गौतमनगरकरांच्या रिकाम्या हंड्यात पालिकेचे पाण्याचे आश्वासन

प्रभाग क्रमांक १२२ मधील गौतमनगर, आयआयटी पवई येथे पाठीमागील दोन महिन्यापासून कमी दाबाने पाणी येत आहे. यासंदर्भात महानगरपालिका ‘एस विभाग’ यांना वारंवार तक्रार करून सुद्धा पालिका कानाडोळा करीत आहे. स्थानिक नगरसेवक यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रविवारी स्थानिकांनी नगरसेवक कार्यालयावर हंडा मोर्चा काढत आपला राग व्यक्त केला होता. त्यानंतर पालिकेने आता या भागात लोकांना नवीन पाईपलाईनच्या साहय्याने पाणीपुरवठा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले कि, गेली अनेक वर्ष आम्ही पाण्याच्या समस्येसाठी लढत आहोत. आम्हाला मोजून ३ हांडे पाणी मिळते. याबाबत आम्ही सगळे दरवाजे ठोठावून झालेत, मात्र पाण्याचा दबाव वाढण्याऐवजी कमी होत आहे. शुक्रवारपासून तर तीन हंड्याच्या जाग्यावर अर्धाच हंडा पाणी येत आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या त्रासात अजून भर पडली आहे.

‘स्थानिक प्रतिनिधी, पालिका प्रशासन यांना सतत पाठपुरावा करून सुद्धा ते याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अखेर आम्ही आज स्थानिक नगरसेवकांच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढून आमची समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एवढ्यावर समस्या निवारण झाले नाही तर आम्ही यापेक्षा मोठे पाऊल उचलू’, असे याबाबत बोलताना स्थानिक रहिवासी राहुल गच्छे यांनी सांगितले.

रविवारी संध्याकाळी स्थानिक रहिवाशांनी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नगरसेवक यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली. दुसऱ्या दिवशी ‘एस वार्ड’ महानगरपालिका पाणी विभागाचे कनिष्ठ अभियंता जोशी यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून दुसऱ्या जाग्यावर नव्याने नळजोडणी करून पाणीपुरवठा सुरळीत करणार असल्याचे सांगत रहिवाशांना दिलासा दिला.

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!