Tag Archives | best bus

electric best

ठाणे ते पवई (हिरानंदानी) बेस्टची प्रीमियम बससेवा पुढच्या आठवड्यापासून

बेस्टच्या प्रीमियम बससेवेला पहिल्या दिवसांपासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर बेस्ट उपक्रमाने मुंबईतील आणखी ३ मार्गावर ही बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वातानुकूलित प्रीमियम बससेवा ठाणे ते पवई (हिरानंदानी), चेंबूर ते कफ परेड, आणि खारघर ते बीकेसी या तीन मार्गांवर सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक, वातानुकूलित प्रीमियम अशी ही बस असणार आहे. ‘चलो […]

Continue Reading 0
accident milind nagar

बेस्ट बसने तरुणाला उडवले; जागीच मृत्यू

शनिवारी सकाळी पवई मिलिंदनगर भागात १०.४५ वाजता सिग्नलजवळ रोड पार करत असताना एका अज्ञात बेस्ट बस चालकाने तरुणाला उडवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राकेश नंदलाल पाटील (२४) असे तरुणाचे नाव आहे. पोलीस अज्ञात चालकाचा शोध घेत आहेत. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई मिलिंदनगर येथे आपल्या परिवारासह राहणारा राकेश हा विद्यार्थी होता. सकाळी १०.४५ […]

Continue Reading 0
asd

साकीनाका मेट्रो ते चांदिवली बस सेवा सुरु

साकीनाका मेट्रो स्टेशनवर चांदिवली, पवई भागातून येणाऱ्या लोकांचा मोठा लोंढा पाहता सकाळी ऑफिसवेळेत आणि संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेत बेस्टतर्फे साकीनाका मेट्रो ते चांदिवली नवीन बस सेवेचा गुरुवार पासून शुभारंभ केला आहे. प्रत्येक १२ मिनिटांनी ही सेवा असणार आहे. साकिनाका मेट्रो स्थानकाजवळच असणाऱ्या बस स्थानकातून ही बस सुटणार असून, चांदिवलीच्या मुख्य स्थानकातून या बसेस निघतील. साकीनाका […]

Continue Reading 1
accident

साकीनाका येथे बसखाली येऊन एका तरुणाचा मृत्यू तर एक जण जखमी

मोटरसायकलवरून जात असताना संतुलन बिघडल्याने बेस्ट बसखाली येऊन एका तरुणाचा मृत्यू, तर एक तरुण जखमी झाल्याची घटना काल साकीनाका खैरानी रोडवर घडली. प्रवीण दिलीप पुजारी (२६) असे मृत तरुणाचे नाव असून, पाठीमागे बसलेला सुमित राजेंद्र चंदनशिवे (१७) हा तरुण जखमी झाला आहे. साकीनाका पोलिसांनी बस चालक तानाजी कुंभार (४१) याला अटक करून कोर्टात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!