चांदिवलीत मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन

परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन म्हणून सावली सेवा फाऊंडेशनच्यावतीने १८ डिसेंबर रोजी सकाळीं १०:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत एकदिवसीय कोविड लसीकरण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. चांदिवली येथील सिंहगड कॉलेज, म्हाडा कॉलनी येथे ही लसीकरण मोहीम राबवली जाणार असून, कोविड-१९ पासून सुरक्षेसाठी शासन मान्य पहिला आणि दुसरा कोव्हीशिल्ड (Covishild) लसीचा डोस यावेळी दिला जाणार आहे.

सदर लसीकरणाच्या लाभार्थींची नोंदणी सायंकाळी ७ वाजल्या पासून साई बाबा मंदिर, गणेश मैदान, म्हाडा कॉलनी चांदिवली येथे करण्यात येईल. तसेच खाली नमूद केलेल्या संपर्क क्रमांकावर देखील आपण आपले नाव नोंदवून घेऊ शकता.

महादेव पवार – 9967882757, अजय शेलार – 9869399747, प्रशांत नलगे – 9773374653, प्रियांका राजे निंबाळकर – 9987744807, निखिल यादव – 7666697240, नितीन वाघमारे – 8779657902, योगेश शेरे – 9969874724, विनोद पाटील – 9773542715, अनिकेत रसनभैरे – 9082229615, निखिल गावडे – 9619461675, अमित गुप्ता – 9821757668

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ (म्हाडा कॉलनी चांदिवली); चांदिवली म्हाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ; साई ईश्वर पदयात्रा मंडळ; जय गणेश तरुण मित्र मंडळ (रजी) चांदिवली; छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ (म्हाडा कॉलनी चांदिवली); गिरीदर्शन स्पोर्ट्स क्लब, चांदिवली मित्र मंडळ या उपक्रमाचे सह-आयोजक आहेत.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!