पवईत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला; एकाला अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

पूर्व वैमनस्याचा राग मनात ठेवून भांडण काढत एका तरुणावर ४ लोकांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना पवईमध्ये घडली आहे. इसाकीमुत्तू तेवर कटेन असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यासंदर्भात पवई पोलिसांनी भादवि कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), ३४ (दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान उद्देशाने केलेल कृत्य) नुसार गुन्हा नोंद करत मुत्तू नानार तेवर (२५) नामक एका आरोपीला अटक केली आहे. ३ आरोपी फरार असून, त्यातील एक हा अभिलेखावरील गुन्हेगार असून, शिक्षा भोगून परत आला आहे.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईतील फुलेनगर भागात राहणारे काही तरुण जवळच्या डोंगरावर पार्टी करत बसले होते. यावेळी जखमी तरुण कटेन आणि त्याचा नातेवाईक असणारा मुत्तू नानार तेवर यांच्यात पूर्व वैमनस्यातून भांडण सुरु झाले. “या रागाच्या भरातच अटक आरोपी आणि फरार आरोपी यांनी मिळून जखमीवर चाकूने प्राणघातक हल्ला करत त्याला गंभीर रित्या जखमी केले,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

“गुन्ह्याची माहिती मिळताच आम्ही तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर एकाला अटक केली आहे. इतर तिघांचा शोध सुरु आहे, असे याबाबत बोलताना पोलीस निरिक्षक (गुन्हे) दिलीप धामुनसे यांनी सांगितले.

“फरार ३ आरोपी पैकी एका आरोपीवर गंभीर गुन्ह्याची नोंद असून, कारावासाची शिक्षा भोगून परत आलेला आहे,” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!