदेशन धावपळीच्या जीवनात अनेक पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष देण्यास वेळच नसतो, त्यामुळे हळू हळू मुले आपल्याच विश्वात रमतात. जसे जसे ते मोठे होऊ लागतात तश्या पालकांच्या माझा मुलगा माझे ऐकत नाही, अभ्यास करत नाही, व्यवस्थित खातपित नाही, उलटे बोलतो, मारामारी करतो अशा एक ना अनेक तक्रारी सुरु […]

Continue Reading 0
ajgar

पवई तलावावर मगरींसोबत आता अजगरांचेही साम्राज्य

पवई तलाव भागात आता मगरीं सोबतच विविध जातीच्या साप आणि अजगरांचे साम्राज्य उभे होत आहे. गेल्या महिनाभरात पवई तलाव भागात किनाऱ्यावर अनेक मोठमोठाले अजगर रोडवर अथवा पदपथावर येऊ लागल्याने आता या भागात यांचे पण साम्राज्य असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र पवई तलाव भागात स्वच्छता मोहिम चालू असल्याने आता या अजगरांना लपण्यास जागा न उरल्याने ते […]

Continue Reading 0
doc

पवईकरांसाठी मोफत वैद्यकीय चिकित्सा व आरोग्य शिबीर

रविवारी सुट्टीचा दिवस साधत देवनायक आचार्य बिपीन शांतीलाल शाह मेमोरिअल ट्रस्ट तर्फे व सुखशांती हॉस्पिटल आणि एस बी नर्सिग होम यांच्या संयुक्त सहकार्याने, पवई इंग्लिश हायस्कूल, आयआयटी येथे पवईकरांसाठी मोफत वैद्यकीय चिकित्सा व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते ६ वेळेत हे शिबीर तमाम पवईकरांसाठी खुले असणार आहे. खासदार अरविंद सावंत, आमदार […]

Continue Reading 0
tree

आम्ही समाज हितासाठीच छाटले झाड – बौद्ध विकास मंडळ

रमाबाई आंबेडकरनगर येथील चंद्रमणी बुद्ध विहाराच्या समोरील पिंपळाच्या झाडाचे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारिप बहुजन महासंघ व धम्मदीप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशन तर्फे हे झाड धनदांडगे आणि चिरीमिरीच्या लोभापायी काही समाजकंठ्कांनी तोडल्याचा आरोप केला जात असतानाच या बुद्द विहाराची व्यवस्था पाहणाऱ्या बौद्ध विकास मंडळाच्या वतीने आम्ही समाजासाठी येथे एक छत उभे करत असून त्यासाठी […]

Continue Reading 1
IMG-20151123-WA0007

प्राणी मित्र सुनिष सुब्रमण्यम कुंजू यांना ‘बिल्ड इंडिया’ पुरस्कार प्रदान

प्राणी हक्क कार्यकर्ता आणि प्लॅण्ट अॅण्ड अॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी – मुंबई  व एनव्हीरो केअर वेलफेयर सोसायटीचे संस्थापक मा. श्री. सुनिष सुब्रमण्यनम कुंजू यांना नवी दिल्ली येथे आयोजित एकविसाव्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक समारोह २०१५ मध्ये ‘बिल्ड इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, भरात देशाला विविध क्षेत्रात […]

Continue Reading 0
tree

पिंपळाच्या झाडाची पालिकेच्या संगनमताने कत्तल, संतप्त पवईकरांचा आंदोलनाचा इशारा

रविराज शिंदे आयआयटी: निसर्ग संवर्धनाच्या नावावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या महानगरपालिकेतर्फे आयआयटी रमाबाई आंबेडकरनगर येथील बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याऐवजी, बांधकामास अडसर निर्माण करणारे पिंपळाचे झाड छाटण्याचे काम केल्याने स्थानिक आक्रमक झाले असून, त्यांनी पालिका अधिकारी आणि झाडांची कत्तल करणाऱ्या धनदांडग्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा पोलीस, महापौर आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहून दिला […]

Continue Reading 0
powai lake cleaning

पवई तलाव स्वच्छता मोहिमेला अखेर सुरुवात

स्थानिक आणि पर्यावरण प्रेमींनी कडक विरोध दर्शवला असतानाही, अखेर पवई तलाव स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे पवई तलावाची दिवसेंदिवस होत चाललेली दुर्दशा सावरण्याचा खटाटोप करणाऱ्या पालिका प्रशासनाने अखेर त्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. ७.१५ करोड खर्च करून पवई तलाव स्वच्छता आणि ५ वर्ष त्याच्या देखभालीचे काम किंजल कंस्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले असून, तलाव […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!