आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा !
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा !
@रविराज शिंदे पवईमधील आयआयटी कॅम्पसमधून जाणारी पालिकेची मोठी जलवाहिनी आज (मंगळवार) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फुटली. पालिका अधिकारी तिथे पोहचून काम सुरु होईपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते. आधीच मुंबईत पाण्याची कपात सुरु असताना अशी घटना मुंबईकरांच्या संतापाचे कारण ठरले. याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजताच्या दरम्यान आयआयटीच्या कॅम्पस भागातून जाणारी पालिकेची भलीमोठी […]
जोगेश्वरी – विक्रोळी लिंकरोड़वर (जेव्हीएलआर) आयआयटी मेनगेट, बाटा शोरूमजवळ पडलेल्या तेलावरून घसरून अनेक मोटारसायकल चालक जखमी झाल्याची घटना आज सकाळी पवई परिसरात घडली. वाहतूक पोलिसांनी मोटारसायकल चालकांसाठी मार्ग बदलून आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन माती टाकून दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी १२ नंतर जेव्हीएलवरून जाणाऱ्या मोटारसायकल पैकी एक गाडी आयआयटी […]
चांदिवली फार्म रोडवर बुमरँग इमारतीजवळ एक खाजगी बस जळाल्याची घटना आज सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये बसचा वाहक प्रकाश राजकरण (२२) आग विझवण्याच्या धडपडीत किरकोळ जखमी झाला आहे. येथील चांदिवली फार्म रोडवर बुमरँग इमारत आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या इमारतीत काम करणाऱ्या लोकांना घेऊन येणाऱ्या खाजगी बसेस पैकी काही बसेस येथेच रस्त्याच्या किनाऱ्याला उभ्या केल्या […]
काल अकराव्या दिवशी पवई तलावावर विसर्जन सुरु असताना क्रेनवरील मूर्तीचा तोल बिघडून पडल्यामुळे दोन तरुण जखमी झाल्याची घटना पवईत घडली. सागर चांडालीया (३२) आणि रफिक शेख (२९) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. दोन्ही तरुणांवर राजावाडी येथे उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल अकरा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पवई तलावावरील […]
दारू पिताना दोघांच्यात झालेल्या किरकोळ वादात एका मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी पवई परिसरात घडली. गणेश प्रधान (२८) असे खून करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून, शनिवारी पवई पोलिसांनी त्याचा मित्र संदेश धिंग्रा याला गुन्ह्यात अटक केली आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या […]
@रविराज शिंदे, रमेश कांबळे गुरुवार पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. यामुळे सगळीकडे त्याची लगबग असतानाच पवईमधील जुनी पवई मानल्या जाणाऱ्या आयआयटी भागातील अनेक परिसरात शनिवारी आणि रविवारी पालिकेने कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय पाणी गुल केले. ही समस्या कमी होती की काय, रविवारी परिसरातील वीज सुद्धा गायब झाली. ऐन गणेशोत्सवात शनिवार – रविवारची सुट्टी गाठून आखलेल्या पवईकरांच्या […]
@रविराज शिंदे, प्रमोद चव्हाण आयआयटी मेनगेटजवळ काल (शुक्रवारी) रात्री ७.३० वाजता झालेल्या अपघातात एका इसमाला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना पवईत घडली. संजय सदानंद मयेकर (४३) असे या मृत इसमाचे नाव आहे. ओल्या रस्त्यावरून मोटारसायकल घसरून हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शीचे म्हणणे आहे. पवई पोलीस त्याला चिरडणाऱ्या अज्ञात वाहनाचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहेत. यासंदर्भात पवई […]
