अक्षय भालेरावच्या हत्येच्या निषेधार्थ पवईतील आंबेडकरी पक्ष, संघटना एकत्र

अक्षय भालेराव याला न्याय मिळाला पाहिजे, मागणी घेऊन पवई पोलिस ठाण्यात निवेदन केले सादर

नांदेड येथे अक्षय भालेराव या तरुणाने गावात भिम जयंती साजरी केली म्हणून निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येच्या घटनेने सर्वत्र आंबेडकरी समाजात आक्रोश दिसून येत असून, निषेध व्यक्त होत आहे. पवईमधील सर्व आंबेडकरी पक्ष संघटना यांनी सोमवारी एकत्रित येत हत्येच्या निषेधार्थ पवई पोलिस ठाण्यात निवेदन दिले. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पीडितांच्या कुटुंबांना ५० लाख मदत देण्यात यावी, अक्षयच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा आणि सावित्रीबाई फुले वसतीगृहात बौद्ध समाजातील मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेला जबाबदार आरोपींना शिक्षा झाली पाहिजे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

अक्षयच्या हत्येनंतर आंबेडकरी समाजामध्ये मोठा आक्रोश आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी या मागणीसह कोणत्याही समाजाच्या व्यक्तीशी अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून पवईतील आंबेडकरी समाज आणि संघटना एकत्रित येत अक्षयच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरले. ‘अक्षय भालेराव अमर रहे’, ‘आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात रोष यावेळी व्यक्त केला गेला.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!