चांदिवलीत एम्ससारखे रुग्णालय बनवण्याची पूनम महाजन यांची लोकसभेत मागणी

त्तर-मध्य मुंबईतून खासदार असणाऱ्या पूनम महाजन यांनी आपल्या मतदारसंघात येणाऱ्या चांदिवली भागात एम्स सारखे रुग्णालय बनवण्यात यावे अशी मागणी लोकसभेत केली आहे. लोकसभेत अर्थसंकल्पावर आयोजित चर्चासत्रात आपले मत मांडताना त्यांनी ही मागणी केली आहे.

वित्तमंत्री अरुण जेटलींनी २०१६ – २०१७ च्या अर्थसंकल्पात आरोग्य सुविधांना महत्व दिले आहे. नागपुरात एम्स आणलेच जात आहे; परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबई शहरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या सुविधेसाठी मुंबईतील चांदिवली येथे सुद्धा एम्स सारखे रुग्णालय बनवण्यात यावे अशी मागणी खासदार पूनम महाजन यांनी केली आहे.

वित्तमंत्री अरुण जेटली यांनी शेती, पायाभूत सुविधा व सामान्य माणसाकडे जास्त लक्ष केंद्रित करताना आरोग्य सुविधांना सुद्धा या अर्थसंकल्पात मोठे स्थान दिले आहे. अर्थसंकल्पात त्यांनी अनेक ठिकाणी सामान्य माणसाला खुश केले आहे तर काही ठिकाणी लोकांच्यावर विनाकारण भुर्दंड सुद्धा लादलेला आहे. मात्र अर्थसंकल्प अतिशय सुधारणावादी असून, समाजातील सर्व घटकांना आणि गरिबांना अनुकूल असा आहे, असे भाजपच्या उत्तर-मध्य मुंबईतून खासदार असणाऱ्या पूनम महाजन यांचे मत आहे.

याच विषयी लोकसभेत आयोजित चर्चासत्रात बोलताना त्यांनी वित्तमंत्र्यांचे लक्ष वेधत मुंबईतील चांदिवली भागात एम्स सारखे रुग्णालय बनवण्याची मागणी केली आहे.

लोकसभेत आपले मत मांडताना त्या म्हणाल्या “मी माननीय वित्त मंत्र्यांना मागणी करू इच्छिते कि, नागपुरात तर आपण एम्स रुग्णालय आणतच आहात; परंतु मुंबई शहरात संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण उपचारासाठी येत असतात, देशभरातून लोक कॅन्सर सारख्या आजाराच्या उपचारासाठी सुद्धा इथे येत आहेत, त्यामुळे येथील सरकारी रुग्णालये खचाखच भरत आहेत. का नाही आम्ही चांदिवली जो माझा मतदारसंघ असून एक मोठा परिसर आहे, येथे एम्स सारखे रुग्णालय उभे करून एक मोठी सुविधा आणावी. यामुळे मुंबईला तर याचा फायदा होईलच, परंतु महाराष्ट्र आणि देशाला त्याचा फायदा होईल.

या मागणीमुळे चांदिवलीकरांसोबतच मुंबईकर आनंदी असून, चांदिवली भागात पुर्नविकासामुळे दिवसेंदिवस वाढत जात असललेल्या लोकसंख्येची एक मोठी समस्येचे निवारण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!