आयआयटी येथील शिवसेना शाखा क्रमांक ११५ मध्ये पाहा प्रारूप आराखडा. सुचवा आपल्या हरकती व सूचना. आधीच्या विकास आराखड्याला रद्द केले गेल्यानंतर पालिकेने काहीच महिन्यातच नवीन प्रारूप आराखडा तयार केला आहे. पालिकेचा हा नवीन प्रारूप आराखडा पवईकरांना पाहण्यासाठी शिवसेना शाखा ११५ मध्ये ठेवण्यात आला असून, त्यात हरकती आणि सूचना सुचवण्यासाठी शिवसेना शाखा ११५ तर्फे पवईकरांना आमंत्रित […]
Tag Archives | RAHEJA VIHAR
३८ लाखांच्या ‘एमडी’ अंमली पदार्थासह पवईतील एकाला अटक
अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या तीन इसमांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने टागोरनगर, विक्रोळी येथून ३८ लाखांच्या ‘एमडी’ या अंमली पदार्थासह अटक केली आहे. अटक तीन आरोपींमधील एक इसम हा पवई भागातील रहिवाशी असून, यात एका महिलेचा सुद्धा समावेश आहे. हा साठा त्यांनी कुठून आणला व कोणास विकणार होते? याचा पोलिस आता शोध घेत आहेत. विक्रोळी येथील […]
दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांदिवलीत आज (शुक्रवारी) एक मोठा बदल घडला असून, माजी नगरसेवक (वार्ड क्रमांक १५०) व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चांदिवली तालुका अध्यक्ष शरद पवार आणि मनसे चांदिवली विभाग अध्यक्ष व नगरसेवक ईश्वर तायडे (वार्ड क्रमांक १५१) यांनी शिवसेना विभागप्रमुख आमदार संजय भाई पोतणीस यांच्या मार्गदर्शनामध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त पवईत विविध कार्यक्रमांचे आयोजन
रविराज शिंदे, अविनाश हजारे, सुषमा चव्हाण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त १४ एप्रिल २०१६ रोजी दिवसभर पवईमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण दिवस हा विविध माध्यमातून ‘राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ‘धम्मदिप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशन’ तर्फे बाईक […]
दारूच्या नशेत मित्रांनीच केली मित्राची दगडाने ठेचून हत्या
पवई पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोरारजीनगर परिसरात एका ३३ वर्षीय युवकाच्या हत्येची घटना समोर आली आहे. मृत इसमाचे नाव सुभाष गोळे असून, दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ भांडणातून मित्रांनीच त्याची हत्या केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करत तीन तरुणांना अटक केली आहे. रवी कांबळे (२२), निखिल गायकवाड (२४), मनोर अरेन (२३) अशी […]
पवई ते साकीनाका मेट्रो एसी बस सेवा सुरु
पवईमध्ये कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी व पवईमधून इतर भागात कामासाठी जाणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी सिटीफ्लो तर्फे साकीनाका मेट्रो स्थानक ते पवई अशी नवीन बस सेवा सुरु करण्यात आली आहे. साकीविहार रोड, चांदिवली मार्गे हिरानंदानीपर्यंत ही सेवा असणार आहे. या भागात कामासाठी येणाऱ्या लोकांना रिक्षावाल्यांचे भाडे नाकारणे, तासनतास वाहनांची वाट बघत बसणे व प्रवाशांची बस मधील गर्दी यातून […]
मगरीच्या हल्ल्यानंतर स्थानिकांची सुरक्षा कुंपणाची मागणी
पवई तलावात मासेमारीसाठी जाणाऱ्या लोकांवर होणारे मगरीचे हल्ले वाढलेले आहेत. जे पाहता तिरंदाज व्हिलेज आणि स्थानिक परिसरातील लोक पोलीस आणि पालिका प्रशासन यांना सुरक्षा कुंपणाची मागणी करणारे पत्र देणार आहेत. पवई तलावातील ठराविक भागात सुरक्षा कुंपण टाकून स्थानिक मच्छीमारांसाठी ती जागा मासे पकडण्यासाठी सुरक्षित करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात येणार आहे. स्थानिक नगरसेवक आणि […]
पवई तलावात मगरीचा हल्ला, मच्छिमार गंभीर जखमी
पवई तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या आयआयटी तिरंदाज व्हिलेजमध्ये राहणारे मच्छिमार बाबू भुरे (५०) यांच्यावर पद्मावती मंदिराजवळ मगरीने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच परिवारातील विजय भुरे याच्यावर ऑगस्ट २०१० मध्ये हल्ला करून मगरीने जीव घेतला होता. पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरींचे साम्राज्य आहे. तशा सूचना देणारे फलकही पवई […]
बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाची लूट
बीएमडब्ल्यू गाडीतून येऊन चौघांनी पवईतील एका व्यावसायिकाला लुटल्याची हादरवून टाकणारी घटना पवईजवळ घडली आहे. व्यावसायिकाच्या गळ्यातील सोन्याची चैन व २ मोबाईल फोन अशी एक लाखाची लूट या चोरट्यांनी केली आहे. याबाबत ४ अज्ञात इसमां विरोधात पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. पवई येथील व्यावसायिक निलेश डोंगरे (३८) यांनी पार्कसाईट […]
नापास होण्याच्या भितीने पवईतून पळून गेलेली दोन भावंडे तीन वर्षांनी सापडली
वार्षिक परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आपले आई वडील आपल्याला रागावतील, या भितीपोटी तीन वर्षापूर्वी पवई येथील आपल्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता पळून गेलेल्या दोन भावांना दहिसर आणि अहमदनगर येथून शोधून काढण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. हॉटेल व्यावसायिक सुदर्शन मौर्या हे आपल्या कुटुंबियांसोबत पवई परिसरात राहतात. २९ एप्रिल २०१३ रोजी, मोर्या यांची […]
चांदिवलीत एम्ससारखे रुग्णालय बनवण्याची पूनम महाजन यांची लोकसभेत मागणी
उत्तर-मध्य मुंबईतून खासदार असणाऱ्या पूनम महाजन यांनी आपल्या मतदारसंघात येणाऱ्या चांदिवली भागात एम्स सारखे रुग्णालय बनवण्यात यावे अशी मागणी लोकसभेत केली आहे. लोकसभेत अर्थसंकल्पावर आयोजित चर्चासत्रात आपले मत मांडताना त्यांनी ही मागणी केली आहे. वित्तमंत्री अरुण जेटलींनी २०१६ – २०१७ च्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांना महत्व दिले आहे. नागपुरात एम्स आणलेच जात आहे; परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून […]
पवईत रंगल्या पारंपारिक खेळ स्पर्धा
इंटरनेट आणि व्हिडीओ गेमच्या जगात मैदानी आणि पारंपारिक खेळापासून मुले वंचित होत चालली आहेत, हे पाहता क्रांती महासुर्य संत शिरोमणी रविदास ६३९ व्या जयंतीचे औचित्य साधत आंतरराष्ट्रीय संघटना तफिसा (TAFISA), ऑल मुंबई असोसिएशन ऑफ स्पोटस् अँड फिटनेस फॉर ऑल आणि पवई प्रिमियर लिग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गावदेवी मैदानात मुलांसाठी लोप पावलेल्या पारंपारिक कला क्रीडांच्या […]
गाडी नंबर २५८८
सुट्टे पैसे घेण्याच्या बहाण्याने व विविध मार्गाने लोकांना फसवून मुंबईभर हैदोस घालणाऱ्या ठगास, केवळ ४ अंकी गाडी नंबर वरून पकडण्यात पवई पोलिसांना यश मिळाले आहे. ब्लॅकने गॅस घेण्याच्या बहाण्याने गॅस डिलिवरी करणाऱ्या दोन कामगारांना किंमतीपेक्षा जास्त रक्कम देवून, काही वेळाने त्यांच्याकडूनच सुट्टे पैसे घेण्याच्या बहाण्याने त्यांना ठगणाऱ्या एका ठगास पकडण्यात पवई पोलिसांच्या तपासी अधिकारी समीर […]
पवई येथील चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी दोघांना अटक
तुंगागाव येथील चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात पवई पोलिसांनी रवी सोलंकी (२१) व इरफान (२१) अशा दोघांना आज (शनिवारी)अटक केली असून, अंधेरी कोर्टात दोघांना सादर करण्यात आले असता त्यांना अधिक तपासासाठी पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे. आजी-आजोबा आणि आत्यासोबत पवईतील साकिविहार रोडवरील तुंगागाव मुरली चाळीत […]
तुंगा परिसरातून हरवलेल्या लहान मुलीचा सापडला मृतदेह
तुं गा परिसरातून गायब झालेल्या श्रीया अजय मेश्राम, हिचा मृतदेह आज (बुधवारी) दुपारी १ वाजता तुंगा परिसरातील कृष्णा बिजनेस पार्क भागातील झाडीत, सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या टाकीत आढळून आला आहे. रविवार रात्री ११ पासून तुंगागाव, साकीविहार रोड परिसरातून श्रीया गायब होती. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात घेऊन जाण्यात आला असून, पोलिसांनी अपहरण, बलात्कार, हत्या व पोस्का […]
पवईत कारमधून लॅपटॉप, आयपॅड चोरी
पार्किंगमध्ये पार्क केलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप आणि आयपॅड चोरीस गेल्याची घटना काल पवईमध्ये घडली आहे. याबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे पार्किंगमध्ये गाड्या लावणाऱ्या मालक व चालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार हेमंतकुमार तरवरे हे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता पवईत कामानिमित्त आले होते. कामाच्या […]
शाळेत विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन, विद्यार्थ्याचे १५ दिवसासाठी निलंबन
पवईमधील एका नामांकित इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने अश्लील वर्तन केल्याची घटना घडली आहे. याबाबत कठोर पाऊले उचलत शाळेने संबंधित विद्यार्थ्याचे १५ दिवसांसाठी शाळेतून निलंबन केले आहे. शाळा आणि घरातील वातावरणात मुलांवर अनेक सुसंस्कार घडत असतात, मात्र सहज उपलब्ध असणारी अनेक माध्यमे व आई-वडील दोघीही नोकरी करत असणाऱ्या परिवारात अनेकदा मुले […]
डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान उदघाटनाच्या प्रतीक्षेत
रविराज शिंदे पवई तलाव आणि परिसर हे मुंबईकरांच्या पर्यटन स्थळाच्या यादीतील महत्वाचे ठिकाण आहे. या भागात सौंदर्यीकरण प्रकल्प राबवल्यापासून हा भाग मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला असतानाच, पवईतील एल-अँड-टी समोरील २२ एकर जागेवर विस्तारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मात्र अजूनही उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी १७ कोटीं रुपयांचा खर्च पालिकेतर्फे करण्यात आला असून, या […]
जलवाहिनी मंजुरीवरून शिवसेना-राष्ट्रवादीत श्रेयवाद
“परिसरातील पाण्याच्या समस्येचा पाठपुरावा मी शिवसेना शाखाप्रमुख या नात्याने गेली अनेक महिने करत आहे. या संपूर्ण मंजुऱ्या या शिवसेनेच्या पाठपुराव्यातून झालेल्या आहेत आणि याचे संपूर्ण श्रेय हे शिवसेनेचेच आहे. याचे श्रेय लाटू इच्छिणाऱ्यांनी पाठपुराव्याचे पुरावे द्यावेत” – निलेश साळुंखे – शाखाप्रमुख ११५. “शाखाप्रमुख हे मंजुरीच्या स्तरावर असणाऱ्या प्रकल्पांची माहिती मिळवून पत्रव्यवहार करून नेहमीच श्रेय लाटण्याचा […]
उंदीर स्टाईल ज्वेलरी शॉपची लूट
अनोळखी चोराने उंदराप्रमाणे भुयारी मार्ग खोदून, मध्यरात्री ज्वेलरी शॉपमध्ये घुसून, दुकानातील १.७ लाखाची चांदिचे दागिने लुटून घेवून गेल्याची अनोखी घटना साकिनाका पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. दुकानाच्या जवळून जाणाऱ्या ड्रेनेज लाईन सोयीचा आधार घेत, चोरट्याने भुयारीमार्ग बनवून दुकानात प्रवेश करत ही चोरी केली आहे. याबाबत साकिनाका पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करत तपास सुरु केला आहे. […]