एटीएम वापरकर्त्यांची फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित चोराला साकीनाकामधून अटक

मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम वापरकर्त्यांची फसवणूक करणाऱ्या एका ३३ वर्षीय एमबीए पदवीधारकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तोफील अहमद लालमियां सिद्दीक असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव असून, तो कमी शिक्षित किंवा एटीएम वापराची माहिती नसणाऱ्या लोकांना आपला सावज बनवत असे. त्याच्याकडून पोलिसांनी १०० पेक्षा अधिक डेबिट कार्डे जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीक गर्दी कमी असणाऱ्या आणि सुरक्षारक्षक नसणाऱ्या ऑटोमॅटेड टेलर मशीन (एटीएम) केंद्राजवळ थांबायचा. एखादा व्यक्तीला एटीएम व्यवहार करण्यास अडचण येत आहे हे हेरून त्याच्या व्यवहारात मदत करण्याच्या बहाण्याने तो त्याची फसवणूक करत असे.

“व्यवहार करताना त्या व्यक्तीचा पिन क्रमांक लक्षात ठेवून त्याचा व्यवहार पूर्ण झाल्यावर संभाषणात मग्न करत एटीएम कार्ड बदलून बनावट एटीएम कार्ड देत असे. नंतर तोफिल त्यांच्या खात्यातून पैसे काढत असे,” असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

“तत्सम मोडस ऑपरेंडीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद झाल्यानंतर आम्ही अनेक एटीएम केंद्रांचे सीसीटीव्ही जमा केले ज्यात आम्हाला एक संशयित दिसून आला. आमच्या खबऱ्यांना सतर्क करून आरोपीची ओळख पटल्यानंतर आम्ही त्याला साकीनाका येथून अटक केली आहे,” असे याबाबत बोलताना पोलिस निरीक्षक प्रमोद कोकाटे यांनी सांगितले.

साकीनाका, ९० फीट येथील रहिवासी तौफील प्युरिफायर कंपनीत काम करत होता, मात्र कामात कुचराई केल्यावरून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. सुरुवातीला फक्त गंमत म्हणून केलेले कृत्य झटपट पैसे कमावण्याची एक सोपी पद्धत असू शकते पाहता त्यानंतर त्याने लोकांची फसवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्याला यापूर्वी कुलाबा पोलिसांनीही अटक केली होती.

घाटकोपर, पंतनगर, साकीनाका आणि माहीममधील किमान नऊ प्रकरणे सोडवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपींकडून ताब्यात घेतलेल्या कार्डधारकांचा तपशील मिळवण्यासाठी आम्ही बँकांना पत्र लिहिले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांना संशय आहे की तोफील २०१८ पासून लोकांची फसवणूक करीत आहे आणि त्यांनी अदलाबदल केलेल्या कार्डांचा वापर करुन लाखो रुपये काढलेले आहेत.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!