उशिराने आगमन झालेल्या पावसाने सुरुवातीच्या दिवसातच मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या नालेसफाईचा फोलपणा उघड केला आहे. या सुरुवातीच्या पावसात चांदिवली, संघर्षनगर येथे सर्व ठिकाणी पाणी तुंबले होते. येथील अनेक गटारे सफाई न झाल्यामुळे पाण्याने भरून यातील सगळी घाण रस्त्यांवर आल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मार्केटमध्ये संपूर्ण रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरल्याने आणि दुर्गंधी येत […]
