चांदिवली येथे राहणाऱ्या आणि एका नामांकित पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकारयाला भविष्य निर्वाह निधी (पीएफ) मिळवून देण्याच्या बहाण्याने ७ लाखाला ऑनलाईन गंडविल्याची घटना नुकतीच पवईत समोर आली आहे. २१.५४ लाख रुपये त्याच्या पीएफ खात्यात जमा असून, ते मिळवण्यासाठी विविध फीच्या नावावर भामट्यांनी त्यांना ७ लाखाचा गंडा घातला आहे. १० वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले […]
Tag Archives | Powai Police
शाळा आणि हिरानंदानी प्रशासनाच्या सामंज्यस्यातून हॉस्पिटल जवळील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला; एस एम शेट्टी शाळेजवळचा निर्णय कधी?
सकाळ, दुपार, संध्याकाळ असे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे पवईकरांच्या डोक्याचा ताप आणि हिरानंदानी पवईच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न बनलेल्या हिरानंदानी हॉस्पिटल येथील चंद्रभान शर्मा चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पोद्दार शाळा प्रशासन आणि हिरानंदानी प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून संपुष्टात आलेला आहे. आता एसएम शेट्टी शाळेजवळ होणारया वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी मिटणार असा प्रश्न पवईकर उपस्थितीत करत आहेत. जोगेश्वरी […]
कोयत्याचा धाक दाखवून मॉर्निंग वॉकरला लुटले
पवईत एका मॉर्निंग वॉकरला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी (११ जानेवारी) घडल्याची समोर आले आहे. मॉर्निंग वॉकरने याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस पाहिजे आरोपींचा शोध घेत आहेत. मरोळ येथील क्रिस्टल बिल्डींगमध्ये राहणारे आणि बांधकाम व्यावसायिक असणारे सनी छजलाना (२६) हे नेहमी प्रमाणे मरोळ येथून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले […]
ऑनलाईन डेटिंग फसवणूकीत चार्टर्ड अकाऊटंटला ३.३ लाखाचा गंडा; एकाला अटक
पवई पोलिसांनी पवई येथील ५४ वर्षीय चार्टर्ड अकाऊटंटला साथीदार मिळवून देण्याच्या बहाण्याखा ली ३.३ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी एकाला वेस्ट बेंगाल येथून अटक केली आहे. अर्णब सिंग उर्फ नील रॉय बनमाळी (वय २६) हा कोलकाता येथील हावडा येथील रहिवाशी असून, त्याला शनिवारी अटक करण्यात आली. पवई पोलिस त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेत आहेत. दोनदा […]
आवर्तन पवई “संडे स्पेशल” २९ डिसेंबर २०१९
आवर्तन पवई “संडे स्पेशल” २२ डिसेंबर २०१९
आवर्तन पवई “संडे स्पेशल” १५ डिसेंबर २०१९
विकृत मानसिकता: एअरगनच्या साहय्याने घेतला श्वानाचा जीव; लेक होममधील घटना
पवईतील लेक होम येथील लेक फ्लोरेंस इमारतीत एका श्वानाला (कुत्रा) एअर गनच्या साहय्याने मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नुकतीच पवईत उघडकीस आली आहे. श्वानाच्या शरीरात एक्सरेमध्ये दोन एअर गनच्या पुलेट्स डॉक्टरांना मिळून आल्यानंतर ही घटना समोर आली. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार […]
आवर्तन पवई “संडे स्पेशल” ०८ डिसेंबर २०१९
आवर्तन पवई “संडे स्पेशल” ०१ डिसेंबर २०१९
जादूटोणाच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या पवईतील मायलेकाच्या जोडीतील एकाला अटक; एक पसार
पवईकरांसह अनेक मुंबईकरांना जादूटोण्यातून भूत उतरवत असल्याचे सांगत गंडा घालणाऱ्या आई आणि मुलाच्या जोडीतील मुलाला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याची माहिती मिळताच आई पसार झाली आहे. पवईतील एका महिलेने आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची पोलिसांना तक्रार करताच पवई पोलिसांनी ही कारवाई केली. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईत राहणारी महिला कुसूम लता (बदललेले नाव) हिचा […]
आवर्तन पवई “संडे स्पेशल” २४ नोव्हेंबर २०१९
निवृत्त शास्त्रज्ञाला मैत्रिणीचा साडेतीन लाखाचा ऑनलाईन गंडा
पवईत राहणाऱ्या एका निवृत्त शास्त्रज्ञाला त्याच्या मैत्रिणीने ३.५ लाखाला ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. ऑनलाईन मैत्री जुळवणाऱ्या साईटवर तक्रारदार याच्याशी मैत्री करत आपण लंडनमधील औषध कंपनीत काम करत असल्याचे भासवून, मोठा व्यवसाय मिळवून देण्याचा बहाणा करून तिने हा डाव साधला. यासंदर्भात पवई पोलीस फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास करत आहेत. ६७ वर्षीय […]
आवर्तन पवई “संडे स्पेशल” १७ नोव्हेंबर २०१९
आवर्तन पवई “संडे स्पेशल” १० नोव्हेंबर २०१९
सिमकार्ड पडले ‘लाख’ रुपयाचे
नवीन सिमकार्डसाठी ऑनलाइन बुकिंग करणे एका पवईकराला चांगलेच महागात पडले आहे. सिमकार्डसाठी पाच रुपये ऑनलाइन भरण्यास सांगून सायबर ठगाने त्याच्या बँक खात्यातून ९९ हजार ९९० रुपये पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिस गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत. रामबाग पवई येथे राहणारे सौरभ घोष (४७) यांनी नवीन मोबाईल फोन खरेदी केला […]
२.५ दशलक्ष पौंडचे आमिष दाखवून पवईत महिलेची ४५.६९ लाखाची ऑनलाईन फसवणूक
पवईतील ३१ वर्षीय महिला व्यावसायिकेला २.५ दशलक्ष पौंड देण्याचे आमिष दाखवत एका अज्ञात व्यक्तीने ४५.६९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सायबर चोराने इमेल द्वारे आपण यूकेचा नागरिक असल्याची बतावणी करून, तिला भारतात २.५ दशलक्ष पौंड देणगी द्यावयाची आहे, जेणेकरुन ती भारतात चॅरिटीचे काम करू शकेल असे सांगत तिची फसवणूक केली […]
नेपाळी सुरक्षारक्षकांच्या टोळीची पवईत ५६ लाखाची चोरी
इमारतीच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या नेपाळी सुरक्षारक्षकांनी आपल्या साथीदारांसोबत मिळून फ्लॅटमध्ये घुसून मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत ५६ लाखाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी पवई परिसरात घडला आहे. घरातील मंडळी सुट्टीसाठी परदेशी गेल्याचा फायदा घेत चोरटयांनी आपला डाव साधला आहे. याप्रकरणात पवई पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंद करून सुरक्षारक्षकांचा शोध सुरु केला आहे. कुर्ला […]