पवईत पोलीस निर्भया पथकाच्या वाहनावर दगडफेक

file photo

पवई येथे महिलेच्या मदतीसाठी गेलेल्या पवई पोलिसांच्या निर्भया पथकाच्या वाहनावर दगडफेक झाल्याचा प्रकार पवई येथे घडला. पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी पवई पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पवई पोलिसांवर झालेला हा पहिला हल्ला नसून यापूर्वीही पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. टपोरीगिरी, नशाखोरी,  रोखण्यासाठी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी हटकले असता हिरानंदानी, विहार तलाव, फिल्टरपाडा, तुंगागाव, आदिवासी पाडे अशा विविध भागात पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यातील काही घटनेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी देखील झाले आहेत.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पवई पोलीस ठाण्याचे निर्भय पथक नेहमीप्रमाणे आपल्या गस्तीवर असताना पवई परिसरात पती आपल्या पत्नीला मारहाण करीत असल्याचा एक संदेश त्यांना नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाला. त्यानुसार ते घटनास्थळी पोहचले.

महिलेने पतीविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात येणार असल्याचे सांगितल्याने पोलीस पथकाने महिला व तिच्या पतीला गाडीत बसवून ते पोलीस ठाण्यात जाण्यास निघाले. याचवेळी अचानक निर्भय पथकाच्या वाहनासमोर येत एका व्यक्तीने वाहनावर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

वाहनाच्या काचेवर पडणारे दगड सावरत पोलिसांनी वाहनाच्या बाहेर निघून दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. यानंतर अखेर पथकाने नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून मदत मागवली. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने दगडफेक करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली असून, आरोपीला अटक करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!