डिसेंबरमधील दुसरे सर्वोच्च किमान तापमान; पवईमध्ये हलक्या सरी

मुंबईमध्ये पाठीमागील आठवड्यात शुक्रवारी डिसेंबरमधील सर्वांत कमी तापमान नोंद झाल्यानंतर या आठवड्यात मुंबईचा पारा पुन्हा खाली पडला. गुरुवारी पहाटे शहराला जाग आली ती कुडकुडायला लावणाऱ्या गुलाबी थंडीने. हवामान खात्याच्या सांताक्रूझ वेधशाळेचे रात्रीचे तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. जे दशकातील दुसर्‍या क्रमांकाचे किमान तापमान आहे. तर गुरुवारी कुलाबा वेधशाळेत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. विशेष म्हणजे पवईमध्ये काही ठिकाणी हलके थेंब पडल्याचा अनुभव सुद्धा काही पवईकरांनी घेतला.

पवईमध्ये डिसेंबरमध्ये झालेल्या या ‘बिन मौसम बरसात’ची चर्चा अनेक व्हाटस गृपवर रंगलेली पहायला मिळाली.

आकाशात निर्माण झालेल्या ढगांच्या आच्छादनामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने थंड वातावरण निर्माण झाले असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील मुलुंड, पवईसह काही भागात थेंब बरसले.

, , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!