सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मज्जाव करणाऱ्या पोलिसास तरुणांकडून मारहाण

वई, हिरानंदानी येथील हेरीटेज उद्यान येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बसलेल्या तरुणांना तिथे दारू पिण्यास मज्जाव करणाऱ्या पोलीस हवालदाराला काही तरुणांनी मारहाण केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली.जवाहरलाल राठोड असे या पोलीस हवालदाराचे नाव असून, ते पवई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत पवई पोलिसांनी गुन्हा नोंद करून ४ तरुणांना अटक केली असून, अजून दोन तरुणांचा शोध सुरु आहे.

राठोड रात्रपाळी गस्तीवर असताना त्यांना हिरानंदानीतील हेरीटेज उद्यान येथे काही तरुण दारू पिऊन धुडगूस करत असल्याची तक्रार मिळाली होती. उद्यानाच्या बाहेरील कठ्यावर सहा तरुण दारू पित दंगा करत असल्याचे त्यांना आढळून येताच त्यांना सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास विरोध दर्शवत तिथून निघून जाण्यास सांगितले.

त्यापैकी दोघांनी राठोड यांच्यावर हल्लाबोल करत शिवीगाळ करायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात वायरलेसवर मदतीसाठी रेडिओद्वारे संदेश मिळाल्यानंतर घटनास्थळी येणाऱ्या पोलिस व्हॅनला पाहून तरुणांच्या संपूर्ण गटाने पोलीस हवालदारावर हल्ला केला.

मदतीसाठी पोहचलेल्या पोलीस व्हॅनमधील अधिकाऱ्यांनी त्वरित धरपकड करत अभिषेक शेट्टी (२३), रिंकी वजा (२२), किशोर पुजारी (२३) आणि सिध्दांत पवार (२२) या तरुणांना ताब्यात घेतले. यातील काही तरुणांनी राठोडला ‘तू ठीक नाही केलेस, तुझी वर्दी उतरवल्याशिवाय राहणार नाही’ अशी धमकी सुद्धा यावेळी दिली असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

राठोडना किरकोळ दुखापत झाली असून, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अटक तरुणांपैकी काही तरुण हे महाविद्यालयात शिक्षण घेत असून, भादवि कलम ३५३ (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी फौजदारीपात्र बलप्रयोग, धाक दाखवणे) ३३२ (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे) ३३३ (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे) ५०४ (शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे), ५०६ (फौजदारीपात्र धाकदपटशाबद्दल शिक्षा), ३४ (समान उद्देश साध्य करण्यासाठी अधिक व्यक्तींनी केलेली कृती) अनुसार गुन्हात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

“आम्ही सदर गुन्ह्यात ४ तरुणांना अटक केली असून, त्यांचे अजून दोन साथीदार परमेश्वर झल्लेश्वर (२७) आणि सचिन कांबळे (१८) यांचा शोध घेत आहोत”असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

One Response to सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मज्जाव करणाऱ्या पोलिसास तरुणांकडून मारहाण

  1. Bhushan April 9, 2018 at 3:14 pm #

    2, 4 encounter केले पाहीजे होते, UP sarkha….

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!