पवई येथे अपघातात दोघांचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

रविवारी पवई येथे एका वेगवान टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. घाईघाईने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी आणि संबंधित मोटार वाहन कायद्याअंतर्गत पवई पोलिसांनी टेम्पो चालक भुरीलाल पालीवाल (३७) याला अटक केली आहे.

मृत राजू जैन (३२) आणि त्यांचे नातेवाईक गणेशलाल जैन (६६) हे कुटुंबातील सदस्याच्या अंत्यविधीसाठी जात असताना ही घटना पवई तलावाजवळ संध्याकाळी ५ च्या सुमारास घडली.

यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “दोघांनी मोटारसायकलवरून अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी निघाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत ही घटना घडली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आणि जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.”

ते पुढे म्हणाले, “मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले असून, निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या टेम्पो चालकास आम्ही अटक केली आहे.

, ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!