On September 24th, the Rotary Club of Powai (RCBPowai) brought smiles to the faces of 250 senior gentlemen by executing the ‘Vibrant Vastra project’. This heartwarming initiative involved the distribution of new clothes to senior citizens associated with five Community Centers at the Sangharsh Nagar SRA Colony in Chandivali, Powai. The event took place in […]
Tag Archives | Senior Citizen
म्हाडाची स्वस्त सदनिका मिळवून देण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची ३० लाखांची फसवणूक
एका खासगी बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्याच एका मित्राने ३० लाखांला गंडा घातला आहे. पवई येथे बाजारभावापेक्षा कमी दरात म्हणजेच ८५ लाख रुपयांमध्ये ९७० चौरस फूट फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. तक्रारदार यांनी मित्राला ३७ लाख रुपये दिले असून, उर्वरित रक्कमेसाठी कर्ज घ्यायचे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आपले पती […]
पोलीस असल्याची बतावणी करून पवईत ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी पळवली
मास्क न घातलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) पोलिस (Police) असल्याचे भासवून फसवणूक (Cheating) केल्याप्रकरणी पवई पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंतवून त्याची रुपये ४५,०००० किंमतीची सोनसाखळी (Gold Chain) घेऊन पळ काढला. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. […]
केवायसी अपडेट फसवणूक: ज्येष्ठ नागरिकाची २.७५ लाख रुपयांची फसवणूक
पवईस्थित एका ६७ वर्षीय व्यावसायिकाची (businessman) अज्ञात भामट्याने ₹२.७५ लाखांची ऑनलाईन फसवणूक (online cheating) केली आहे. टेलिकॉम कंपनीचा प्रतिनिधी (telecom company representative) असल्याचे भासवत ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) स्क्रीन शेअरिंग ऍप (screen sharing app) डाऊनलोड करण्यास सांगत, त्यानंतर त्याने ही रक्कम पळवली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिकाला एका अज्ञात व्यक्तीने (unknown […]
सायबर फसवणूकीत वाढ; पवईतील ज्येष्ठ नागरिकाला १.८ लाखाचा गंडा
लॉकडाऊन काळात डिजिटल व्यवहार वाढल्याने सायबर फसवणुकीच्या (cyber frauds) गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशाच एका केवायसी फसवणूकीत (KYC frauds) पवईतील एका ज्येष्ठ नागरिकाला लाखो रुपयांचा गंडा पडला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात अशा गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, सावधानता बाळगण्याचे निर्देश सायबर पोलिसांकडून देण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असल्याने […]
वृद्ध दाम्पत्याला दिलासा; रिक्षात विसरलेल्या ४० तोळय़ांच्या दागिन्यांचा छडा लावत गुन्हे शाखेने परतवले
रिक्षातील प्रवासादरम्यान ४० तोळे सोन्याचे दागिन्यांची पिशवी हरवल्यानंतर आयुष्यभराची कमाई गेल्याने निराश झालेल्या एका वृद्ध दाम्पत्याला गुन्हे शाखेने दिलासा मिळवून दिला आहे. आपले तपास कौशल्य दाखवत रिक्षाचालक आणि त्याच्या एका नातलगाकडून त्यांनी दागिने हस्तगत करत वृद्ध दाम्पत्यास परत मिळवून दिले आहेत. विशेष म्हणजे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे शाखेने त्या दोघांना ताब्यात घेवून, पिशवीतील एका […]
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने पळवले; हिरानंदानीतील घटना
आपले काम संपवून घरी परतत असणाऱ्या ७६ वर्षीय वृद्धाला पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने भामट्यांनी पळवल्याची घटना मंगळवारी पवईतील हिरानंदानी भागात घडली. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून सिसिटीव्हीच्या आधारे तपास सुरु केला आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील विजयविहार इमारतीत राहणारे विलास बांदेकर (७६) मंगळवारी सकाळी हिरानंदानी येथील आपल्या बँकेच्या शाखेत […]
सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगून महिलेचे ८ तोळ्याचे दागिने भामट्यांनी पळवले
पवईतील आयआयटी येथे खरेदीसाठी आलेल्या एका महिलेला सीबीआय ऑफिसर असल्याचे सांगून महिलेचे ८ तोळ्याचे दागिने पळवल्याची घटना आज (०५ एप्रिल २०१९) दुपारी १ वाजता घडली. पवई पोलिसांनी याबाबत दोन अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करून, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. याबाबत पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलेनिअम टॉवर येथे राहणाऱ्या अर्चना विजय जोशी (७२) या […]
वृद्धेला पोलीस असल्याचे सांगून २ लाखाचे सोन्याचे दागिने लांबवणारया भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात आपल्या मुलीच्या उपचारासाठी आलेल्या एका ६२ वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून, २ लाखाचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला अडीच महिन्यानंतर अखेर पोलिसांनी मालवणी येथून अटक केली आहे. गुलझार अली (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मालवणी येथे इस्टेट एजंटचे काम करतो. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधा गौंडर (६२) […]
बँकेचा ऑनलाईन पत्ता शोधणं पडलं महागात; वृद्धाला ९८ हजारांना गंडा
सजेस्ट अँड एडिट पर्यायामुळे भामटे बॅंक ग्राहकांना करत आहेत लक्ष्य आपल्या बँकेचा नवीन पत्ता शोधणे पवईतील एका वृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्याने बँकेच्या नंबरच्या जागेवर आपला नंबर दिला आणि वृद्धाची वैयक्तिक माहिती मिळवून त्यांच्या पेंशन खात्यातून ९७००० हजारावर हात साफ केला. पवई पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. […]
आयआयटीचे बस स्टॉप हलवले, पण नक्की कोणासाठी? – संतप्त नागरिक
जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवरील आयआयटी मेनगेट येथील जोगेश्वरीच्या दिशेने जाणारा बेस्ट बस स्टॉप वाहतुकीला अडथळा आणत असल्याने, १ तारखेपासून आयआयटी मेनगेट पादचारी पुलाजवळ हलवण्यात आला आहे. बस स्टॉपला हलवले गेल्याने येथील स्थानिकांना रहदारीतून रस्ता काढत लांब बस स्टॉपवर जावे लागत आहे. यामुळे हा बस स्टॉप नक्की नागरिकांच्या सेवेसाठी हलवला आहे? की व्यावसायिकाला होणाऱ्या अडचणीला […]