आजच्या जमान्यातही समाजात प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे याची प्रचिती देणारे उदाहरण नुकतेच पवईतील तरुणाच्या कृत्यातून पहायला मिळाले. पैशांनी भरलेले पाकीट रस्त्यावर पडलेले मिळाल्यानंतर तरुणाने मिळालेल्या पैशांचा मोह न ठेवता त्या पाकिटाच्या मूळ मालकाचा शोध घेत त्यास पाकीट परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. प्रमोद वाघ असे या तरुणाचे नाव असून, पवईतील तुंगागाव भागात ते राहतात. […]
