२.८३ लाखाच्या मोबाईलची चोरी; तडीपार आरोपीला ४ तासात बेड्या

पवई पोलीस ठाणेसह मुंबईच्या हद्दीतून तडीपार असतानाही परिसरात येवून २.८३ लाखाचे मोबाईल चोरी करून पोबारा केलेल्या सराईत चोरट्याला पवई पोलिसांनी गुन्ह्याच्या ४ तासातच बेड्या ठोकल्या आहेत. सुरेश दत्ता काकडे (वय २८ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

यातील फिर्यादी निशा दास या शुक्रवार, ०८ जुलैला झोपेत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घरात रात्री ०२ ते सकाळी ०६.३० वाजण्याच्या दरम्यान प्रवेश करत घरातील आय फोन १३प्रो मँक्स, वन प्लस ९ प्रो, पाईम, सँमसंग एम 11, सँमसंग गॅलेक्सी एम ३२, अँपल वॉच आणि सॅमसंग गॅलेक्सी जे २ असा अंदाजे २.८३ लाख रुपयाच्या वस्तूंची चोरी केली होती.

दास यांच्या फिर्यादीवरून पवई पोलीस ठाण्यात भादवि कलम ३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक पवई पोलीस ठाणे बुधन सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि विनोद पाटील, पोलीस हवालदार बाबू येडगे, पोलीस नाईक आदित्य झेंडे, अभिजित जाधव, पोलिस शिपाई संदीप सुरवाडे, प्रमोद पुरी यांचे पथक याबाबत तपास करत होते.

गुन्हे प्रकटीकरण पथकाने नमूद गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु केला होता. “गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती प्राप्त झाली कि, सदरचा गुन्हा अभिलेखवरील आरोपी सुरेश काकडे याने केला आहे. त्यानंतर वेगवेगळे पथक तयार करून त्याचा निटी पाईप लाईन परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला,” असे यासंदर्भात बोलताना सपोनि पाटील यांनी आवर्तन पवईला सांगितले.

ते पुढे म्हणाले, “काकडे याला ताब्यात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून आम्ही चोरीला गेलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत केली आहे.”

अटक आरोपी सुरेश काकडे हा सराईत गुन्हेगार असून, तडीपार असल्याने सदर गुन्हात मपोका कलम १४२ची वाढ करण्यात आली आहे.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!