Tag Archives | lake homes

container truck collided

पवईत पावसाने दाणादाण

झाडे पडली, कंटेनर घसरून अडकून पडल्याने वाहतूक कोंडी, इमारतीत पाणी घुसले, नाले भरून वाहू लागले @प्रमोद चव्हाण मुंबईत शुक्रवारी रात्री पासूनच पावसाचे जोरदार आगमन झाले. शनिवार दिवसभर थोड्या थोड्या कालावधीत बरसत राहिल्याने मुंबापुरी तुंबल्याची चित्रे पहायला मिळत होती. पवई सुद्धा यातून वाचली नाही. पावसाच्या पहिल्या तडाख्यात पवईत अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. कंटेनर घसरून […]

Continue Reading 0
IMG_0007

पवईत मोटारसायकल चोराला अटक; एक्टिवा, रिक्षा हस्तगत

३ एक्टिवा मोटरसायकल १ युनिकॉन मोटारसायकल आणि १ रिक्षा हस्तगत. अजून ही बऱ्याच गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पवई, साकीविहार, मरोळ भागात मोटार सायकल चोरी करून त्याचे पार्ट काढून मार्केटमध्ये विकणाऱ्या एका सराईत चोराला पवई पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली आहे. कमलेश प्रजापती (२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तुंगागाव येथील रोडसाईड गॅरेजमध्ये तो […]

Continue Reading 3
galleria bike

पवईत मोटारसायकल चोरांचा सूळसुळाट; गलेरिया, फुलेनगरमधून दुचाकींची चोरी

@अविनाश हजारे, प्रमोद चव्हाण पवईमध्ये गेल्या महिनाभरात मोटारसायकल चोरांचा वावर वाढला असून, महिनाभरात दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काल रात्री महात्मा फुलेनगर येथून पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पवई परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फुलेनगर येथे राहणारे विकास खांडे […]

Continue Reading 0

विजय विहार रोडला उजाळी; आमदार फंडातून रोड दुरुस्तीचे काम

पवई येथील विजय विहार रोड जो गेली ७ वर्षापासून खितपत पडला होता त्याच्या दुरुस्तीचे काम नुकतेच सुरु झाले आहे. आमदार आरिफ नसिम खान यांच्या फंडातून रोड दुरुस्तीचे काम केले जात असून, पावसाळ्यापूर्वी रोडचे काम पूर्ण होणार असल्याचे याच्या ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे. पवई विहार आणि लेक होम या कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी हिरानंदानी व जेव्हीएलआरकडून जलवायू […]

Continue Reading 0
lake home no entry

लेक होममध्ये बाहेरील वाहनांना ‘प्रवेश बंद’

@pracha2005 लेकहोम, पवई विहार व एव्हरेस्ट हाईट कॉम्प्लेक्स परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी येथील स्थानिकां व्यतिरिक्त बाहेरील वाहनांना आता कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश नाकारला जाणार आहे. याबाबत तिन्ही कॉम्प्लेक्सच्या फेडरेशनच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असून, १५ सप्टेंबर पासून यांची संपूर्ण अंमलबजावणी केली जाणार आहे. लोकांच्या पूर्व सुचणेसाठी संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी ‘Please leave our road alone’ […]

Continue Reading 0
bibtya

लेक होम परिसरात दिसला बिबट्या

पवई मधील लेकहोम परिसराच्या पाठीमागील झाडीत सोमवारी संध्याकाळी काही रहिवाशांना बिबट्या फिरताना आढळून आला आहे. यासंदर्भात सोसायटीतर्फे रहिवाशांना सूचनापत्र देवून सूचित करण्यात आले असून, वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी परिसराची पाहणी करून रहिवाशांना खबरदारी बाळगण्यास सूचना केल्या आहेत. बिबट्याच्या वावरामुळे रहिवाशांना मात्र धडकी भरली आहे. लेकहोम, लेक लुक्रेन सोसायटीच्या आवारात खेळत असणाऱ्या काही मुलांना सोमवारी संध्याकाळी सोसायटी, […]

Continue Reading 0
प्रातिनिधिक

लेकहोममध्ये घरफोडी, २.५ लाखाचा ऐवज साफ

मंगळवारी चांदिवली येथील लेकहोम, एव्हरेस्ट हाईट इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १२०७/१ मध्ये, डक्टच्या साहय्याने बाथरूममध्ये घुसून, घरातील ६ लाख रुपये किंमतीच्या ऐवजावर अज्ञात चोरट्याने हात साफ केला आहे. पवई पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद करत सोसायटीत असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या  आधारे तपास सुरु केला आहे. लेकहोम, एव्हरेस्ट हाईट इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील १२०७/१ मध्ये सहकुटुंब राहणारे विश्वनाथ […]

Continue Reading 0
CityFlo

पवई ते साकीनाका मेट्रो एसी बस सेवा सुरु

पवईमध्ये कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी व पवईमधून इतर भागात कामासाठी जाणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी सिटीफ्लो तर्फे साकीनाका मेट्रो स्थानक ते पवई अशी नवीन बस सेवा सुरु करण्यात आली आहे. साकीविहार रोड, चांदिवली मार्गे हिरानंदानीपर्यंत ही सेवा असणार आहे. या भागात कामासाठी येणाऱ्या लोकांना रिक्षावाल्यांचे भाडे नाकारणे, तासनतास वाहनांची वाट बघत बसणे व प्रवाशांची बस मधील गर्दी यातून […]

Continue Reading 0
IMG_20160323_162008

पवई, एव्हरेस्ट हाईट इमारतीमध्ये आग

पवईतील लेकहोममधील आगीच्या जखमा अजून ताज्या असतानाच, आज (बुधवारी) याच परिसरातील एव्हरेस्ट हाईट या गगनचुंबी इमारतीच्या १०व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १००३ मध्ये दुपारी ३.५० वाजता एसीत शोर्ट सर्किट होऊन आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ टँकर्स, ३ बंब, २ स्कायलिफ्टच्या साहय्याने काही तासांतच अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. स्थानिक नागरिक आणि कामगारांनी तत्परता […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes