पवई विहार रोड सोमवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; रस्ता निर्मितीच्या कामामुळे राहणार बंद

पवई विहार कॉम्प्लेक्स रोडवर करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे एका रात्रीसाठी हा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. लेकहोम किंवा चांदिवलीकडे जाणाऱ्या नागरिकांनी यासाठी एस एम शेट्टी मार्गे किंवा रामबाग, डी पी रोड नंबर ९ मार्गे प्रवास करायचा आहे. सोमवारी रात्री १० ते मंगळवार सकाळी ६ पर्यंत हा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.

पाठीमागील वर्षी पवई विहार कॉम्प्लेक्सच्या अंतर्गत रस्त्याच्या कामाचे धुमधडाक्यात उद्घाटन करून जवळपास वर्षभर हे काम रखडून पडले होते. आवर्तन पवईने स्थानिक प्रतिनिधी आणि पालिका कार्यालयात केलेल्या सततच्या पाठपुराव्या नंतर जुलै २०२२मध्ये पालिकेतर्फे पेवरब्लॉक लावून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता बनवण्यात आला आहे. मात्र यावेळी पवई विहार गेट ते इमारत क्रमांक २ गेट या भागातील रस्ता निर्मितीचे काम झाले नव्हते, त्यामुळे नागरिकांना प्रवेश करतानाच मोठा त्रास जाणवत होता.

“ड्रेनेज लाईनमुळे जवळपास २० ते २५ फुटाच्या अंतराच्या भागाचे रोड निर्मितीचे काम करण्यात आले नव्हते,” असे आवर्तन पवईशी बोलताना पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

अखेर पवई विहार कॉम्प्लेक्सच्या प्रवेशद्वारावरील ती अडचण दूर झाली असून, सोमवारी शिल्लक भागातील (पवई विहार प्रवेश ते इमारत क्रमांक २) रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. यासाठीच पवई विहार कॉम्प्लेक्सकडून लेकहोम, चांदिवलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आणि लेकहोमकडून हिरानंदानीकडे किंवा जेविएलआरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग सोमवार रात्री १० ते मंगळवार सकाळपर्यंत बंद राहणार आहे.

सोमवार पासूनच शंकर मंदिर ते गोपाल शर्मा स्कूल या भागातील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला देखील सुरुवात होणार आहे. शुक्रवारी रात्री स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभाचा नारळ फोडण्यात आला.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!