जलवायू विहार जवळ भलेमोठे झाड कोसळले; १ जखमी, २ रिक्षांचे नुकसान

पवईतील जलवायू विहार परिसरात एक भलेमोठे झाड कोसळल्याची घटना आज, मंगळवार ११ मार्चला घडली आहे. हे झाड २ रिक्षांवर पडून एक रिक्षा चालक जखमी झाला असून, दोन्हीरिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दल आणि पालिका उद्यान विभागाच्या मदतीने जवळपास २ तासाच्या मेहनतीनंतर झाड रस्त्यावरून हटवण्यात यश आले आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जलवायू विहार कॉम्प्लेक्स परिसरात अनेक जुनी झाडे आहेत. या झाडांपैकी एक भलेमोठे पसरलेले झाड मंगळवारी अचानक मुळासकट उन्मळून सुरक्षा भिंतीवरून रस्त्यावर पडले. यावेळी रस्त्यावरून प्रवास करत असणाऱ्या दोन रिक्षांवर हे झाड कोसळल्याने दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान होऊन एका रिक्षातील रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे तर एक किरकोळ जखमी झाला आहे.

“आम्ही त्वरित अग्निशमन दल आणि पालिका उद्यान विभागाचे मोहिते यांना याबाबत माहिती दिली. त्यांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले झाड कापून हटवण्यात आले आहे.” असे शिवसेना शाखाप्रमुख शिवा सूर्यवंशी यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांनी घटनेच्या ठिकाणाला भेट देवून माहिती घेतली. तसेच पालिकेला या परिसरात धोकादायक झालेल्या झाडांच्या छाटणीचे काम लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले.

“यावेळी हिरानंदानीच्या दिशेच्या मार्गिकेवर प्रवास करणाऱ्या दोन रिक्षा एमएच ०२ डीके ८१०६ आणि एमएच ०२ डीके २३६९ या दोन रिक्षांवर हे झाड पडल्याने दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत एक रिक्षाचालक इफ्तखार मियाद २५ वर्ष जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्याच्यावर हिरानंदानी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला कुपर रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!