Tag Archives | mumbai

shivsena durgadevi sharma garden

आयआयटी, पवई येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानातील झाडांच्या कत्तली विरोधात शिवसेनेचे श्रद्धांजली आंदोलन

पवई, आयआयटी येथील दुर्गादेवी शर्मा उद्यानात शिवसेनेच्या आमदार फंडातून सुरु असलेल्या कामाच्यावेळी लावलेली रोपटी स्थानिक नगरसेवकांच्या दबावाखाली पालिका ‘एस’ उद्यान विभागाने उपटून टाकून त्यांची हत्या केल्याचा आरोप करत शिवसेनच्यावतीने आज पवईमध्ये श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी दुर्गादेवी शर्मा उद्यानात जमा होत उद्यानात काढून फेकलेल्या आणि सुकलेल्या रोपट्यावर सफेद कपडा टाकून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. […]

Continue Reading 0
vehicle theft

स्वस्तात गाडी मिळवून देण्याच्या बहाण्याने ठगणाऱ्या भामट्याला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बँकेने जप्त केलेल्या गाडय़ा कमी किमतीत मिळवून देतो सांगून मुंबईकरांना लाखो रुपयांना ठगणाऱ्या भामटय़ाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. सुनील किशनचंद जगतीयानी उर्फ मनीष लालवाणी (४१) असे अटक आरोपीचे नाव आहे. सुनीलने मुंबई, ठाणेसह पुणे, दिल्ली आणि हरियाणा भागात अनेकांची फसवणूक केली असून, त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे. हप्ते न-भरल्याने बँकेने जप्त […]

Continue Reading 0
car theft powai police recovred car

वाहन चोरीच्या गुन्ह्यात फुलेनगरमधून एकाला अटक

@प्रमोद चव्हाण पवई आणि आसपासच्या परिसरातून चार चाकी वाहने चोरी करणाऱ्या चोरट्याला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किशोर वानखेडे (बदलेले नाव) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याचा टूअर्स अंड ट्राव्हल्सचा व्यवसाय असून, त्यासाठी तो या चोरीच्या गाड्या वापरत होता. आतापर्यंत पवई पोलिसांनी त्याच्याकडून इनोव्हा, सुमो आणि स्विफ्ट डीजायर अशा गाड्या हस्तगत केल्या आहेत. […]

Continue Reading 0
football

चांदिवली येथे रिंक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

@ सुषमा चव्हाण चांदिवली येथे रिंक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ५, ६ व ७ जानेवारीला चांदिवली म्हाडा येथील मैदानात ही स्पर्धा होणार आहे. अंध मुलांच्यात होणारी फुटबॉल सामना हे या स्पर्धेचे आकर्षण असणार आहे. मुंबईसह महाराष्ट्रात फुटबॉल या खेळाला चालना मिळावी यासाठी नियमित प्रयत्नशील असणारे शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून, शिवसेनेच्या नगरसेविका […]

Continue Reading 0
sofiya

सोफियाला भावली भारतीय संस्कृती; आयआयटी टेकफेस्टमध्ये दिली विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरे

@रविराज शिंदे, सुषमा चव्हाण सौदी अरेबियाचे नागरिकत्व प्राप्त झालेल्या “सोफिया रोबोट”ने काल (शनिवारी) आयआयटी पवईमध्ये सुरु असणाऱ्या टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नारंगी – पांढरी साडी नेसलेल्या सोफियाने यावेळी त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच नमस्ते इंडिया! मी सोफिया! अशी सुरुवात करत तिने उपस्थितांची मने जिंकली. आशिया खंडातील सर्वात मोठा असा विद्यान – […]

Continue Reading 0
छायाचित्र: दैनिक भास्कर

बिहटा हत्या प्रकरणातील “महाकाल” गॅंगच्या दोघा म्होरक्यांना पवईमध्ये अटक

पटना बिहटा येथील चित्रपटगृह मालक निर्भय सिंघ यांची गोळ्या घालून हत्या करून फरार झालेल्या “महाकाल” गॅंगच्या दोघा म्होरक्यांना आज (शनिवारी) पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तुंगा येथून अटक करून पटना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. बिहाट, पटना येथील नामांकित व्यक्तिमत्व आणि येथील उदय चित्रमंदिर सिनेमा हॉलचे मालक निर्भय सिंघ यांची चित्रपटगृहाच्या समोर मोटारसायकलवरून आलेल्या काही अज्ञात […]

Continue Reading 0

वीजबिल भरणा केंद्र बंद केल्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन, सह्यांची मोहीम

आयआयटी येथील रिलायन्स एनर्जींचे एकमेव वीजबिल भरणा केंद्र कंपनीने अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने येथील स्थानिक नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन लोक त्रस्त झाले होते. या त्रासाबद्दल लक्षात येताच शिवसेनेतर्फे वीजबिल भरणा केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम घेत हे केंद्र पुन्हा सुरु करण्यात यावे म्हणून गुरुवारी केंद्राच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या […]

Continue Reading 0

पवईतील ज्वेलरचे अपहरण करणाऱ्या ७ जणांना क्राईम ब्रांचने ठोकल्या बेड्या

पवईतील ज्वेलर जितेश परमार व दुकानातील कामगार प्रकाश सिंग यांचे मिलिंदनगर येथून अपहरण करून त्यांना मारहाण करून १.८० लाखाची लुट करून ठाण्यात सोडून पसार झालेल्या ७ अपहरणकर्त्यांना अखेर काल क्राईम ब्रांच युनिट ११ ने अटक केली आहे. अन्वर सय्यद (२६), युनुस सय्यद उर्फ शेरू (२१), रेहान शेख (३६), निझाम मकरानी (२०), समीर शेख (२८), तबरेज […]

Continue Reading 0

शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाचे पवईत सरकार विरोधात निदर्शने

– अविनाश हजारे – ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधी वणवा पेटला असतानाच, त्याची ठिणगी शहरी भागातही येऊन पोहोचली आहे. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक संस्था, संघटना पुढे येत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, डीवायएफआय व अन्य समविचारी संघटनेंच्यावतीने बुधवारी ७ जूनला पवईमध्ये सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी इतिहासात पाहिल्यांदाच शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसत […]

Continue Reading 0

पोलिस भरतीमध्ये उमेदवाराने उंची वाढवण्यासाठी केसांत लपवली कॅरमची सोंगटी

पोल‌िस भरतीमध्ये डमी उमेदवार उभे केलेल्या तरुणांना पवई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना ताजी असतानाच, अजून एका उमेदवाराने चक्क च्युइंगमच्या सहाय्याने काळी सोंगटी चिकटवून उंची वाढविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात मरोळ येथे पोलिस मैदानावर भरती दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पवई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करत उमेदवाराला अटक केली आहे. मुंबईत होणाऱ्या […]

Continue Reading 0

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!