जेवणाचे १० रुपये मागितले म्हणून मित्रानेच केला मित्राचा खून

प्रातिनिधिक

जेवण करत असताना जेवणाचा खर्च म्हणून एका मित्राने दुसऱ्या मित्राला १० रुपये मागितल्याचा राग येवून बांबूने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून मित्राने दुसऱ्या मित्राचा खून केल्याची घटना काल पवईतील साई बांगुर्डा परिसरात घडली. दिनेश लक्ष्मण जोशी (३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, आरोपी मित्र खुनानंतर पळून गेला आहे.

पवईमधील गौतमनगर येथे राहणारा दिनेश हा आपल्या एका पस्तीश वर्षीय मित्रासोबत जेवणाची पार्टी साजरी करण्यासाठी येथील साई बांगुर्डा परिसरात गेला होता. दुपारी जेवण करत असताना जेवणासाठी येणारा खर्च म्हणून दिनेशने आपल्या मित्राकडे १० रुपयांची मागणी केली. मात्र त्याच्या मित्राला याचा राग आल्यामुळे “तू मला पैसे कसे मागू शकतो” म्हणत त्याने दिनेशला लाथा-बुक्यांसह बांबूने बेदम मारहाण केली, ज्याच्यात त्याचा मृत्यू झाला.

आम्हाला माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीची पाहणी करून भादवि कलम ३०२ नुसार गुन्हा करून तपास सुरु केला आहे. मारपीट करणारा मित्र हा तेथून पळून गेला आहे. पिडीताचा भाऊ आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही आरोपी मित्राचा शोध घेत आहोत. असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes