कचऱ्याच्या समस्येसाठी युथ पॉवरचे पालिकेला पत्र

chaitanya nagar kachraवईत अनेक परिसरात कचराकुंड्यांची सोय नसल्याने उघड्यावर कचरा फेकला जात असून, यामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. याच समस्येला पालिकेच्या निदर्शनास आणण्यासाठी युथ पॉवर संघटनेतर्फे पालिका एस विभागाला कचराकुंडीची सोय करण्याचे पत्र देण्यात आले आहे.

‘स्वच्छ मुंबई – सुंदर मुंबई’चे ब्रीद वाक्य उराशी बाळगत मुंबईला स्वच्छ ठेवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या गचाळ आणि गलथान कारभारामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छ मुंबई नजरेस पडते. पालिका एस विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक ११५ व ११६ यामध्ये सुद्धा यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही आहे. परिसरात दिवसातून एकदाच कचऱ्याची गाडी येत असल्याने, तसेच कचरा कुंड्या नसल्याने रस्त्यावरच कचरा टाकला जात आहे. ज्यामुळे संपूर्ण रस्त्यावर पसरलेल्या कचऱ्याच्या साम्राज्याचे दृश्य नेहमीच पवईत अनेक ठिकाणी पहावयास मिळते. कचऱ्याच्या या वाढत्या समस्येला वाचा फोडण्यासाठी युथ पॉवर संघटनेतर्फे पालिका एस विभागाला पत्र देवून लक्ष वेधले गेले आहे.

याबाबत बोलताना संघटनेचे अध्यक्ष विरेंद्र धिवार यांनी सांगितले, “येथील अनेक परिसरात लोक रस्त्यावर आपल्या घरातील कचरा आणून टाकत असतात. दिवसातून एकदाच ते सुद्धा ठराविक भागातच कचरा गाडी येऊन कचरा उचलून घेऊन जाते. त्यानंतर निघणारा कचरा हा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत रस्त्यावरच पडून असतो. त्यात उरलेले अन्न आणि ओला कचरा असल्याने तो कुजून त्यातून दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरत आहे. कचऱ्यात तयार होणाऱ्या आजाराच्या जिवाणूंमुळे परिसरात आजारही पसरत आहेत. त्यामुळे या परिसरात कचराकुंड्यांची सोय केल्यास काही अंशी का होईना पण समस्येचे नक्की निवारण होईल.”

“चैतन्यनगर गड्डे बंगलो जवळील कचऱ्याच्या समस्येबाबत नवदुर्गा मित्र मंडळातर्फे पालिका घनकचरा व्यवस्थापन ‘एस’ विभाग सोबतच पालिका आयुक्त आणि महापौर यांना पत्रव्यवहार करून या समस्येकडे यापूर्वी हि लक्ष वेधले गेले होते. मात्र त्यांच्याकडून अजूनही काहीच प्रतिउत्तर मिळाले नसून, समस्याचे निवारण करण्याची काहीच हालचाल त्यांच्याकडून केली जात नाही आहे”, असे आवर्तन पवईशी बोलताना मंडळाचे अध्यक्ष गणेश सातवे यांनी सांगितले.

वारंवार पत्रव्यवहार करूनही जाग येत नसणाऱ्या पालिका प्रशासनाला यानंतर तरी जाग येते का नाही हे पाहण्या व्यतिरिक्त पवईकरांकडे दुसरा मार्गाच उरलेला नाही आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!