पवईत भूस्खलन, गाड्यांचे नुकसान

भूस्खलन झाल्याने इमारतीची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना पवईमध्ये शुक्रवार सकाळी घडली. सुदैवाने येथे कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची नोंद झाली नसून, काही गाड्यांचे मात्र नुकसान झाले आहे.

पवईतील मुंबई महानगरपालिकेच्या प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी भूस्खलन झाल्याने सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना घडली. जवळपास १० मीटरपर्यंत जमीन धसल्याची घटना घडली आहे. कोरोना रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यासाठी येथे कोविड केअर सेंटर (सिसिसि) निर्माण करण्यात आले आहे. या केंद्रात सध्या १८ जण असल्याची माहिती मिळत असून, त्यांना इतरत्र हलवण्याची गरज नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

भूस्खलन झालेल्या ठिकाणी भिंतीच्या दुसऱ्या बाजूला एक इमारत निर्मितीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. पाठीमागील ३ दिवस मुंबईत सतत पाऊस पडत असून, जमीन भुसभुशीत झाल्याने ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेत कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची नोंद झाली नाही. मात्र, भिंतीला लागून उभ्या असणाऱ्या गाड्या, मोटारसायकल खड्डयात पडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.

“आम्ही परिसर सिल केला असून, आमची टीम पाहणी करत आहे,” असे पालिका ‘एल’ विभागातर्फे याबाबत सांगण्यात आले.

, , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!