पाईपवर चढून डोकावत होता विद्यार्थिनी वसतिगृहाच्या शौचालयात, पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चंदीगड विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या शौचालयात विद्यार्थिनींचे कथित गुप्त चित्रीकरण केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरलेला असतानाच पवईमध्ये सुद्धा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयआयटी बॉम्बेमधून हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आयआयटी बॉम्बेमधील महीला वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या शौचालयापर्यंत पाईपवरून चढून खिडकीतून डोकावल्याच्या गुन्ह्यात पवई पोलिसांनी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

पिंटू गरिया (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर घटनेनंतर आयआयटी बॉम्बेसह, मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलींच्या शौचालयात डोकावणाऱ्या पिंटू याला मंगळवारी बेड्या ठोकल्या आहेत.

पवईस्थित आयआयटी बॉम्बेमध्ये येथील विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय म्हणून कॅम्पसमध्ये विविध वसतिगृहे बनवण्यात आली आहेत. यातीलच एका विद्यार्थिनी वसतिगृहात असणारया शौचालयात येथे शिकणारी एक पीएचडीची विद्यार्थिनी रविवारी रात्री गेली असता, तिला शौचालयाच्या भागात कोणीतरी असल्याचे जाणवले. तिने मागे वळून पाहिले असता एक तरुण खिडकीतून डोकावत असल्याचे तिला दिसले.

“ती धावतच शौचालयातून बाहेर पडली आणि सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती देण्यासाठी जात असताना हिरवा टी-शर्ट घातलेला एक तरुण तेथून पळताना तिला दिसला,” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “सदर प्रकाराबाबत त्या विद्यार्थिनीने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही तपास सुरु केला होता. आयआयटी बॉम्बेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने आम्ही परिसरात शोध घेत काही विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्याकडे चौकशी केली असता येथील कॅन्टिनमध्ये काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुण पिंटू गरिया याने गुन्ह्याची कबुली दिली.

“भादवि कलम (३५४ (क) नुसार मुलींच्या शौचालयात डोकावल्याच्या गुन्ह्यात आम्ही आरोपी पिंटू गरिया याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील मोबाईल आम्ही हस्तगत केला आहे. मोबाईलमध्ये आम्हाला मुलीच्या चित्रीकरणाची किंवा कोणतीही आक्षेपार्ह क्लिप मिळून आलेली नाही. लवकरच मोबाईल अधिक तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवणार आहोत,” असे यासंदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!