Tag Archives | Powai
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते पवई चांदिवलीत विकास कामांचे उदघाटन
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवार, १३ मार्च रोजी पवई, चांदिवली येथील विकास कामांच्या उदघाटनांचा नारळ फुटला. चांदिवली संघर्षनगर येथील पाण्याच्या टाकीचे काम, पवई येथील बौद्ध विहाराचे नुतनीकरण, विस्तार सोबतच समाजकल्याण केंद्र उभारणे आणि स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती स्थळ सुशोभिकरण कामाचा शुभारंभ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थानिक आमदार […]
ज्ञान मंदिर शाळेच्या विद्यार्थिनीची गगन भरारी; राष्ट्रीय पातळीवर रौप्य पदक
आयआयटी, पवई येथील ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी भूमिका किसन पात्रे हिने राष्ट्रीय पातळीवर जम्परोप स्पर्धेत रौप्यपदक मिळवत पवईच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या कामगिरीनंतर राष्ट्रीय पातळीवर पदक मिळवणाऱ्या यादीमध्ये आता तिचेही नाव कोरले आहे. २०२१मध्ये उदयपुर राजस्थान येथे पार पडलेल्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धा २०२१मध्ये डोंबिवली येथील १० […]
ऑनलाइन वाईन मागवणे पडले महागात, पवईतील एनआरआय विद्यार्थ्याला अडीच लाखाचा गंडा
ऑनलाइन वाईन मागवणे एका २६ वर्षीय एनआरआय विद्यार्थ्याला चांगलेच महागात पडले आहे. २६ वर्षीय पवईत राहणारा विद्यार्थी अमेरिकेतून पदव्युत्तर शिक्षण घेत आहे इंटरनेटवर दुकानाचा नंबर मिळाल्यानंतर ऑर्डर करण्याच्या प्रयत्नात त्याने अडीच लाख रुपये गमावले आहेत. गब्बू रंधावा (बदललेले नाव) याला त्याच्या एनआरआय खात्यातून फंड ट्रान्सफर व्यवहारांबद्दल संदेश प्राप्त झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. […]
चोरीच्या मोटारसायकलवरून ४० दिवसात ४ चोऱ्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
साकीनाका परिसरातून मोटारसायकल चोरी करून मुंबईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सरफराज उमर कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रिमांड होममधून बाहेर येताच केवळ ४० दिवसात या चोरट्याने ४ गुन्हे केले आहेत. एका अल्पवयीनच्या खुनाच्या गुन्ह्यात त्याला डोंगरी रिमांडहोममध्ये ठेवण्यात आले होते. १५ जानेवारी रोजी त्याची रिमांड […]
जागतिक महिला दिनी पवई पोलिसांकडून सन्मान ‘ती’च्या कर्तुत्वाचा
८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पवई पोलिसांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान केला. आपआपल्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांचा परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त डॉ महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. चांदिवली येथील मेगारुगास हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका […]
पवई तलावात पुन्हा मगर दर्शन
मुंबईच्या पर्यटन स्थळांपैकी एक असणाऱ्या पवई तलावाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे असणाऱ्या मगरी. पाठीमागील काही वर्षापासून त्यांचे येथील दर्शन दुर्लभ झाले होते, मात्र काही दिवसांपूर्वी पवई तलावावर पुन्हा एकदा मगरीचे दर्शन घडले. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरी असल्याचे सांगितले जाते. आयआयटी मुंबईतील पवई तलाव जवळील परिसर, रेनिसंस हॉटेलजवळील भाग, पवई उद्यानातील तलावाला लागून असणारा […]
मेडीकल जर्नल पुरवण्याच्या बहाण्याने पवईतील नामांकित खासगी रुग्णालयाची ३.२९ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल
मेडीकल जर्नल्स पुरवण्याच्या नावाखाली एका नामांकित खासगी रुग्णालयाची ३.२९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २०१९मध्ये हॉस्पिटलची फसवणूक करणार्या याच आरोपीने या वर्षी जानेवारीमध्ये पुन्हा रुग्णालयाशी संपर्क साधल्यावर फसवणूक उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार, हॉस्पिटलच्या लायब्ररीमध्ये वैद्यकीय जर्नल्सचा साठा करण्याचा उद्देशाने निविदा […]
मास्टर आदी पुजारीने क्रीडा स्पर्धेत जिंकली दोन सुवर्णपदके
चांदिवली येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये सातवीत शिकणाऱ्या मास्टर आदी पुजारी याने अलीकडेच विद्यापीठ क्रीडा मैदान, मरीनलाइन्स येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत शाळेचे प्रतिनिधित्व करत १०० मीटर शर्यत आणि ४ x १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. आदी ब्रह्मा बैदरकला पंच धूमवती गारोडी सेवा ट्रस्ट मुंबईचे सक्रिय सदस्य रवी पुजारी आणि संध्या पुजारी इन्नांजे यांचा मुलगा आहे. […]
पोलीस असल्याची बतावणी करून पवईत ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी पळवली
मास्क न घातलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) पोलिस (Police) असल्याचे भासवून फसवणूक (Cheating) केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्याची रुपये ४५,०००० किंमतीची सोनसाखळी (Gold Chain) घेऊन पळ काढला. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. […]
इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये पवईच्या मुलांची छाप, टॉप १४ मध्ये निवड
पवईच्या मुलांनी कला क्षेत्रात पुन्हा एकदा आपला ठसा उमटवत सोनी टेलिव्हिजनवर सुरु असणाऱ्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रियालिटी शोमध्ये टॉप १४ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले आहे. पवईच्या मुलांचा सहभाग असणाऱ्या ‘डिमॉलिशन क्रू’ने हे स्थान मिळवत पवईच्या नावाचा झेंडा अजून उंचावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारित एक प्रसंग आपल्या कलेतून सादर करत मुलांनी हे स्थान […]
फिल्मी स्टाईलने पवईत पाकीटमारांना अटक
पवई परिसरात बसेसमध्ये पाकीटमारी करणाऱ्या टोळीच्या दोन सदस्यांना बुधवारी पवई पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. मोहम्मद आयूब फकीर साहब शेख (५९) आणि गणेश शंकर जाधव (४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हा करून पळून जाण्याच्या तयारीत असताना पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्यांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना चोरीचे २ मोबाईल मिळून आले आहेत. […]
बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून आरटीजीएस फॉर्म बदलल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक
साकीनाका पोलिसांनी (Sakinaka Police) एका ४० वर्षीय व्यक्तीला राष्ट्रीयीकृत बँकांच्या (Nationalise Bank) ड्रॉप बॉक्समधील चेकला जोडलेले आरटीजीएस (रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट – RTGS) फॉर्म बदलुन पैसे दुसऱ्या खात्यात हस्तांतर (transfer) करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अन्वर खान असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या विरोधात आंबोली (Amboli) आणि जोगेश्वरी (Jogeshwari) पोलीस ठाण्यात (Police Station) सुद्धा अशाच प्रकारच्या […]
चांदिवलीत ३२२ कोटी खर्च करून उभे राहतेय रुग्णालय, सल्लागारांना ६ कोटी
चांदिवलीत लवकरच भव्यदिव्य असे नवीन रुग्णालय मुंबई महानगर पालिकातर्फे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ३२२ कोटीं रुपये खर्च अपेक्षित असून, सल्लागार म्हणून नेमलेल्या कंपनीला फक्त सल्ला देण्याचे ६ कोटी पालिका मोजणार आहे. पूर्व उपनगरातील लोकांसाठी ही आनंदाची गोष्ट असतानाच या रुग्णालयाच्या निर्मितीवरून राजकीय श्रेयवाद सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेची ४ मोठी, १७ उपनगरीय तसेच इतर विशेष रुग्णालये […]
एसएम शेट्टी शाळेची विद्यार्थिनी चमकली ‘इन्फिनिटी २०२२ – द अल्टीमेट मॅथ चॅम्पियनशिप’मध्ये
‘इन्फिनिटी २०२२’मध्ये दुबई, दोहा, सिंगापूर, श्रीलंका, तैवान, भूतान आणि भारतातील ९३० विद्यार्थी, ३०४ संघ, १२३ शाळांनी भाग घेतला होता. आदित्य बिर्ला वर्ल्ड अॅकॅडमीतर्फे आणि बीआयटीएस पिलानी यांच्या सहकार्याने आयोजित ‘इन्फिनिटी २०२२ – द अल्टीमेट मॅथ चॅम्पियनशिप’मध्ये पवईच्या एस एम शेट्टी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या आयबीडीपीची विद्यार्थिनी सौम्या पांडे हिने ‘क्लॅश ऑफ मॅथेमॅटीसिअन’ स्पर्धेत द्वितीय उपविजेते […]
पवई तलावाचे पर्यावरणीय मूल्यांकन
मुंबई महानगरपालिकेमार्फत पवई तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करत असताना पर्यावरणीय मापदंड राखले जावेत, यादृष्टिने पालिकेतर्फे पवई तलाव पर्यावरणीय मूल्यमापन संस्था नियुक्त केली जाणार आहे. तलावात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण, तलावाच्या भागातून नियोजित सायकल ट्रॅकच्या कामांसह विविध कारणांमुळे तलावाची होणारी हानी रोखण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी आपले आक्षेप नोंदवले आहेत. […]
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उदघाटन
पवई विभागातील उद्योजक अशोक पोखरकर यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शुभहस्ते शनिवारी करण्यात आले. पवईतील वसाहत येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे, नगरसेवक किरण लांडगे, शाखाप्रमुख मनीष नायर, शिवसैनिक शिवा सूर्यवंशी उपस्थित होते. कै. बबनराव पोखरकर यांच्या स्मरणार्थ पोखरकर कुटुंबियांतर्फे ही रुग्णवाहिका सेवा पवईकरांसाठी […]
चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी; ‘जी-पे’वर घेतले जबरी चोरीचे पैसे
आयआयटी मुंबईमध्ये (IIT Mumbai) शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला दोन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी (Robbery) केल्याची घटना पवईत घडली. विशेष म्हणजे जबरी चोरीची रक्कम आरोपींनी आपल्या ‘जी-पे’ (google pay) अकाऊंटवर घेतली होती. पवई पोलिसांनी (Powai police) काही तासातच या गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आयुष राजभर (वय १९ वर्ष) आणि सतिश यादव (वय […]
महिलेचा पाठलाग करून, फोनवरून सतावणाऱ्या रोमिओला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या विधवा महिलेला वारंवार फोन करून आणि तिचा पाठलाग करून जेरीस आणणाऱ्या एका माथेफिरूला पवई पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सतीश शिंदे (२४) असे या तरुणाचे नाव असून पवई येथील तुंगागाव परिसरात हा तरुण आपल्या आईसोबत रहावयास आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या एका खाजगी कंपनीत काम […]
मित्राच्या जागी लेखी परीक्षेला बसलेल्या व्यक्तीला पवईमध्ये अटक
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) भरती मोहिमेदरम्यान आपल्या मित्राच्या जागी लेखी परीक्षेला बसल्याच्या आरोपावरून पवई पोलिसांनी मंगळवारी एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. डमी उमेदवार म्हणून काम करणाऱ्या गणेश सतवनला चेतन बेलदार याने लेखी परीक्षेत प्रतिनिधित्व करण्यासाठी मोठ्या रकमेचे आश्वासन दिले होते, असे पोलिसांनी सांगितले. म्हाडाने ५६५ पदे भरण्यासाठी भरती मोहीम सुरू केली […]