जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यंग एन्व्हायर्नमेंटतर्फे पवई तलावाच्या किनाऱ्याची स्वच्छता

यंग एन्व्हायर्नमेंट ट्रस्टतर्फे ४ आणि ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पवई तलावाच्या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुण पर्यावरणवादयांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. हेव्हन्स अ‍ॅबोड फाऊंडेशन आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये सुमारे ३०० पेक्षा अधिक सदस्यांसह मोठ्या प्रमाणात महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी एचएचएच संस्थेच्या अध्यक्षा अनिता सिंग आणि सचिव अनामिका शर्मा यांनी सुद्धा आपल्या सदस्यांसह यात सहभाग घेत निसर्ग स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपला हातभार दिला.

या उपक्रमाच्या माध्यमातून सहभागी लोकांना कचरा आणि प्लास्टिक वेगळे करण्याचे शास्त्र यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्लास्टिक प्रदूषणाचे स्रोत आणि मायक्रोप्लास्टिकचे प्रकार तपासण्यात आले. आपल्या निसर्गाला वाचवण्यासाठी सामुदायिक सेवेची आवश्यकता पूर्ण करण्यासोबतच हा उपक्रम असंख्य विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रकल्पांमध्ये उपयुक्त ठरला.

हवामान बदलाची पकड घट्ट होत असतानाच तरुण पुढाकार घेत यास कारणीभूत असणाऱ्या गोष्टी आणि लोकांवर कठोर कारवाईची मागणी करून भविष्य बदलण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व करत आहेत. त्यातच असे संवादात्मक कार्यक्रम त्यांना अशा प्रश्नांचे अधिक चांगले आकलन करण्यास मदत करणारे आहेत.

यासंदर्भात बोलताना हेव्हन्स अ‍ॅबोड फाऊंडेशनचे करण शर्मा म्हणाले, “हवामानातील बदल प्रत्येकावर परिणाम करतात. पवई तलाव प्लॅस्टिकमुक्त करणे तेथील वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे आहे, असा आमचा विश्वास आहे.”

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!