मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल (के ई एम रुग्णालय) व सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजमध्ये न्यूरोसर्जन आणि ऑपरेशन आणि एनेस्थेसिया (पॅरामेडीकल टेक्नोलॉजी) अभ्यासक्रमात नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या कुमारी नितल नितीन भावसार, कुमारी काजल गौडा आणि कुमारी रूणीका राजू गाडे या तीन पवईकर कन्यांचा येथील नागरिक आणि संस्थांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
कुमारी नितल नितीन भावसार हिने न्यूरो फिजिशियन क्षेत्रात मुबईतून प्रथम आणि महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावत पवईच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. या तिन्ही विद्यार्थिनीनी सामान्य कुटुंबातून येवून सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात करिअर घडवता येते याचे एक उत्तम उदाहरण उभे केले आहे.
३० एप्रिल २०१९ रोजी के ई एम रुग्णालय व सेठ गोर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेजच्या दीक्षांत हॉलमध्ये पार पडलेल्या समारंभात २०१५ बॅचच्या या तिनी विद्यार्थीनीना न्यूरोसर्जन अभ्यासक्रम, ऑपरेशन आणि एनेस्थेसिया तंत्रज्ञानची पदवी बहाल करण्यात आली.
पवईतील आयआयटी पवई येथील ज्ञान विद्या मंदिर येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर बालपणापासूनच्या मैत्रिणी असणाऱ्या तिघींनी मेडिकल क्षेत्रात आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. हा मार्ग खडतर होता मात्र पाठीमाग येण्याऐवजी माहिती मिळवत केएएम रुग्णालयात असणाऱ्या न्यूरोसर्जन, ऑपरेशन आणि एनेस्थेसिया अभ्यासक्रमात प्रवेश मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
कुमारी नितल नितीन भावसार हिने न्यूरो फिजिशियन या क्षेत्रात मुंबईमध्ये प्रथम आणि महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल युवासेना विक्रोळी विधानसभेतर्फे तसेच शिवसेना शाखा १२२ तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
कुमारी काजल गौडा आणि कुमारी रूणीका राजू गाडे यांनी ऑपरेशन आणि एनेस्थेसिया अभ्यासक्रमात नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल युथ पॉवर संघटनेच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. “अवघे जग बदलून टाकणारे महान द्रष्टे” पुस्तक भेट देवून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments yet.