सोशल मीडियावर सुसाईड नोट टाकलेल्या वकिलाची हिरानंदानीतून सुटका

आत्महत्येची पोस्ट करून गायब असणाऱ्या ३६ वर्षीय वकिलाला मुंबई पोलिसांनी शोधून काढत त्याच्या कुटुंबाला दिलासा दिला आहे. वकिलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तीन तासांच्या आत त्याचा शोध घेण्यात आला. पवई येथील जंगल परिसरात तो बसलेला पोलिसांना मिळून आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, नाशिकचे रहिवासी असलेले वकील ४५ दिवसांपूर्वी घाटकोपर, मुंबई येथे आपल्या मावशीच्या घरी आले होते. “रविवारी मावशीला फेसबुकवर त्याने लिहलेली एक पोस्ट दिसली ज्यामध्ये तो आत्महत्येचा प्रयत्न करणार असल्याचा उल्लेख होता. तसेच, तो काहीही न सांगता कोठेतरी निघून गेला होता. त्याचा फोन बंद असल्याने कॉल लागत नव्हता तसेच कोणतेही अपडेट मिळत नव्हते, त्यामुळे त्याच्या मावशीने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार केलो होती,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

कुटुंबाने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर लगेचच एका पथकाने तांत्रिक तपशील आणि मोबाईल लोकेशनसह तपशील गोळा करून तपास सुरू केला होता.

पोलीस पुढे म्हणाले, “पवईतील हिरानंदानीजवळील जंगल टेकड्यांजवळ हेलिपॅडसाठी असलेल्या प्रतिबंधित क्षेत्राजवळ पोलिस पथकाला त्याचे लोकेशन मिळून आले. त्या अनुषंगाने एक पथक त्याचा शोध घेण्यासाठी त्या परिसरात पोहोचले. तेथील जंगल भागात तो बसलेला पोलिसांना मिळून आला.”

त्ताब्यात घेऊन समुपदेशनानंतर त्याला कुटुंबाला सोपवण्यात आले आहे.

, , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!