विद्यार्थ्यांची आरोग्य जनजागृती

आयआयटी |  रविराज शिंदे

sandesh vidyalayन पावसाच्या चाललेल्या पाठ शिवणीच्या खेळामुळे मुंबईत डेंगू, मलेरिया, स्वाईन-फ्लू सारख्या विविध आजारांनी तोंड वर काढले आहे. या आजारांना पालिकेकडून आधीच धोकादायक आजार म्हणून घोषित करण्यात आले असून, या आजारांना रोखण्यासाठी पालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु त्यानंतरही अनेक लोकांपर्यंत माहिती पोहचत नसल्याने, अनेक लोक आजही या आजारांचे बळी पडत आहेत. म्हणूनच आता पवईच्या लोकांच्यात जनजागृती करण्याचे शिवधनुष्य संदेश महाविद्यालयातील विद्यार्थांनी आपल्या हाती घेतले आहे.

संदेश विद्यालयातील १०० विद्यार्थी या जनजागृती अभियानात उतरले असून, पवईसह भांडूप, विक्रोळी येथील विविध भागात जावून हे विद्यार्थी या गंभीर आजारांवर जनजागृती करत आहेत. पवईतील गावठाण, गोखले नगर, फुलेनगर, इंदिरानगर, मोरारजीनगर आणि हिरानंदानी सारख्या विभागात हे विद्यार्थी दारोदारी जावून लोकांना आजरांविषयी माहिती देत आहेत.

आजारा पाठीमागील प्रमुख कारणे काय आहेत? या आजारांवर उपचार कसे करावेत? परिसरातील स्वच्छता कशी राखावी? तातडीने करावयाचे उपचार? अशा अनेक गोष्टी समजावून देवून या आजारांना रोखणे, उपाययोजना व औषधोपचाराबाबत जनजागृती केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी सुद्धा या अभियानाला उस्फूर्त प्रतिसाद देत, पवईतील तिरंदाज पालिका रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत. काही ठिकाणी विद्यार्थी स्वतः नागरिकांना मोफत तपासणीसाठी जवळच्या मनपा रुग्णालयात घेऊन जात आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!