‘दक्षिण आशियाई क्रीडा’ स्पर्धेत पवईच्या जलतरणपटूला ३ सुवर्णपदके; रचला नवीन विक्रम

काठमांडू येथे डिसेंबर २०१९मध्ये झालेल्या १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत पवईतील १४र्षीय नववीत शिकणारी आपेक्षा फर्नांडिस भारताचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात युवा खेळाडूंपैकी एक आहे. तिने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक; २०० मीटर बटरफ्लाय स्ट्रोक आणि x२०० मीटर फ्री स्टाईल रिलेमध्ये तीन सुवर्ण पदके जिंकली.

हेजा विहारमधील बॉम्बे स्कॉटिश स्कूलची विद्यार्थिनी असणाऱ्या आपेक्षा फर्नांडिसने जलतरण स्पर्धेच्या जागतिक मंचावर देशाचे प्रतिनिधित्व करत तीन सुवर्ण पदके जिंकत आई-वडील, देश आणि शाळा यांची मान अभिमानाने उंच केली आहे.

डॉ. मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वात आयआयटी बॉम्बे आणि फॉरेस्ट क्लबमध्ये ती प्रशिक्षण घेते. नेपाळमधील काठमांडू येथे १० डिसेंबर दरम्यान झालेल्या १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आपेक्षा भारताचे प्रतिनिधित्व करत होती. आपल्या या पवईच्या युवा भारतीय जलतरणपटूने अनेक जलतरण स्पर्धांमध्ये प्रतिस्पर्धीला मात देत ३ सुवर्ण पदके जिंकत विक्रमही केला आहे. पहिले २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये.३८;०५ वेळेत पूर्ण करत, दुसरे, २०० मीटर बटरफ्लाय स्ट्रोकमध्ये .२१;०३ आणि ४x२०० मीटर फ्री स्टाईल रिले स्पर्धेत विक्रमी वेळेत पूर्ण करून तिसरे सुवर्णपदक आपल्या नावावर कोरले.

दक्षिण पूर्व आशियाई चँपियनशिपमध्ये अपेक्षाने देशाचे प्रतिनिधित्व करणारी ही पहिली वेळ नव्हती. यावर्षी २४ ते ऑक्टोबर या कालावधीत बेंगळुरू येथे झालेल्या १०व्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत तिथे तिने कांस्यपदक जिंकली होती. त्यापैकी प्रथम तिने :४०;३८ वेळेसह मुलींच्या १२ ते १४ वर्ष वयोगटातील २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये विजय मिळविला होता. × १०० मीटर मिश्रित भारतीय मेडले रिले संघाचा देखील ती एक भाग होती.

नोव्हेंबरमध्ये आपेक्षाने दिल्ली येथे झालेल्या स्कूल गेम्स फेडरेशनमध्ये तीन सुवर्णपदके मिळविली आणि दोन राष्ट्रीय विक्रमांची नोंद सुद्धा केली. २०० मीटर वैयक्तिक मेडलेसाठी प्रथम आणि २०० मीटर बटरफ्लाय स्ट्रोकसाठी दुसरे.

या वर्षाच्या सुरूवातीस भोपाळ येथे ३१ ऑगस्ट ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत आयोजित ७३ व्या सीनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले होते. जिथे तिने सिजन स्पर्धकांविरूद्ध स्पर्धा केली. महाराष्ट्र रिले संघ ज्याने फ्री स्टाईल रिलेमध्ये नवीन विक्रम नोंदवत मेडले रिलेमधील सुवर्णपदक जिंकले होते त्या संघाचा सुद्धा ती एक भाग होती.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांना भारत सरकारने पारितोषिके जाहीर केली असून १७४ सुवर्णपदकविजेत्यांना प्रत्येकी १.५ लाख रुपये इनाम देण्यात येणार आहे. तर रौप्य आणि ब्राँझ विजेत्यांना अनुक्रमे १ लाख आणि ५० हजार रु. इतके बक्षीस दिले जाईल, असे क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे.

जुलै २०१९मध्ये गुजरातच्या राजकोट येथे झालेल्या ३६व्या ग्लेनमार्क सब ज्युनियर आणि ४६व्या ज्युनियर राष्ट्रीय जलतरण चँपियनशिपमध्ये आपेक्षाने सात सुवर्ण पदके जिंकतानाच तीन नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवले आहेत.

तिने ४०० मीटरच्या वैयक्तिक मेडलेमध्ये ५.३.;८०च्या वेळेसह आणखी एक राष्ट्रीय विक्रम नोंदव तिने ११ वर्षांचा विक्रम मोडीत काढला. फ्रीस्टाईल आणि मेडले रिले या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकणार्‍या आणि राष्ट्रीय विक्रम निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र रिले संघातसुद्धा तिचा सहभाग होता. तिला पाच वैयक्तिक सुवर्ण आणि दोन रिले गोल्ड्स मिळाली होती. १४ वर्षाखालील मुलींमध्ये तिला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय जलतरणपटू म्हणून सुद्धा घोषित करण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट जलतरणपटू म्हणून तिला गौरविण्यात आले आहे. पुणेमध्ये झालेल्याखेल इंडिया यूथ गेम्स२०१९मध्ये आपेक्षाने दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती.

या तरुण जलतरणपटूने वारंवार प्रतिकूल परिस्थितीवर मत करत, अनेक मैलांचा टप्पा गाठला आहे. खूप कमी वयातच ती राष्ट्रीय अभिमान आणि प्रेरणास्रोत बनली आहे. आवर्तन पवईतर्फे तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!