Archive | समाज प्रबोधन, समाजकार्य / समाजसेवा

पवईतील विद्यार्थ्यांची ‘प्लास्टिक फ्री पवई’ची मोहीम

पवईला प्लास्टिक फ्री करण्यासाठी पवईतील हिरानंदानीमध्ये राहणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून, परिसरात ‘प्लास्टिक फ्री पवई’ मोहीम राबवत आहेत. लोकांनी जास्तीत जास्त कागदी पिशव्यांचा वापर करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी ते परिसरात गेल्या महिनाभरापासून जनजागृती करत आहेत. मुंबईतील हिरानंदानी फाऊन्डेशन स्कूल, ओबेरॉय स्कूल, इकोलेमोन्डेले स्कूल, एस. एम. शेट्टी स्कूल अशा नामांकित शाळांमध्ये शिकणाऱ्या श्लोक बाबू, […]

Continue Reading 0

आवर्तन पवई इम्पॅक्ट: पालिकेने ८ तासात दुरुस्त केला रामबागचा रस्ता

पवईकरांचे आपले हक्काचे माध्यम असणाऱ्या आवर्तन पवईचा दणका पुन्हा एकदा पहायला मिळाला आहे. पवई रामबाग येथील क्रिस्टल पॅलेस इमारती समोर पेवरब्लॉक उखडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याकडे आवर्तन पवईने ट्विट आणि फोनवरील तक्रारीच्या माध्यमातून लक्ष वेधल्यानंतर केवळ ८ तासाच्या आत पालिकेने रस्ता दुरुस्त करून घेतला आहे. पवईतील रामबाग येथील डी पी रोड नंबर ९ वर […]

Continue Reading 0

तरुणांनी हटवला गड्डे बंगल्याजवळचा स्थानिक निर्मित कचरा डेपो

रमेश कांबळे, प्रतिक कांबळे स्वच्छता राखणे, आपला परिसर नीटनेटका ठेवणे कोणा एकाचे काम नाही, यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असते, हेच ध्येय समोर ठेवत आयआयटी, पवई येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथील तरुणांनी पुढाकार घेत स्थानिक निर्मित माता रमाबाई नगर व चैतन्यनगर येथील गड्डे बंगल्याजवळचा कचरा डेपो साफ करत परिसर कचरामुक्त केला. पंचशील म्युजिकल ग्रुपच्या अनिल […]

Continue Reading 0

शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे पवईत सरकार विरोधात निदर्शने

– अविनाश हजारे – ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधी वणवा पेटला असतानाच, त्याची ठिणगी शहरी भागातही येऊन पोहोचली आहे. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संस्था, संघटना पुढे येत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डीवायएफआय व अन्य समविचारी संघटनेंच्यावतीने बुधवारी ७ जूनला पवईमध्ये सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी इतिहासात पाहिल्यांदाच शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसत […]

Continue Reading 0
r athavale

संविधान किंवा आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मी सोडणार नाही – रामदास आठवले

@रविराज शिंदे भाजप सरकार बाबासाहेबांनी लिहलेलं संविधान आणि मागासवर्गीयांना दिलेलं आरक्षण नष्ट करण्याच्या तयारीत आहे अशी अफवा काहीजण पसरवत आहेत.  मात्र हे सत्य नसून, भाजप सरकार विरोधात खोट्यानाट्या अफवा पसरवून आंबेडकरी चळवळीतील लोकांना भडकविण्याचे कारस्थान सुरू आहे. मात्र, जर कोणी संविधान किंवा आरक्षणाला नष्ट करण्याचा प्रयत्न जरी केला तर मी त्यांना सोडणार नाही. असा इशाराच […]

Continue Reading 0

‘पवई से नो टू ड्रग्ज’ रॅलीचे आयोजन

पवई भागात वाढत्या नशाखोरीला रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी (भाजपा) वार्ड क्रमांक १२२ तर्फे सोमवारी हिरानंदानी ते आयआयटी ‘पवई से नो टू ड्रग्ज’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा नगरसेवक (१२२) वैशाली पाटील, पदाधिकारी व कार्यकत्यांसह मोठ्या प्रमाणात स्थानिक यात सहभागी झाले होते. अनेक तरुणांना ड्रग्ज सारख्या व्यसनाने आपल्या कवेत घेतलेले असताना, आता याची लाट […]

Continue Reading 0

आयआयटीत ‘धम्मदीप’चे ‘भिमस्पंदन’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या यावर्षी साजऱ्या होणाऱ्या १२६ व्या जयंतीनिमित्त बौद्ध धम्माचा दिप तेवत ठेवणाऱ्या धम्मदीप सोशल ॲण्ड कल्चरल असोसिएशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून शनिवारी आयआयटी मार्केट भागात संस्थेतर्फे ‘भिमस्पंदन’ या प्रबोधनपर संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची […]

Continue Reading 0
human chain for kulbhushan at Hiranandani, Powai

मानवी साखळीच्या माध्यमातून पवईकरांची कुलभूषण जाधवांच्या सुटकेची मागणी

माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनाविलेल्या फाशीच्या शिक्षेनंतर देशभरातून सेलिब्रिटींजसह सर्वसामान्य नागरिक विविध माध्यमातून आपला निषेध व्यक्त करत आहेत. गुरुवारी सकाळी पवईकरांनी हिरानंदानी येथील सिल्वर ओक या त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीबाहेर ‘मानवी साखळी’ करुन शासनाकडे जाधवांना परत आणण्याची मागणी केली. यात जाधव यांचा लॉन्ड्री बॉय विजय कनोजियाचा सुद्धा सहभाग होता. पवईकर व माजी […]

Continue Reading 0
20170320-005821.jpg

पवईत सापडलेली चिमुरडी परतली स्वगृही

पवईत चांदशहावाली जत्रेच्या दरम्यान पवई पोलिसांना सापडलेल्या ६ वर्षाच्या मुलीच्या परिवाराचा शोध काढत पवई पोलिसांनी तिला सुखरूप स्वगृही परतवले आहे. शनिवारी पवई पोलिसांनी तिचे वडील विनोद शेंडे यांच्या ताब्यात मुलीला सुपूर्द केले. एका महिन्यात तिसऱ्यांदा पवई पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावत २४ तासाच्या आत परिवार पुनर्मिलन घडवले आहे. यापूर्वी हिरानंदानी येथील शाळेतून गायब झालेल्या […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes