पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

hatyaग्नाच्या सात वर्षानंतरही मूल होत नसल्याने मानसिक तणावात असलेल्या व्यक्तीने पत्नीच्या डोक्यात हातोडी घालून तिची हत्या करून, स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पवईत उघडकीस आली आहे. याबाबत पवई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास करत आहेत.

पवई पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या फिल्टरपाडा भागात राहणाऱ्या सुरेश बीजे आणि प्रिती बीजे यांचे सात वर्षापूर्वी लग्न झाले होते. मात्र एवढे वर्षे उलटून सुद्धा संतती प्राप्ती होत नसल्याने, मानसिक तणावात असणाऱ्या दोघांच्यात सतत भांडणे होत असत. मंगळवारी सुद्धा दोघांच्यात याच कारणावरून भांडण झाले आणि रागाच्या भरात सुरेशने प्रितीच्या डोक्यात हातोडी घालून व तिच्या हाताच्या नसा कापून तिचा खून केला आणि नंतर स्वतः घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

“सुरेशच्या लहान भावाची बायको काही कामानिमित्त त्यांच्या घरी आली होती. मात्र, घरातून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने तिने आपला पती विजय आणि दिर राजू यांना याबाबत सांगितले. छत तोडून घरात प्रवेश केला असता, प्रीती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली तर सुरेशने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती”, असे आवर्तन पवईशी बोलताना वपोनि भाई म्हाडेश्वर यांनी सांगितले.

अजून एक अधिकाऱ्याने सांगितले, “घरात आम्हाला एक विजेचे बिल मिळून आले, ज्यावर सुरेशने आपल्या पत्नीची डोक्यात हातोडी मारून हत्या केल्याची कबुली दिली आहे.”

पवई पोलिसांनी सुरेश विरोधात भादंवि कलम ३०२ (खून) नुसार गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास करत आहेत.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes