काही महिन्यांपूर्वीच बनवण्यात आलेल्या एस एम शेट्टी शाळेजवळील रोडवर सुरुवातीच्या पावसातच खड्डे पडल्याने रस्त्याची अगदी चाळण झाली होती. याबाबत ‘आवर्तन पवई’ने पालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता अखेर दुरुस्त करण्यात आला आहे. एसएम शेट्टी स्कूलमार्गे असणारा रोड हा चांदिवली आणि हिरानंदानी कॉम्प्लेक्स यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. दररोज या मार्गावरून हजोरोंच्या […]
Tag Archives | road
माता रमाबाई आंबेडकर नगरच्या मदतीला ‘जनता राजा’ आला धावून
पवईतील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील रोडच्या समस्येंशी कित्येक वर्ष लढणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या हाकेला एकही लोकप्रतिनिधी येत नसल्याचे पाहत, पवईचे जनतेचे राजे, माजी नगरसेवक चंदन शर्मा स्वतः पुढे सरसावले आहेत. या परिसरातील रोडच्या सिमेंटीकरणाचे काम स्वखर्चातून करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत, रविवारी या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी शर्मा यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, युवा नेते […]
पवई विहारचा रस्ता खड्डयात; नागरिक विद्यार्थ्यांचे हाल
पवई विहार येथील अंतर्गत रस्त्याला बनवण्याचा कामाचा मोठा धुमधडाक्यात गाजावाजा करत शुभारंभ करूनही अखेर या पावसाळ्यात ही रस्ता खड्डयात गेल्याचे समोर येत आहे. यामुळेच या भागात राहणाऱ्या नागरिकांची आणि येथील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच दैना झाली असून, प्रवाशाला येथून घेवून जाण्यास रिक्षावाले मनाई करू लागले आहेत. त्यामुळे किमान रस्ता दुरुस्त तरी करा अशी मागणी आता […]
याचे श्रेय आता कोण घेणार? – पवईकर
पवईतील हिरानंदानी – पवई विहार रोडला जोडणाऱ्या विजय विहार रोडच्या दुरुस्तीनंतर याचे श्रेय घेण्यासाठी पोस्टर, बॅनर आणि सोशल माध्यमातून लोकप्रतिनिधींमध्ये चांगलाच श्रेयवाद रंगला होता. मात्र, या श्रेयवादाला आठवडा उलटायच्या आधीच विजय विहार रोडवर पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली. पावसाळ्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसानेच या रस्त्याची दुर्दशा करत रस्त्यावर खड्डे कि खड्यात रस्ते अशी याची अवस्था केली. […]
विजय विहार रोडवरून पवईत श्रेयवाद
पवईतील विजय विहार रोडवर सध्या रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असून, हा रस्ता आम्हीच दुरुस्त केला असल्याचा श्रेयवाद सध्या स्थानिक आमदार आरिफ नसीम खान आणि स्विकृत नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील यांच्यात रंगला आहे. दोघांनीही हे काम आमच्याच प्रयत्नातून आणि फंडातून केला जात असल्याचा दावा केला आहे. श्रेयवादात यांचे कार्यकर्ते सुद्धा उतरले असून, सोशल […]
पंचश्रीष्टी रस्त्यावर वाहनांना बंदी?
पवईमधील पंचश्रीष्टी कॉम्प्लेक्समधून जाणारा रोड हा चांदिवली – हिरानंदानी भागाला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा आहे. मात्र या रोडवर खाजगी वाहनांना प्रवेश निषिद्ध केला जाणार आहे. रहिवाशी संघटनेतर्फे तशा आशयाचे बोर्डस सुद्धा दोन्हीकडील प्रवेशाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. “हा पंचश्रीष्टी कॉम्प्लेक्सचा एक खाजगी रस्ता आहे म्हणून येथून बाहेरचे वाहन आणि जड वाहन यांना ये-जा करण्याची परवानगी […]
नवनिर्मित विजय विहार रोडला खड्डे
पावसाळ्यात पालिकेने बनवलेल्या रस्त्यांवर खड्डे पडणे मुंबईकरांसाठी नवीन नाही आहे, मात्र पाऊस नसतानासुद्धा नुकत्याच दुरुस्तीचे काम केलेल्या विजय विहार रस्त्याला खड्डे पडल्याचा प्रकार घडला आहे. येथील विजय विहार ते पवई विहार जोडणाऱ्या रस्त्याला महिना भराच्या आतच खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी आमदार नसीम खान यांच्या प्रयत्नाने महानगर पालिकेच्यावतीने या रोडच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र […]