हिरानंदानीत पुन्हा बिबट्या

lprdहिरानंदानीतील सुप्रीम बिसिनेस पार्क जवळील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या स्टोर रूममध्ये येथील कामगाराला गुरुवारी सकाळी बिबट्या आढळून आल्याने परिसरात पुन्हा घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेली तीन वर्ष इथून काही अंतरावरील जंगलात वास्तव्य असणारा बिबट्या खाली उतरून आल्याने पवईकरांची चिंता वाढली आहे.

गेल्या तीन वर्षापासून ठराविक कालावधीने हिरानंदानी येथे असणाऱ्या टेकडीवरील जंगल भागात लोकांना बिबट्याचे दर्शन घडत असते. येथे त्यास खाण्यास भरपूर शिकार उपलब्ध असल्याने त्याने येथेच वास्तव्य केले असावे असा अंदाज प्राणीमित्र आणि वन विभागाकडून वर्तविला जात आहे.

गुरुवारी हिरानंदानीमधील सुप्रीम बिसिनेस पार्कच्या पाठीमागील भागात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या स्टोर रूममधून बाहेर निघणारा बिबट्या एका कामगारास आढळून आला. शिड्यांवरून तळमजल्यावर उतरून तो इमारतीच्या पाठीमागील भागातून बाहेर निघून गेला असल्याचे त्याने पाहिले.

याबाबत संबंधित इमारतीच्या प्रशासनाकडून त्वरित ठाणे वन अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. बोरीवली राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी येवून जागेची पाहणी केली. इमारतीच्या तळमजल्यावर तो परतत असताना उमटलेल्या पायांच्या ठस्यांमुळे त्याचे येथे आल्याचे नक्की झाले आहे.

“आमच्या एका कामगाराने इमारतीच्या स्टोर रूममधून निघून शिड्यांवरून जाताना एका बिबट्याला पहिल्याची माहिती त्याने व्यवस्थापनाला दिली आहे. इमारतीच्या पाठीमागील बाजूस बिबट्या गेल्यानंतर तो कोठे निघून गेला याची कोणासही माहिती नाही” असे व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी विवेक देशपांडे यांनी सांगितले.

पवईकरांसाठी बिबट्या दिसणे नवीन नसले तरी, केवळ डोंगराच्या माथ्यावर दिसणारा बिबट्या काही दिवसांपूर्वी लेक होममध्ये आणि आता हिरानंदानीतील मानवी वस्तीत असणाऱ्या इमारतीच्या स्टोर रूमपर्यंत पोहचल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!