पवई विभागातील उद्योजक अशोक पोखरकर यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शुभहस्ते शनिवारी करण्यात आले. पवईतील वसाहत येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे, नगरसेवक किरण लांडगे, शाखाप्रमुख मनीष नायर, शिवसैनिक शिवा सूर्यवंशी उपस्थित होते.
कै. बबनराव पोखरकर यांच्या स्मरणार्थ पोखरकर कुटुंबियांतर्फे ही रुग्णवाहिका सेवा पवईकरांसाठी शनिवार पासून सुरु करण्यात आली आहे. ९३२०४०९९४४ (अशोक पोखरकर), ९८१९५७८१९३ (शिवा सूर्यवंशी) आणि ९३२४५३७१०९ (मनोहर पोखरकर) या क्रमांकावर संपर्क साधत नागरिक या रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेवू शकणार आहेत.
No comments yet.