जुलै महिन्यात पवई विहार रोड येथील इमारत क्रमांक २ ते इमारत क्रमांक ४ पर्यंतच्या रस्त्यावर पेवर ब्लॉक लावत दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पवई विहार शंकर मंदिर ते गोपाल शर्मा स्कूल रोड दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होत आहे. सोमवार, २१ नोव्हेंबरपासून या कामाला सुरुवात होत आहे.
शुक्रवारी स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या हस्ते या कामाचा नारळ फोडण्यात आला. १५ दिवस चालणाऱ्या या कामाला दोन विभागात विभागण्यात आले आहे. “शाळा सुरु असल्याने शालेय वाहनांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून एका मार्गाने वाहतूक सुरु ठेवून दुसऱ्या मार्गावर काम करण्यात येणार आहे,” असे पालिका एल विभागाच्या अधिकाऱ्याने आवर्तन पवईला सांगितले.
No comments yet.